जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हालाही तुमच्या सेवानिवृत्तीबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. यामुळेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग(Retirement Planning) करतात, पण त्यासाठी किती पैसे लागतात आणि पैसे कुठे गुंतवायचे याचा विचार आतापासूनच करायला हवा. विशेष म्हणजे तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी कमी दरमहा गुंतवणूक करावी लागेल. निवृत्ती नियोजनासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे NPS (National Pension System), ज्याद्वारे थोडीशी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर प्रचंड पैसा मिळू शकतो. तुम्हाला सेवानिवृत्तीवर ५ कोटी रुपये हवे असल्यास (how to get 5 crore on retirement) मग आतापासूनच किती पैसे गुंतवायचे आणि कशा पद्धतीनं गुंतवावे लागतील हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचाः Money Mantra : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मोठे अपडेट, मोदी सरकारने संसदेत केली घोषणा

५ कोटी रुपये मिळविण्याचे प्लॅन काय?

खरं तर पहिल्यादा ज्या तरुणांना नुकतीच नोकरी सुरू केली आहे, त्यांनी हे सूत्र समजून घेतलं पाहिजे. समजा तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी ५ कोटी रुपये जमवायचे असतील आणि तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षी आधीच नोकरी मिळाली आहे. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून दररोज तुमच्या पगारातून ४४२ रुपये वाचवायला सुरुवात केली आणि ती NPS मध्ये गुंतवली तर तुमच्याकडे निवृत्तीनंतर ५ कोटी रुपये जमा होतील.

हेही वाचाः जानेवारी २०२४ पर्यंत कांदा स्वस्त होण्याची शक्यता, भाव ४० रुपये प्रति किलोच्या खाली राहण्याची मोदी सरकारला अपेक्षा

४४२ रुपये जमा करून ५ कोटी कसे होतील?

जर तुम्ही दररोज ४४२ रुपये वाचवत असाल तर याचा अर्थ तुम्हाला दरमहा सुमारे १३,२६० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत ३५ वर्षे गुंतवणूक कराल. जर तुम्ही हे पैसे NPS मध्ये गुंतवले असतील तर तुम्हाला तेथे सरासरी १० टक्के व्याज मिळेल. अशा प्रकारे चक्रवाढ व्याजासह तुमचे पैसे वयाच्या ६० व्या वर्षी ५.१२ कोटी रुपये होतील.

चक्रवाढीच्या शक्तीद्वारे हे साध्य होणार

तुम्ही NPS मध्ये दर महिन्याला १३,२६० रुपये गुंतवल्यास ३५ वर्षांत तुम्ही एकूण ५६,७०,२०० रुपये गुंतवता. आता ५६.७० लाख रुपयांची गुंतवणूक असेल, तर ५ कोटी रुपये कुठून येणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक हे चक्रवाढीच्या सामर्थ्याने शक्य होणार आहे. या अंतर्गत तुम्हाला दरवर्षी तुमच्या मूळ रकमेवरच व्याज मिळणार नाही, तर तुम्हाला त्या मूळ रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही ३५ वर्षांसाठी ५६.७० लाख रुपये जमा कराल, तेव्हा तुम्हाला एकूण ४.५५ कोटी रुपये व्याज मिळाले असेल. अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक ५.१२ कोटी रुपये होणार आहे.

निवृत्तीनंतर तुमच्या हातात ५.१२ कोटी रुपये असतील का?

निवृत्तीनंतर तुमच्या हातात ५.१२ कोटी रुपये असतील, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण जेव्हा NPS ६० वर्षांनंतर परिपक्व होते, तेव्हा तुम्ही फक्त ६० टक्के रक्कम काढू शकता. याचा अर्थ तुम्ही सुमारे ३ कोटी रुपये काढू शकाल, तर उर्वरित २ कोटी रुपये तुम्हाला वार्षिक योजनेत गुंतवावे लागतील. या अॅन्युइटी योजनेमुळे तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळत राहतील.

निवृत्तीपूर्वी पैसे काढता येतील का?

NPS ची मॅच्युरिटी तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावरच होते. अशा परिस्थितीत तुम्ही ६० वर्षांपूर्वी एनपीएसचे पैसे काढू शकत नाही. आपणास कोणत्याही आपत्कालीन किंवा आजाराचा सामना करावा लागला तर घर बांधण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम काढता येते. हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे पैसे काढण्याचे नियम कधीही बदलले जाऊ शकतात, म्हणून पैसे काढण्यापूर्वी NPS चे नियम वाचा. तुम्ही नेहमी निवृत्तीनंतरच NPS चे पैसे काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही तुमचे वृद्धापकाळ शांततेत आणि सुखात घालवता येईल.