नुकतीच बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली १८ लाख रुपयांची रोकड वाळवीनं नष्ट केली. खातेदाराने लॉकर उघडले असता चलनी नोटा वाळवी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने ही बाब उघडकीस आली. यानंतर खातेदाराने बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. आता अशा परिस्थितीत खातेदाराला नुकसानभरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असाच एक प्रकार हरियाणातील अंबाला येथेही पाहायला मिळाला. येथील सरकारी बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. आज आम्ही तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बनवलेल्या बँक लॉकर नियमांबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत.

हेही वाचाः गावात विहिरी खोदल्या, इन्फोसिसमध्ये टॉयलेट केले साफ; आज ऑडी अन् २ कोटींच्या कंपनीचा मालक आहे मराठी तरुण

RBI ची मार्गदर्शक तत्त्वे

गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये सेंट्रल बँकेने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, सर्व लॉकर धारकांना जानेवारी २०२३ पर्यंत त्यांच्या लॉकर करारामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. यानंतर बँकेला त्यांच्या लॉकर्सची प्रतीक्षा यादी आणि रिकाम्या लॉकर्सची यादी आरबीआयला द्यावी लागली. याशिवाय बँकेतील कोणताही ग्राहक केवळ ३ वर्षांसाठी लॉकर घेऊ शकतो. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँक ग्राहकांना नुकसानभरपाई मिळणार आहे.

हेही वाचाः रिलायन्स रिटेलने ब्रिटिश कंपनी सुपरड्रायकडून दक्षिण आशियातील मालमत्ता घेतल्या विकत, ४०० कोटी रुपयांचा करार

ग्राहकाला बँकेच्या लॉकर नियमांचेही पालन करावे लागेल. जर ग्राहकाने बँकेच्या नियमांचे पालन करून वस्तू ठेवल्या तर बँक त्याचे नुकसान नक्कीच भरून काढेल. याबरोबरच बँकेला आपल्या परिसराच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अशा स्थितीत बँक लॉकरमध्ये कोणत्या वस्तू ठेवता येतील, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लॉकरमध्ये तुम्ही काय ठेवू शकता?

कोणताही ग्राहक बँक लॉकरमध्ये फक्त दागिने, कागदपत्रे आणि कायदेशीर वस्तू ठेवू शकतो. या वस्तूंची चोरी झाल्यास किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडल्यास बँकेकडून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्याचबरोबर रोख रक्कम, परकीय चलन, शस्त्रे, औषधे किंवा इतर प्रकारची औषधे या लॉकरमध्ये ठेवता येणार नाहीत, असे काही ठेवल्यास नुकसान भरून निघणार नाही. याचा अर्थ बँक ऑफ बडोदा लॉकरमध्ये घटना घडल्यास खातेदाराला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही. त्याचबरोबर अंबाला येथील बँक लॉकरच्या चोरीप्रकरणी खातेदाराला भरपाई मिळणार आहे.

तुम्हाला किती नुकसानभरपाई मिळणार?

बँक ग्राहकाला भरपाई म्हणून फक्त १०० पट भाडे देऊ शकते. ग्राहकाने निर्धारित वार्षिक भाड्यापेक्षा १०० पट जास्त वस्तू त्याच्या लॉकरमध्ये ठेवल्या तरीही बँक फक्त १०० पट भाडे भरेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much interest is earned on cash kept in a bank locker what are the rules of rbi find out vrd
Show comments