सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फिनान्शिअल प्लानर

डिजिटल पेमेंट अर्थात डिजिटल व्यवहार कसे करावेत, ते आपण काल पहिल्या भागामध्ये समजून घेतले. त्यात नेटबँकिंगचा समावेश होता. आजच्या भागामध्ये आपण प्लास्टिक मनी समजून घेणार आहोत, म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्डांचे व्यवहार.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका

डेबिट वा क्रेडिट कार्ड

डेबिट वा क्रेडिट कार्ड याला प्लास्टिक मनी असेही म्हणतात. हल्ली या दोन्हीसोबत एटीएम सुविधासुद्धा दिली असते. एटीएममध्ये हे कार्ड वापरून एका वेळी १५ ते २० हजार रुपये इतकी रोख काढता येते. शिवाय डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून, नेटबँकिंग मार्फत होवू न शकणारे सर्व व्यवहारही शक्य होतात. सर्व प्रकारच्या मॉल, पेट्रोल पंप, दुकाने या ठिकाणी अशाप्रकारे प्लास्टिक मनीद्वारे पेमेंट करता येते. यामुळे आपल्याला खिशात रोख रक्कम ठेवायची गरज नसते. शिवाय महिन्याभरात केलेल्या सर्व व्यवहारांचे स्टेटमेंट मिळत असल्याने वेगळे हिशोब व नोंदी ठेवण्याची गरज नसते.

हेही वाचा… Money Mantra : EPFO च्या खातेदारांना मिळतो ७ लाखांचा विमा अगदी मोफत, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

कार्ड वापरताना आपल्याला ‘पिन क्रमांक’ तयार (जनरेट) करावा लागतो. हा पिन आपण ऑनलाइन किंवा खाते असलेल्या बँकेच्या एटीएमवर जाऊन तयार करू शकतो. आपला पिन साधारणपणे सहा महिन्यांतून एकदा तरी बदलावा तसेच हा गोपनीय क्रमांक कुणाला कळल्याचा संशय आल्यास त्वरित बदलावा. वेगवेगळ्या बँकेनुसार हा क्रमांक चार अंकी किंवा सहा अंकी असतो. काही कारणाने कार्ड गहाळ झाल्यास अथवा चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्वरित आपले कार्ड ‘ब्लॉक’ करा. म्हणजे आपल्याला बँकेला फोन करून अथवा नेटबँकिंग लॉग-इन करून किंवा बँकेचे मोबाइल ॲप असल्यास त्यावरून किंवा बँक शाखा जवळ असल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन आपण आपले कार्ड ‘ब्लॉक’ करू शकतो. असे केल्याने आपले कार्ड लगेचच रद्द केले होवून पुढील एक ते दोन आठवड्यांत आपल्याला नवीन कार्ड (नवीन नंबर, एक्स्पायरी डेट व सीव्हीव्ही नंबर असलेले) दिले जाते.

हेही वाचा… Money Mantra : पॅन-आधार अद्याप लिंक केले नाही, मग करदात्यांना भरावा लागणार ६००० रुपयांचा दंड, जाणून घ्या कसा?

आपण ऑनलाइन पद्धतीने कार्ड ब्लॉक केल्यास आपले कार्ड ब्लॉक झाल्याचा ‘एसएमएस’ मोबाइलवर येतो. बँकेत प्रत्यक्ष जावून किंवा फोन करून कार्ड ब्लॉक केल्यास बँकेकडून तशी पोहोच आवर्जून घ्यावी. अशा रीतीने आपले कार्ड ब्लॉक केल्यावर त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन कार्ड हरविल्याची तक्रार नोंदवावी. असे केल्याने गहाळ झालेल्या कार्डद्वारे जर काही व्यवहार झाले तर त्यास आपण जबाबदार राहात नाही. आजकाल ऑनलाइनसुद्धा ‘एफआयआर’ करता येतो. अशी तक्रार /एफआयआर केल्याने कार्ड हरवल्याचा कायदेशीर पुरावा हाती राहतो. कार्ड गहाळ झाल्यावर लगेचच कार्ड देणाऱ्या कार्ड कंपनीस अथवा बँकेस कळविल्याने संबंधित कंपनी/ बँक आपल्या कार्ड खात्यावर ‘फ्रॉड अलर्ट’ लावते. यामुळे पुढील फसगतीचे व्यवहार टाळले जातात. असे परोक्ष व्यवहार झाल्याचा ‘एसएमएस’ आल्यास, ते त्वरित बँकेस कळवावे. जेणेकरून या व्यवहाराची जबाबदारी आपली असणार नाही.

ई-वॉलेट

ई-वॉलेट हा एक आभासी पैशाचा बटवा (व्हर्च्युअल मनीपर्स) आहे. सध्या पेटीएम, बडी, चिल्लर, मोबीक्विक, फ्रीचार्ज यांसारखी अनेक ई-वॉलेटस् मोबाइल ॲपच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. ई-वॉलेट ॲप आपल्याला मोबाइलवर डाऊनलोड करून घावे लागते. ज्याप्रमाणे आपण आपल्या पाकिटात पैसे ठेवतो त्याप्रमाणे ई-वॉलेटमध्ये आपल्या बँक खात्यातून अथवा क्रेडिट /डेबिट कार्डद्वारे पैसे ट्रान्स्फर करावे लागतात आणि हे ट्रान्स्फर केलेले पैसे आपण पाकिटातल्या पैशाप्रमाणे सर्व प्रकारच्या पेमेंटसाठी वापरू शकतो. आपण विक्रेत्याचा मोबाइल नंबर विचारून बिलाची रक्कम त्याच्या ॲपवर ट्रान्स्फर करू शकतो अथवा बार कोड किंवा क़्यूआर कोड असेल तर हा कोड आपण आपल्या मोबाइलवरून स्कॅन करून देयक व्यवहार पूर्ण करता येतो. या प्रकारच्या बहुतेक सर्व ॲपमार्फत आपण हॉटेल बिल, सिनेमा तिकीट, रेल्वे, विमान, बस तिकिटाचे पेमेंट करू शकता. आपल्या ई-वॉलेटमधील रक्कम संपल्यावर ते पुन्हा चार्ज करावे लागते म्हणजे आपल्या बँक खात्यातून अथवा क्रेडिट/डेबिट कार्डमार्फत पैसे ट्रान्स्फर करावे लागतात.

यूपीआय

यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) सध्या भीम/ गूगलपे/ फोनपे यांसारख्या मोबाइल ॲपचा वापर सर्वसामान्य लोक मॉल ते रस्त्यावरील भाजीवाला या ठिकाणी पेमेंट करताना सहजगत्या करीत असतात. यासारखे मोबाइल ॲप यूपीआय(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) प्रणालीचा वापर करत असून याने देयक व्यवस्थेत एक प्रकारची क्रांतीच घडवून आणली आहे. आज भारतात दररोज सुमारे २० ते २२ कोटी एवढे व्यवहार यूपीआयमार्फत केले जातात. तर दरमहा सुमारे १० ते १२ लाख कोटींचे पेमेंट यातून होत असल्याचे दिसून येते व यात सातत्याने वाढ होत आहे. यूपीआयचा वाढता वापर लक्षात घेऊन नुकतेच म्हणजे १९ ते २२ सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये यूपीआयद्वारे आणखी पाच नवीन सुविधा देऊ केल्या जात असल्याचे जाहीर केले गेले. या नवीन सुविधा म्हणजे – १) यूपीआय लाइट २) रुपे क्रेडिट कार्डशी यूपीआय लिंक करणे ३) यूपीआय – १२३ ४) यूपीआय ऑटो पे ५) भारत बील क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम.

Story img Loader