डॉ. आशीष थत्ते

घर आणि व्यवसाय बव्हंशी सारखेच असतात. कोणताही खर्च करण्यापूर्वी जसे कंपन्या विचार करतात तसेच आपण देखील करतो आणि त्या खर्चाचे वर्गीकरण महसूल व भांडवली खर्च असे करतो. प्रत्येकजण खर्च केल्यानंतर त्याचा फायदा नेमका काय आणि किती होणार असा विचार करतात. म्हणजे क्षणिक फायदा असला तर महसूल आणि दीर्घकाळ फायदा किंवा काही काळाने फायदा असेल तर भांडवली असे त्याचे ढोबळ मानाने त्याचे वर्गीकरण केले जाते. म्हणजे नवीन कारखाना काढणे, नवीन जागा घेणे, सॉफ्टवेअर, अत्याधुनिक यंत्र, व्यापार मुद्रा (ट्रेडमार्क) वगैरे झाले भांडवली खर्च तर इतर खर्च जसे विपणन, वित्त, यंत्रांचे व्यवस्थापन आणि देखरेख इत्यादी झाले ते महसूल खर्च. कंपन्यांमध्ये भांडवली खर्च करताना अतिशय विस्तृत प्रकिया वापरली जाते. भविष्यात त्याचे फायदे-तोटे किंवा खर्च केल्यानंतर किती वर्षांनी परतावा मिळेल याचे ठोकताळे मांडले जातात. तर महसुली खर्च हे होणारच असतात त्यामुळे त्यातील फायदा-तोट्याचा विचार न करता ते कमी कसे करता येतील यावर अधिक भर असतो. तसेच चांगले उत्पन्न मिळवून कंपन्या नवीन भांडवली खर्च करतील अशी कंपन्यांकडून अपेक्षा असते. म्हणजे बँका देखील भांडवली खर्चाला उत्पन्न मिळवण्याची क्षमता बघून कर्ज देतात आणि तारण देखील ठेवतात. महसूल खर्चाला देखील ऋण दिले जाते पण, त्यावर सारखी देखरेख ठेवावी लागते आणि तारणाचे नेहमी नूतनीकरण करावे लागते.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

घरात देखील आपण कित्येक खर्चाचे कळत नकळत भांडवली आणि महसुली असे वर्गीकरण करतो. भाज्या-फळे घेण्यापासून, नवीन कपड्यांची खरेदी करणे हे सगळे महसुली खर्च तर घर घेणे किंवा नवीन वाहन खरेदी हे झाले भांडवली खर्च. बघा आपण भांडवली खर्च करताना किती विचार करतो तर महसुली खर्च कसे थोडेसे कमी करता येतील यावर भर देतो. अगदी कंपन्यांप्रमाणे व्यवस्थापनाचे नियम वापरून व्यवस्थापन करतो. काही खर्च मात्र भांडवली की महसुली यावर अजून माझेही काही ठरलेले नाही. म्हणजेच सोन्याचे दागिने किंवा भरजरी साडी वगैरे. कधीतरी पैशांची गरज असताना बायकोला म्हटले की, चला थोडेसे दागिने विकून किंवा तारण ठेवून पैसे गोळा करू. एक वेळ तुम्हाला विकेन पण एकही दागिना विकू देणार नाही! असे उत्तर मिळाले. म्हणजे दागिन्यांची खरेदी माझ्या दृष्टीने भांडवली तर तिच्या दृष्टीने महसुली होती. तर साडीचे उदाहरण अगदी त्याविरुद्ध आहे. माझ्या दृष्टीने महसुली तर तिच्या दृष्टीने परत परत नेसता येते म्हणून भांडवली. बँका आपल्याला कर्ज देताना आपण भांडवली का महसुली खर्च करतोय याची माहिती घेतात. बँकांचे वैयक्तिक कर्ज हा काही वर्षांपूर्वी सुरू झालेला कर्ज पर्याय आहे, अन्यथा महसुली खर्चासाठी सावकारांकडे जायची पद्धत होती.

प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सांगितल्याप्रमाणे, आधी गुंतवणुकीची रक्कम ठरवा मग राहिलेली रक्कम खर्च करा. आपण नेमके उलटे करतो. म्हणजे आधी खर्च करतो आणि जी रक्कम शिल्लक राहील त्यातून गुंतवणूक करतो. म्हणजेच महसुली खर्चांवर नियंत्रण ठेवा असे त्यांनी सांगितले आहे.

twitter – @AshishThatte

e-mail – ashishpthatte@gmail.com