सुधाकर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणताही व्यवहार पूर्ण होण्यासाठी ‘पेमेंट’ होणे महत्त्वाचे असते. असे पेमेंट एकाच ठिकाणी, एकाच गावात, दोन भिन्न गावात किंवा भिन्न राज्यांत तसेच भिन्न देशांत होत असते. या पेमेंट पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल झाले आहेत. अगदी सुरुवातीस असे पेमेंट वस्तूंची अथवा सेवांची अदलाबदल करून होत असे याला बलुते पद्धतही म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर काही काळ ही पद्धती ग्रामीण भागात विशेषकरून प्रचलित होती. त्याचबरोबर काही व्यवहार रोखीने नाणी तसेच नोटा वापरून होत असत. जसजसी देशभर बँकिंग व्यवस्था वाढू लागली विशेषकरून १९६९ च्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर पेमेंटसाठी चेक, डिमांड ड्राफ्ट, मनी ट्रान्सफर यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला व प्रमाण अगदी वेगाने २०१६ पर्यंत वाढतच गेले.

नव्वदच्या दशकात बँकांमध्ये संगणकीकरण सुरू झाले व साधारणपणे २००० ते २००५ मध्ये बहुतांश मोठ्या बँकांत नेटबँकिंगला सुरुवात झाली आणि यामुळे एनईएफटी/ आरटीजीएसच्या माध्यमातून पेमेंट करण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान बँकांनी पेमेंटसाठी एटीएम/ डेबिट कार्ड हा पर्यायसुद्धा देऊ केला. त्यानंतर पुढील सुमारे १० वर्षात सर्व प्रकारच्या बँकांत (लहान खासगी बँका, सहकारी बँका) संगणकीकरण झाल्याने एनईएफटी / आरटीजीएसचा वापर पेमेंटसाठी सर्रास होऊ लागला. तथापि या पेमेंट सुविधांचा वापर सर्वसामान्य ग्राहकाकडून फारसा केला जात नव्हता. मात्र नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीनंतर व्यवहारातील रोखीचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंटवर सरकारी पातळीवर भर देण्यात आला इतकेच नव्हे तर प्रोत्साहन देण्यात आले, यासाठी काही सवलती देऊ केल्या.

हेही वाचा… Money Mantra: तत्काळ की, दीर्घकालीन फायदा? निवड कशी ठरते?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल पेमेंट अगदी सहजगत्या करता यावे यासाठी विशेष प्रयत्न सरकारी व रिझर्व्ह बँकेच्या पातळीवर ‘एनपीसीआय’च्या (नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया) सहयोगाने करण्यात आले. यातूनच यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) ही पेमेंट प्रणाली उदयास आली. यामुळे आपल्या मोबाइलच्या साहाय्याने निमिषार्धात भारतात कुठूनही कुठेही पेमेंट करता येऊ लागले व तेही अगदी सहजगत्या. असे असले तरी डिजिटल पेमेंटचा वापर अत्यंत झपाट्याने वाढीस लागला तो करोनाच्या साथीच्या काळात. करोनापासून बचावाचे तीन पर्याय होते – त्यातील सगळ्यात प्रमुख म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखण्याचा (सोशल डिस्टन्सिंग) होता. डिजिटल पेमेंट सुविधेमुळे हे सहजगत्या शक्य होत असल्याने लोक आपले दैनंदिन देयक व्यवहार यूपीआय आधारित मोबाइल ॲप (भीम/ गूगलपे/ फोनपे व तत्सम मोबाइल वॉलेट) वापरून सर्रास करू लागले.

हेही वाचा… Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी आणि क्लेम सेटलमेंट

आता डिजिटल रुपी हा नवीन पर्याय नुकताच (१ डिसेंबर २०२२ पासून) उपलब्ध झाला आहे. याशिवाय काही ठरावीक लोक/व्यावसायिक क्रिप्टो करन्सी अर्थात कूट चलनाचासुद्धा वापरू करू लागले आहेत. या दृष्टीने आपण येथे डिजिटल पेमेंटच्या विविध पर्यायांची माहिती घेऊ व असे पर्याय वापरताना घ्यावयाच्या दक्षतेचे उपायही जाणून घेऊ.

नेटबँकिंग/ मोबाइल बँकिंग

आता सर्व व्यापारी बँका व मोठ्या सहकारी बँका ही सुविधा आपल्या ग्राहकास देत आहेत. तसेच आता नेटबँकिंग/ मोबाइल बँकिंग अधिक सुरक्षितही झाले आहे. यासाठी खातेदाराला नेटबँकिग सुविधा कार्यान्वित करून घ्यावी लागते. बँकेकडून आपणास ‘युजर आयडी’ दिला जातो. हा आपल्याला बदलता येत नाही. याउलट सोबत दिलेले लॉगइन पासवर्ड अथवा ट्रान्झॅक्शन पासवर्ड मात्र आपण लगेच बदलणे आवश्यक असते. हे दोन्ही पासवर्ड अन्य कोणास कळणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असते, जेणेकरून अन्य कोणी आपल्या खात्यावर कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू शकणार नाही. साधारपणे दर तीन महिन्यांनी हे पासवर्ड बदलावेत अथवा अन्य कुणाला पासवर्ड समजला असा संशय आला तरी तो ताबडतोब बदलावा.

याव्यतिरिक्त आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करीत असतो त्या वेळी ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) मिळविणे आवश्यक असते. ‘ओटीपी’ आपण बँकेकडे नोंदविलेल्या मोबाइलवरच पाठविला जातो व तो फक्त १० मिनिटे कालावधीसाठी वापरास वैध असतो. थोडक्यात कोणत्याही प्रकारचे पेमेंट हे ‘ओटीपी’ नोंदवल्याशिवाय करता येत नाही. या दृष्टीने मोबाइल नंबर बदलला असेल तर हा बदल बँकेला लगेच कळविला पाहिजे व योग्य तो बदल बँकेच्या नोंदींमध्ये झाल्याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. जेणेकरून आपले नेटबँकिंग व्यवहार सुरक्षितपणे आणि विनासायास सुरू राहू शकतील.

नेटबँकिंगद्वारे आपण फंड ट्रान्स्फर, वीज बिल, टेलिफोन बिल व तत्सम देयके, क्रेडिट कार्ड बिल, मोबाइल बिल, घरपट्टी यांसारख्या सर्व बिलांचे पेमेंट घरबसल्या आपल्या सवडीनुसार करू शकतो व यासाठी कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. शिवाय नेटबँकिंगद्वारे आपण विमान, रेल्वे, बस, सिनेमा यासारखी सर्व तिकिटे आपल्या सवडीनुसार घरबसल्या आरक्षित करू शकतो. या सर्व प्रकारांत नेमकी रक्कम आपल्या खात्यातून संबंधितांच्या खात्यात त्वरित जमा होते. तसेच त्याची पावती आणि तिकीट आपल्याला त्वरित मेलवर पाठविले जाते. याशिवाय रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी (भारतभर कोठेही) एनईएफटी व आरटीजीएसमार्फत पाठविता येते.

थोडक्यात बँकिंगचे सर्व व्यवहार चेक अथवा रोख रक्कम न वापरता सहजगत्या करता येतात. नेटबँकिंग माध्यमातून एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस पद्धतीने पेमेंट करता येते. या सेवाही बँकांनी निःशुल्क केल्या आहेत.