करदाता प्राप्तिकर विवरणपत्र भरताना काही चुका होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत असतो. तथापि, बरेच करदाते शेवटच्या क्षणी प्राप्तिकर विवरणपत्र भरतात, त्यामुळे कळत-नकळत चुका होऊ शकतात. यामध्ये चुकीचा बँक खाते क्रमांक नमूद करणे, व्याज उत्पन्न घोषित करण्यास विसरणे, चुकीच्या वजावटी वा करकपातीचा दावा करणे, भांडवली नफा घोषित न करणे, करमुक्त व्याजाची माहिती न भरणे, इत्यादीं बाबीचा समावेश असू शकतो.

जर प्राप्तिकर विवरणपत्र भरताना चूक केली वा झाली असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. पूर्वीचे ते दिवस आता संपले आहेत. सध्याच्या प्राप्तिकर कायद्यात चुका सुधारण्याची खूपच चांगली संधी वा परवानगी उपलब्ध आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर छोटी मोठी चूक आढळली असेल, तर सध्याच्या कर कायद्यानुसार परवानगी दिल्याप्रमाणे चूक वगळू वा सुधारू शकता. प्राप्तिकर कायदा, १९६१ चे कलम १३९ (५) अंतर्गत करदात्यांना सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरून त्यांच्या चुका सुधारण्याची संधी आहे तर कलम १३९(८ए) नुसार वरील प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत संपल्या नंतरही सव्वा दोन वर्षेपर्यंत अपडेटेड प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करून पूर्वीच्या चुका दुरुस्त करून वा सुधारून किंवा नवीनच उत्पन्न घोषित करून अपडेटेड प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येते.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

आणखी वाचा: Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्नसाठी निकष काय असतात?

सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे काय?
सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र करदात्यास मूळ प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना केलेल्या चुका किंवा त्रुटी किंवा तथ्य वगळण्याची संधी देतो. सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरणे म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र पुन्हा भरणे, पण यावेळी योग्य माहितीसह. सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरताना, मूळ प्राप्तिकर विवरणपत्राचा तपशील नमूद करणे अनिवार्य आहे.

कोण सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो?
कर विभागाला योग्य माहिती देण्यासाठी कलम १३९(५) नुसार त्याचा/तिचा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेल्या प्रत्येक करदात्याला त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे. पूर्वी, ज्या करदात्यांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केला होता, त्यांनाच त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये सुधारणा करण्याची परवानगी होती. तथापि आता या नियमात बदल झाला असून बीलेटेड (विलंबित) प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे कलम १३९(४) अंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनाही, म्हणजे, अंतिम मुदत संपल्यानंतर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केला जातो, त्यांनाही सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केव्हा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो?
प्राप्तिकर कायद्याचे कलम १३९(५) स्पष्ट करते की जर एखाद्या करदात्याने त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यानंतर त्यात समाविष्ट केलेले वा वगळलेले किंवा अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर केलेले चुकीचे विधान आढळले तर सदर चूक सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र भरून दूर करू शकते. हे सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र संबंधित आर्थिक वर्षाच्या आकारणी वर्षाच्या समाप्तीच्या तीन महिन्यांपूर्वी किंवा कर निर्धारण पूर्ण होण्यापूर्वी, यापैकी जी तारीख आधी असेल तो पर्यंत भरता येईल. अशा प्रकारे, आर्थिक वर्ष २०२२-२२ (आकारणी वर्ष २०२३-२४) साठी सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे, तर अपडेटेड प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ आहे.

प्राप्तिकर कायदा कलम १३९(५) च्या संदर्भात ‘कर निर्धारण होणे म्हणजे काय?
कलम १३९(५) मध्ये वापरलेला करनिर्धारण हा शब्द कलम १४३(३) आणि कलम १४४ अंतर्गत केलेल्या कर निर्धारणा संदर्भातीलचा असल्याचे संदर्भ स्पष्ट करतो . कलम १४३(१) अंतर्गत केलेले कर निर्धारण या सुधारीत प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्याच्या उद्देशासाठी करनिर्धारण म्हणून मानले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. जे प्राप्तिकर विवरणपत्र कलम १४३(१) अंतर्गत कर निर्धारण होऊन केवळ कर निर्धारणाची सूचना देण्यात आली आहे असे सर्व प्राप्तिकर विवरणपत्र नंतर सुधारित केले जाऊ शकतात. या खेरीज कलम १४३(३) किंवा कलम १४४ अंतर्गत ऑर्डर पास करण्याच्या तारखेपूर्वी प्राप्तिकर विवरणपत्रा मध्ये सुधारणा केली जाऊ शकते जरी अशा ऑर्डर्स नंतरच्या तारखेला मिळाल्या असतील तरी.

कोणत्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये सुधारणा केली जाऊ शकते?
कलम १३९(३) किंवा १३९ (४ए) किंवा १३९ (४बी) किंवा १३९ (४सी) किंवा १३९ (४डी) अंतर्गत दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये सुधारणा केली जाऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे कलम १३९(३) अंतर्गत दाखल केलेले नुकसानीचे प्राप्तिकर विवरणपत्र किंवा कलम १३९ (४ए) किंवा १३९ (४बी) किंवा १३९ (४सी) किंवा १३९ (४डी) अंतर्गत दाखल केलेले प्राप्तिकर विवरणपत्र हे कलम १३९(१) अंतर्गत प्राप्तिकर विवरणपत्रासारखे मानले जाते.. म्हणून, कलम १३९ (३) किंवा १३९ (४ए) इत्यादी अंतर्गत दाखल केलेले प्राप्तिकर विवरणपत्र कलम १३९ (५) अंतर्गत सुधारित केले जाऊ शकते.

कलम १४२(१) अन्वये उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची नोटीस कलम १३९(१) अन्वये नमूद केलेल्या देय तारखेनंतरच करनिर्धारकाला करनिर्धारण अधिकारी जारी करू शकतात. अशाप्रकारे कलम १४२(१) अंतर्गत नोटीसला प्रतिसाद म्हणून दाखल केलेले प्राप्तिकर विवरणपत्र कलम १३९(१) अंतर्गत विहित केलेल्या देय तारखेनंतर दाखल केले असले तरी कलम १३९(५) नुसार, अशा प्राप्तिकर विवरणपत्र मध्ये सुधारणा केली जाऊ शकते. तथापि, कलम १४२(१) अन्वये दिलेल्या नोटिशीला उत्तर म्हणून दिलेले नोटीसमध्ये दिलेल्या वेळेनंतर प्राप्तिकर विवरणपत्र सादर केले असल्यास, ते कलम १३९(४) अन्वये सादर केलेले प्राप्तिकर विवरणपत्र असेल आणि अशा प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुधारणा करता येणार नाही. तथापि, सुधारीत बदलानुसार हे देखील सुधारीत होऊ शकते

सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
आर्थिक वर्ष २०१९-२० पर्यंत, एखाद्या करदात्याला संबंधित आकारणी वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची परवानगी होती. अर्थसंकल्प २०२१ मध्ये, झालेल्या बदलानुसार केंद्र सरकारने सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी तीन महिन्यांनी कमी केला आहे. त्यामुळे , आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून, सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख संबंधित आकारणी वर्षाची ३१ डिसेंबर आहे. अशा प्रकारे, आर्थिक वर्ष २०२२-२३ (आकारणी वर्ष २०२३-२४) साठी सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. अपडेटेड प्राप्तिकर विवरणपत्र जरी सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र नसले तरी सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्राचे सर्व गुण त्याच्यात आहे व त्याचा उपयोग पूर्वी घोषित केलेले उत्पन्न सुधारीत करण्यासाठी केला जाऊ शकतो. अपडेटेड प्राप्तिकर विवरणपत्र आर्थिक वर्ष २०२२-२३ (आकारणी वर्ष २०२३-२४) साठी दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ आहे.

सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र कसे दाखल करावे?
सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मूळ प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासारखीच असते. तथापि, सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना, करदात्याने ते प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९(५) अंतर्गत दाखल करणे आवश्यक आहे. करदात्याने ‘रिटर्न फाइल अंतर्गत’ कॉलममध्ये ‘रिव्हाइज्ड यू/एस १३९(५)’ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म मूळ प्राप्तिकर विवरणपत्राचे तपशील विचारेल, म्हणजे, प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेल्या पावतीचा क्रमांक आणि मूळ प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख.

किती वेळा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकता?
करदाते कितीही वेळा सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल शकतात याची मर्यादा नाही. पण, प्रत्येक वेळी सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना मूळ प्राप्तिकर विवरणपत्राचा तपशील देणे आवश्यक असते. करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये सुधारणा करणे ही त्याच्यासाठी त्याची चूक सुधारण्याची एक संधी आहे, परंतु या सुविधेचा गैरवापर टाळला पाहिजे आणि मूळ प्राप्तिकर विवरणपत्र भरताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे.

सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
एकदा करदात्याने सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर, त्याने ते सत्यापित केले असल्याची खात्री केली पाहिजे. प्राप्तिकर विभाग सुधारित प्राप्तिकर विवरणपत्राची पडताळणी केल्याशिवाय ते स्वीकारणार नाही. सुधारित प्राप्तिकर विवरणपत्राची पडताळणी करण्‍यासाठी, करदाता प्राप्तिकर विवरणपत्राची पडताळणी करण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या सहा पद्धतींपैकी कोणतीही एक वापरू शकतो, उदा., नेट-बँकिंगच्‍या माध्‍यमातून, आधार ओटीपी द्वारे, डिजीटल सिग्नेचर वापरून, इव्हीसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर करून किंवा स्वाक्षरी केलेली प्रत पाठवून किंवा प्रत्यक्ष पडताळणी करून.

१ ऑगस्ट २०२२ पासून प्रभावीपणे, प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर विवरणपत्र सत्यापित करण्यासाठी १२० दिवसांपूर्वीची वेळ मर्यादा ३० दिवसांपर्यंत कमी केली. म्हणून, जर सुधारित प्राप्तिकर विवरणपत्र १ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा नंतर दाखल केला असेल, तर ३० दिवसांच्या आत त्याची पडताळणी झाल्याचे सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

करदात्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्याच्या प्राप्तिकर विवरणपत्रामधील चूक सुधारण्याची आणि उशीरा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत सारखीच आहे, म्हणजे ३१ डिसेंबर. म्हणून, जर त्याने आर्थिक वर्ष २०२२-२३ (आकारणी वर्ष २०२३-२४) साठी ३१ डिसेंबर २०२३ रोजी उशीर झालेला प्राप्तिकर विवरणपत्र भरला तर त्याच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये चूक असल्यास ती सुधारण्याची संधी गमावेल.

चूक सुधारण्यासाठी काही शुल्क लागते काय?
सुधारीत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी वा झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही शुल्क लागत नाही. तथापि, चुका दुरुस्त केल्याने उत्पन्नात वाढ वा घट झाल्यास त्याचा प्राप्तीकर देण्याघेण्यावर परिणाम होऊ शकतो. जर प्राप्तिकर देय असेल तर व्याजाचा भुर्दंड बसू शकतो. तथापि, विलंबशुल्क काही लागत नाही.

अपडेटेड विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी आकारणी वर्ष संपल्यानंतर दोन वर्षे आहे. सबब २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे आकारणी वर्ष २०२३-२४ असल्याने ३१ मार्च २०२४ नंतर दोन वर्षे दाखल करता येइल. जर विवरणपत्र ३१ मार्च २०२५ पर्यंत दाखल केले तर प्राप्तिकराची रक्कम, व्याज व २५% अतिरीक्त कर व ३१ मार्च २०२६ पर्यंत दाखल केल्यास प्राप्तिकराची रक्कम व ५०% अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. याचा अर्थ अजूनही विवरणपत्र दाखल करण्याची संधी मिळणार आहे परंतु त्यासाठी खिसा थोडा रिकामा करावा लागणार आहे. आता कोठेही कर सवलती मिळण्यासाठी मोफत जेवण मिळणार नाही हे निश्चित !!