PPF Account Extension Rules: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोविडंट खात्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास, त्यांच्यासाठी पीपीएफ पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा गुंतवणूकीचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिस कुठेही खाते उघडता येते. हे खाते उघडल्यानंतर त्याची मुदत किती वेळा वाढवता येते याबाबतचे नियम जाणून घ्या.

पीपीएफ खात्याच्या कालावधीचे नियम:

  • या योजनेअंतर्गत १५ वर्षांसाठी पैसे गुंतवता येतात, ज्यावर मोठ्या रकमेचा रिटर्न मिळवता येतो. या योजनेअंतर्गत ७.१ टक्के रिटर्न मिळतो. ही लोकप्रिय योजनांपैकी एक आहे.
  • या योजनेमध्ये १५ वर्षांसाथी पैसे गुंतवता येतात. त्यानंतर आपल्या इच्छेनुसार याचा कालावधी वाढवता येतो. किमान ५ वर्षांसाठी हा कालावधी वाढवता येतो.
  • जेव्हा एखाद्या खात्याला १५ वर्ष पुर्ण होतात, तेव्हा खातेधारक त्यांच्या इच्छेनुसार ५-५ वर्षांसाठी याचा कालावधी वाढवू शकतात. यासाठी २ पर्याय उपलब्ध आहेत.
    पहिला पर्याय म्हणजे तुम्ही आणखी काही पैसे जमा करून खात्याचा कालावधी वाढवू शकता. तर दुसरा पर्याय म्हणजे नवे पैसे जमा न करता आहे तितक्या रक्कमेबरोबर खात्याचा कालावधी वाढवू शकता.
  • जर तुम्हाला खात्यामध्ये नवी रक्कम जोडायची असेल तर त्यासाठी खात्याच्या कालावधी संपायच्या १ वर्षाच्या कालावधीमध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तसा अर्ज द्यावा लागेल. यानंतर नवी रक्कम जोडून खात्याचा कालावधी वाढवता येईल.
  • तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढले नाहीत आणि खात्याचा कालावधी वाढवण्यासाठी कोणताही अर्ज केला नाही, तरी तुमच्या खात्यात जमा केलेल्या पैशांवर आपोआप व्याज मिळते.

Story img Loader