शिरीष देशपांडे
इंटरनेटवर हाताशी सर्व माहिती लगेच मिळते पण ती खरी असतेच असे नाही. भामटे लोक याचा फायदा घेऊन अधिकृत कस्टमर केअर नावाखाली, अधिकृत नसलेले बनावट नंबर टाकून जाहिरात करतात. जेणेकरून अडचणीतील व्यक्ती आयत्या भामट्यांच्या हातात सापडतात.

वाशी येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने मोबाईल रिचार्ज केलं. पण प्रत्यक्षात रिचार्ज झालंच नाही, मोबाईल कंपनीला तक्रार करावयाची यासाठी इंटरनेटवर कस्टमर केअर नंबर शोधला आणि त्यावर तक्रार केली. चोरट्याने गोड बोलून मदत करतो असं भासवलं. तक्रारीची दखल घेण्यासाठी भामट्याने रिमोट अ‍ॅक्सेस (Remote Access ) अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करायला लावले. त्याचबरोबर पेमेंट करताना वापरलेल्या कार्डाचा नंबर वगैरे द्यायला लावले. चोरट्यांनी लगेच मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि मोबाईल रिमोट अ‍ॅक्सेसच्या (Remote Access ) मदतीने १ लाख ११ हजार रुपये ढापले. आपल्या खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात तक्रार केली. मात्र चोरट्यांनी ती रक्कम पुढे दुसऱ्या खात्यात पाठवल्याने काहीही करता आले नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Money Mantra : स्टार्टअप्सचे मर्जर अ‍ॅक्विझिशन

आपण घ्यावयाची काळजी

काही धूर्त चोरटे खोटे अ‍ॅप / अ‍ॅप फाईल (apk file) डाऊनलोड करा सांगतात. ते अजिबात करू नका. त्याद्वारे आपल्या मोबाईलमधील माहिती ते चोरण्यासाठी तसे करत असतात. कस्टमर केअर नंबर कंपनीच्या अधिकृत साईटवरूनच घेणे गरजेचे आहे. इंटरनेटवर शोधून घेऊ नयेत कारण ते बनावट असायची शक्यता जास्त असते. युपीआय Gpay, Paytm, Bhim या माध्यमातून पैसे देताना काही घोटाळा झाल्यास अधिकृत व्यक्तीशीच बोला. गुगल /इंटरनेटवर शोधलेला नंबर हा फसवा असू शकतो.

मोबाईल संबंधात तक्रार असेल तर कंपनीच्या अधिकृत शोरूममध्ये जा. शक्यतो क्रेडिट कार्डावर पेमेंट करा. काही गडबड झाल्यास ज्या बँकेचे कार्ड आहे तेथे जाऊन तक्रार करता येते. बँकेत जाऊन आपल्या कार्डावर लिमिट घालावी किंवा ऑनलाईन आपल्या कार्डावरील व्यवहारावर लिमिट सेट करावी.

आपल्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवा. बँक व्यवहारांसाठी साधा फोन वापरा म्हणजे त्यातील फक्त मेसेजेस वापरता येतील. तो फोन घरी ठेवा आणि सर्व व्यवहार घरी बसून शांतपणे कॉम्प्युटरवरच NEFT एनइएफटी माध्यमातूनच करावेत. युपीआय, Gpay, Paytm वापरत असाल, तर युपीआयचा (Wallet) वॅलेट प्रकार वापरावा. Wallet प्रकारात आपण जेवढे पैसे wallet मध्ये भरू तेवढेच चोरीला जाऊ शकतात, युपीआयने जोडले असलेल्या बँकेत असलेली रक्कम वाचू शकते.

हेही वाचा – Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्न नाही भरला तर काय होतं?

वृद्ध व्यक्तींनी मोबाइल कंपनीच्या कार्यालयात समक्ष जाऊन रिचार्जऐवजी कायम स्वरुपाचा प्लॅन घ्यावा, असे केल्याने रिचार्ज संपला आणि तातडीने भरण्याची गरज निर्माण होणार नाही.

आपल्या हातून अशी चूक घडली तर काय करावे?

  • असे काही झालेच तर ताबडतोब बँकेत जाऊन बँकेत तक्रार नोंदवा आणि खाते तात्पुरते लॉक करा.
  • https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्येसुद्धा तक्रार दाखल करा.
  • त्वरित १९३० /१५५२६० या नंबरवर संपर्क साधा या नंबरवरची यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.
  • युपीआय Gpay, Paytm, Bhim या माध्यमातून पैसे देताना काही घोटाळा झाल्यास NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्प ऑफ इंडिया) युपीआयची मुख्य संस्था यांच्या – https://www.npci.org.in/what-we-do/upi/dispute-redressal-mechanism येथे आणि संबंधित बँकेतच तक्रार नोंदवा.
  • ऑनलाईन तक्रारीची प्रत घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवा.
  • मोबाईल कंपनीत अर्ज देऊन सदरहू फसवणुकीची माहिती द्या.
  • आपण नेटबँकिंग वापरत असाल तर त्याचा पासवर्ड त्वरित बदला.

Story img Loader