·      फंड घराणे –  एसबीआय म्युच्युअल फंड

·      फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड

·      एन. ए. व्ही. (२५ ऑक्टोबर २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – २३५  रुपये प्रति युनिट

·      फंड मालमत्ता (३० सप्टेंबर २०२४  रोजी )  – २२३४६ कोटी कोटी रुपये.

·      फंड मॅनेजर – भावीन विठलानी, प्रदीप केसवन

फंडाची स्थिरता ( ३० सप्टेंबर २०२४ )

स्टॅंडर्ड डिव्हिएशन   १२.०३  

बीटा रेश्यो ०.७३

शार्प रेश्यो १.२६

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा  खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी 12% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

हेही वाचा >>>विश्लेषण: आयपीओची निवड कशी करावी? कोणते धोके टाळावेत?

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

३० सप्टेंबर रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार पोर्टफोलिओ मध्ये एकूण ६५ शेअरचा समावेश आहे व यापैकी आठ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारात असून ४७ टक्के मिड आणि १५ टक्के स्मॉल कॅप प्रकारात आहे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

 २५ ऑक्टोबर २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

·        एक वर्ष –   ३४.६६  %

·        दोन वर्षे –  २५.९८  %

·        तीन वर्षे –   २०.८९  %

·        पाच वर्षे –  २८.१३  %

·        दहा वर्षे –  १७.२७  %

·        फंड सुरु झाल्यापासून –  १७.५०  %

 फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

टोरेंट पॉवर ४.०१% सुंदरम फायनान्स ३.५२%  वोल्टास ३.३०% ३.२९% शेफर इंडिया २.७६% थरमॅक्स २.७४%कोरोमंडल इंटरनॅशनल २.६२% कार्बोरेंटम युनिव्हर्सल २.६२% के पी आर मिल २.५६% मॅक्स हेल्थकेअर २.४३% हे पोर्टफोलिओ मध्ये आघाडीचे दहा शेअर्स आहेत.

हेही वाचा >>>Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?

वित्त संस्था, भांडवली वस्तू, आरोग्य विषयक सुविधा, वाहन निर्मिती उद्योग, उपकरणे आणि घरगुती वापराच्या वस्तू, रसायने, वस्त्रोद्योग, रिअल इस्टेट, ऊर्जा निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, एफ.एम.सी.जी. दूरसंचार आणि दळणवळण अशा सर्व क्षेत्रांमध्ये फंड मॅनेजरने गुंतवणूक केली आहे.

ओला इलेक्ट्रिक, जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट, टिप्स इंडस्ट्रीज, वेबको या कंपन्यांमधील गुंतवणूक मागच्या एक महिन्यात फंडाने विकली आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे (२५ ऑक्टोबर २०२४ रोजी)

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

·        एक वर्षापासून एसआयपी केली असती तर  २४.९१   %

·        दोन वर्षे  ३०.१३  %

·        तीन वर्षे  २६.१७   %

·        पाच वर्षे  २८.९८  %

·        सलग दहा वर्ष १९.५  %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

 * एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.