Post Office ATM Card: पोस्ट ऑफिसकडुन सेविंग अकाउंट होल्डरसाठी एटीएम कार्डची सुविधा देण्यात येते. बँक एटीएम कार्डनुसारच या एटीएम कार्डचा वापर केला जातो. तुम्हीदेखील पोस्ट ऑफिसमधील सेविंग्स अकाउंटसाठी एटीएम कार्ड घेतले असेल, तर त्यावरील ट्रान्झॅक्शनचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
एटीएममधून एका दिवसात किती रक्कम काढता येते?
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटनुसार एका दिवसात एटीएम कार्डमधून २५ हजार रुपये काढता येतात. एका ट्रान्झॅक्शनमध्ये १० हजार रुपये इतकी रक्कम काढता येते.
ट्रान्झॅक्शन चार्ज
जर तुम्ही मेट्रो सीटीतील रहिवाशी असाल तर एका महिन्यात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ३ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करू शकता. तसेच नॉन मेट्रो सीटीसाठी ५ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करता येते. पोस्ट ऑफिसच्या एटीएममधून ट्रान्झॅक्शन केल्यास कोणत्याही शुल्क आकारले जात नाही. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट संपल्यानंतर २० रुपये + जीएसटी इतकी रक्कम आकारली जाते.
जर तुम्ही पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड रिप्लेस करणार असाल तर, पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटनुसार ३०० रुपये + जीएसटी इतकी रक्कम भरावी लागेल. ब्रँचमधून पिन जनरेट करताना ५० रूपये + जीएसटी आणि अकाउंटमध्ये पैसे नसल्यामुळे ट्रान्झॅक्शन डिक्लाइन झाल्यास २० रुपये + जीएसटी इतकी रक्कम आकरली जाते.
पोस्ट ऑफिसचे एटीएम कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी १२५ रुपये + जिएसटी मेंटेनन्स चार्ज द्यावा लागतो. तसेच पोस्ट ऑफिसचे डेबिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला एसएमएससाठी दरवर्षी १२ रुपये आकारले जातात.