सुजितला आता त्याच्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी स्थैर्य लाभत होते. नवीन नवीन कल्पना, परिश्रम आणि त्यात सातत्य यामुळे व्यवसाय वाढत होता.
व्यवसाय संबंधी निर्णय जरी ठामपणे आणि आत्मविश्वासाने घेता येत असले तरी ‘वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या’ बाबतीत तो अनेक बाबतीत साशंक होत असे.

स्वतः च निर्णय घेताना अनेकदा त्याच्या मनात गुंतवणुकी संदर्भात , गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांबद्दल, ध्येय निश्चिती करणेसंदर्भात, त्याला अनेक प्रश्न पडत असत. निवडलेली इन्शुरन्स पॉलिसी योग्य ठरेल का, मी करत असलेली गुंतवणूक योग्य आहे का, असे एक ना अनेक प्रश्न त्याला सातत्याने पडत होते.
पर्याय होता ‘ अधिकृत आर्थिक नियोजनकाराकडून ‘ ‘ आर्थिक नियोजन सल्ला आणि त्याचा आराखडा ‘ तयार करून घेण्याचा !

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

पण हा पर्याय माझ्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न त्याला पडला होता. खरंतर, सुजित सारख्या अनेकांना आर्थिक नियोजनाबद्दल अनेक समज – गैरसमज – अपेक्षा आणि समजुती असतात. खरंतर, तथ्य आणि वास्तव वेगळेच असतं.

जाणून घेऊया आर्थिक नियोजन संबंधी काही समजुती आणि तथ्य!

१. आर्थिक नियोजन हे फक्त ‘ श्रीमंत’ लोकांसाठी?

सर्वसाधारणपणे , अनेक लोकांना असा समज असतो की, ‘ आर्थिक नियोजन ‘ हे फक्त श्रीमंत अथवा गुंतवणूक करण्या योग्य भरपूर पैसा असणाऱ्या लोकांसाठी असते. मात्र वास्तविक पाहता, आर्थिक नियोजन हे ‘ सर्व उत्पन्न गटांसाठी ‘ असते. आज आपले उत्पन्नाच्या मार्ग मर्यादित असले तरी खर्चाच्या आणि आर्थिक जबाबदार्यांच्या वाटा अनेक आहेत. आज गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, तसेच इन्शुरन्स पॉलिसी , विविध प्रकारचे loans, etc उपलब्ध आहेत. या सगळ्यांचे वैविध्य आणि वैशिष्टय वेगवेगळे आहे. यामुळेच खर्च – बचत – गुंतवणूक – विमा इत्यादींचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. आज असलेल्या उत्पन्नाचा स्तर उंचावणे, तो राखणे, ध्येयपूर्ती करणे, इत्यादी सगळ्यांसाठी ‘ आर्थिक नियोजन ‘ हे सर्वांसाठी गरजेचे.

हेही वाचा : Money Mantra : आज भारतात साजरा केला जातोय जागतिक काटकसर दिवस, जाणून घ्या त्याचे महत्त्व अन् इतिहास

२. आर्थिक नियोजनाचा हेतू हा फक्त म्हणजे जास्तीत जास्त परतावा?

सर्वसाधारण असे मानतात की, आर्थिक नियोजनाचा मुख्य हेतू हा आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळणे हा असतो. पण वास्तवात मात्र , आर्थिक नियोजन आपल्याला योग्य आणि साजेसे ‘ asset allocation ‘ करणे, आपले ध्येय, गुंतवणूक कालावधी आणि जोखीम क्षमतेनुसार योग्य गुंतवणूक करणे हे असते. यात आपल्या सद्य आर्थिक स्थितीचा, आर्थिक जबाबदार्यांचा आढावा घेणे, बचतीचे आयोजन, बजेट आखणे, योग्य विमा पॉलिसी निवडणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो.

योग्य प्रकारे तयार केलेला आर्थिक नियोजन आराखडा, आपल्याला कधीही ‘ जास्तीत जास्त परताव्याची हमी ‘ देत नाही मात्र आपले ध्येय योग्य प्रकारे, जास्तीत जास्त प्रमाणात कसे पूर्ण होईल याकडे जरूर भर देतो.

हेही वाचा : Money Mantra: वर्तणूक अर्थशास्त्र क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीबाबत काय सांगते?

३. आर्थिक नियोजन कोणाकडूनही करून घेता येते

आर्थिक नियोजन, गुंतवणुकी, इन्शुरन्स इत्यादी विषयांवर आज सोशल मीडिया, अनेक दृक श्राव्य माध्यमांमध्ये अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. ही माहिती ‘ सार्वजनिक ‘ स्वरूपाची असते आणि तो ‘ वैयक्तिक सल्ला ‘ ठरू शकत नाही. आपले आर्थिक नियोजन , आर्थिक बाबी वैयक्तिक आणि वेगळ्या असतात. त्यामुळे आपले नियोजन मात्र आपल्या गरजा, ध्येय,जबाबदाऱ्या समजून आणि अभ्यासून केले पाहिजे. यासाठी ‘ आर्थिक नियोजन ‘ मात्र अभ्यासू, अधिकृत आणि नि: पक्षपने काम करणाऱ्या सेबी नोंदणीकृत अर्थानियोजनकारकडून करून घेणे चांगले!

४. आर्थिक नियोजन ही one time activity आहे?

अनेक समजुती सोबत, हीसुद्धा एक समजूत आहे की ‘ आर्थिक नियोजन ‘ ही one time activity aahe. खरंतर वास्तव हे आहे की आर्थिक नियोजन आराखडा हा अनेक गृहितके ( assumptions ) वर ठरतो. जागतिक घडामोडी, आर्थिक समीकरण, micro & macro economic changes, आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे बदल, आर्थिक जबाबदाऱ्या, इत्यादी सगळेच या आराखड्यावर परिणाम करतात.

त्यामुळे एकदा का आर्थिक नियोजन आराखडा तयार झाला की त्याची अंमलबजावणी करणे हे आपली आर्थिक शिस्त, focus, आणि सातत्य यांच्या साथीने करावे लागते. बदलत्या गोष्टीनुसार या आराखड्याचा सातत्याने आढावा घेणे गरजेचे असते. यामुळे त्या आराखड्यात योग्य तो बदल करणे सोपे जाते.

हेही वाचा : Money Mantra: रिलायन्स, मारूतीचे तिमाही निकाल नेमके काय सांगताहेत?

आर्थिक नियोजन ही एक आवश्यक , सतत आढावा घेऊन , योग्य ते बदल करून आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील ठेवणारी प्रक्रिया आहे. यामुळे आपले आर्थिक ज्ञान , समज आणि शिस्त कायम राहते !

Story img Loader