शेअर मार्केटमध्ये येणारी मंदी थोड्या काळासाठीच टिकते. मागच्या शंभर वर्षाचा शेअर बाजाराचा इतिहास बघितल्यास अगदी दुसरे महायुद्ध व भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय घटना घडून गेल्यावर शेअर बाजारामध्ये त्याची प्रतिक्रिया नक्कीच उमटते, पण ठराविक काळ उलटून गेल्यावर बाजार सावरतात आणि पुन्हा एकदा वरच्या दिशेने जाऊ लागतात. त्यामुळे नव्याने बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.

पुढील दहा मुद्दे लक्षात ठेवा !

Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

१. शेअर बाजारापेक्षा फिक्स डिपॉझिट बरे का ?

मागच्या दोन वर्षात ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली त्यांना हवे तसे परतावे मिळालेले नाही म्हणून नव्याने बाजारात येणाऱ्या गुंतवणूकदारांना थोडीशी शंका वाटणे स्वाभाविक आहे मात्र फिक्स डिपॉझिट किंवा कोणत्याही डेट गुंतवणुकीपेक्षा मध्यम ते दीर्घकाळात शेअर बाजारातील गुंतवणूक कायमच फायदेशीर ठरते.

२. शेअर्स विकत घेऊ का म्युच्युअल फंड?

या प्रश्नाचे उत्तर वेळ गुंतवण्यासाठी असलेले पैसे आणि कालावधी यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे असलेले भांडवल म्हणजेच गुंतवणुकीसाठी मर्यादित पैसे असतील तर शेअर्स विकत घेण्यात अर्थ नाही. कारण एक – दोन लाख रुपये हातात असतील तर चांगल्या कंपन्यांचे किती शेअर निवडून विकत घ्याल ? हा प्रश्न पडू शकतो. मात्र हेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेमध्ये गुंतवले तर ते आपोआपच चांगल्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रोफेशनल पद्धतीने गुंतवले जातात. म्हणून मर्यादित पैसे असतील तर शेअर बाजारात थेट उतरण्यापेक्षा आधी म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबायला हवा.

३. शेअर्स घेतल्यावर नियमितपणे अभ्यास करायचा असतो

तुमच्याकडे पैसे आहेत पण वेळ नाही तर शेअर बाजारात थेट उतरणे धोक्याचे ठरेल. कंपनी काय करते ? दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे नफ्याचे आकडे काय सांगतात ? कंपनीचा शेअर बाजारामध्ये मागच्या तीन ते पाच वर्षाचा परफॉर्मन्स कसा आहे ? कंपनीला एखाद्या प्रकल्पामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे का? कंपनीच्या संदर्भात एखादी नकारात्मक बातमी आल्यामुळे शेअर अचानकपणे पडू शकतो का? हा सगळा अभ्यास करणे तुम्हाला शक्य असेल तर थेट शेअर्सचा विचार करता येईल. पण वेळेअभावी हे शक्य झाले नाही तर चुकीच्या निर्णयाने तुमचे नुकसान होऊ शकते म्हणूनच म्युच्युअल फंडाचा विचार करणे आवश्यक आहे.

४. फंडात रिस्क विचारात घेऊन गुंतवणूक करता येते

म्युच्युअल फंडात तुमच्या जोखमी प्रमाणे विविध योजना उपलब्ध आहेत. तुम्हाला शेअर बाजारात उतरायचे आहे पण तुमचा गुंतवणुकीचा विचार हा दोन ते तीन वर्षाचा असेल तर लगोलग इक्विटी शेअर्स घेण्यापेक्षा आधी हायब्रिड प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून जशी तुमची रिस्क घ्यायची क्षमता वाढेल तसे फंड बदलता येतात. थेट शेअर्स विकत घेताना तुमच्याकडे हा पर्याय नसतो.

५. टॉप अप करा

दरवर्षी आपला पगार किंवा आपले उत्पन्न वाढते त्या प्रमाणात तुमची गुंतवणूक वाढते का ? याचा विचार करायला हवा. म्हणजेच हातात पैसे जास्त यायला लागले की आपोआपच खर्चही वाढतो, तशीच गुंतवणूक वाढते का ? यासाठी तुमच्या म्युच्युअल फंड एस.आय.पी. मध्ये टॉप किंवा स्टेप अप असा ऑप्शन असतो तो निवडा म्हणजे आपोआपच तुमची गुंतवणूक दर वर्षाला वाढत जाईल.

६. शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म हा विचार वेगळा

आपण शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकातील फिक्स डिपॉझिट अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवतो पण आपली गुंतवणूक आणि जोखीम (रिस्क) यांचा संबंध आहे हे समजून घेऊन मगच गुंतवणूक करायला हवी. तुम्हाला तुमच्या मुलीच्या शाळेच्या अॅडमिशनसाठी पुढच्या वर्षी पैसे लागणार असतील तर ते पैसे थेट इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणे योग्य नाही. जर पैसे लागणार असतील त्यावेळी मार्केट पडले असेल तर नुकसान होऊ शकते म्हणून गुंतवणुकीतील मोह आणि लोभ टाळा.

७. विमा वेगळा आणि गुंतवणूक वेगळी !

आपण पैसे गुंतवतो आणि इन्शुरन्स प्रीमियम भरतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या जोखमीचा विचार करून योग्य रकमेचा मुदत विमा (टर्म इन्शुरन्स ) विकत घ्या. गुंतवणूक आणि विमा यांचा एकत्र विचार करणाऱ्या प्रॉडक्टना शक्यतो दूरच ठेवा.

८. क्रिप्टो आणि ट्रेडिंग पासून दूरच

कमी श्रमात आणि कमी विचार करून जास्त पैसे कमावणे हे मुळातच धोकादायक. त्यासाठी गुंतवणूक शिस्त असली पाहिजे. क्रिप्टो करन्सी, फॉरेक्स ट्रेडिंग किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये सौदे करणे याला अटकाव घालायला हवा. सेबीने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांपैकी २५% जणांना सुद्धा त्यातून फायदा होत नसतो. निदान यातून तरी आपण शिकायला हवे.

९. ऑनलाइन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा

पूर्वी हाताने फॉर्म भरून गुंतवणूक करावी लागत असे. आता स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरच्या माध्यमातून पैसे शेअर मार्केट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जातात. अशावेळी अनोळखी व्यक्तींकडून आलेले कोणतेही एसएमएस किंवा व्हाट्सअप वरील मेसेज बघू नका, त्याला प्रतिसाद देऊ नका. पैसे कमावणे अवघड आहेच, पण कमावलेले पैसे चुकीच्या माध्यमातून गमावू नका.

१०. स्वस्त शेअर घ्यायचा का महाग ?

शेअर स्वस्त आहे म्हणून आपण त्यात पैसे गुंतवतो का ? याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. बऱ्याचदा शेअर बाजारात नवीन आलेल्या गुंतवणूकदारांचा स्वस्तातले शेअर्स विकत मिळतात म्हणजेच ते चांगले असतात असा गैरसमज होतो, तुम्ही शेअर्स विकत घेताना त्या कंपनीच्या नफ्या तोट्याचा विचार करून विकत घ्या. एखादा शेअर फक्त स्वस्त आहे म्हणून तो वाढतो हा विचार चुकीचा आहे हे समजून घ्या.

येणारे वर्ष भरभराटीचे जाऊदे हीच सदिच्छा !

Story img Loader