आपल्या जवळचं सोनं हे बँक किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण ठेऊन त्या बदल्यात घेतलेलं कर्ज म्हणजे ‘गोल्ड लोन’ किंवा ‘सुवर्ण कर्ज’!
भारतातील बहुतेक कुटुंबांकडे कमी- अधिक प्रमाणात सोन असतंच. काही वेळा कुटुंबाने ते स्वतः विकत घेतलेलं असत. बऱ्याचदा त्या सोन्यातील काही भाग वंशपरंपरेने आलेला असतो. स्त्रियांच्या शृंगारामध्ये सोन्याला महत्व आहे म्हणून सोन्याची खरेदी केली जाते . पण त्याचबरोबर सोन्याला बाजारात कायमच मागणी असते. त्यामुळे गरजेच्या वेळी जवळचं सोन विकून पैसे उभे करता येतात. सोन्याचे भाव जवळपास नेहमीच वाढत असतात. त्यामुळे विकताना सोन्याला खरेदीच्या भावापेक्षा सुद्धा अधिक मूल्य मिळतं, हा अनुभवातून आलेला दृष्टिकोनसुद्धा सोन्याच्या खरेदीमागे असतो.

वैद्यकीय उपचारांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा अन्य एखाद्या अनपेक्षितपणे उद्भवलेल्या अडचण साठी तातडीने पैसे उभे करायचं असतील तर जवळच सोनं विकणं हा सोपा पर्याय समोर असतो. परंतु बहुसंख्य लोकांची आपल्या जवळचं सोनं विकायची मानसिक तयारी नसते. याला प्रामुख्याने दोन कारण असतात :

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

१) सोन्याचे भाव इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतात की, एकदा आपल्या जवळच सोन विकलं की तितकं सोन परत विकत घेता येणं अतिशय अवघड किंवा जवळपास अशक्य आहे असं प्रत्येकाला वाटतं.
२) सर्वसामान्यांच्या घरात सोनं दागिन्यांच्या रूपात असतं. ते दागिने त्यांना त्यांचे आई – वडील किंवा आजी – आजोबां कडून मिळालेले असतात अथवा, त्यांनी ते घरातलं एखादं लग्न किंवा वास्तुशांत अशा समारंभांसाठी घेतलेले असतात. त्यामुळे त्या दागिन्यांना भावनिक मूल्य असतं. यामुळे आपले दागिने कायमचे विकून टाकण त्यांना त्रासदायक वाटतं.

हेही वाचा : Money Mantra : ८०सी अंतर्गत गुंतवणूक करताना

सुवर्ण कर्जात १०२ टक्के वाढ

परंतु पैशांची निकड निर्माण झालेली असते. ती भागवण्यासाठी सोन विकणं हा एक सोपा किंवा शेवटच्या काही मोजक्या मार्गांपैकी पैकी एक मार्ग उरलेला असतो. अशा परिस्थितीत सोनं कायमचं विकून टाकण्यापेक्षा ते तारण ठेऊन त्यावर कर्ज घेणं, घेतलेलं कर्ज व्याजासहित फेडून आपलं सोनं परत मिळवणं हा पर्याय चांगला वाटतो. त्यामध्ये आपण दिलेले परत मिळण्याची आशा असते! यामुळेच भारतामध्ये सोनं तारण ठेऊन घेतलं जाणारं ‘सुवर्ण कर्ज’ किंवा ‘गोल्ड लोन’ घेणं वेगाने लोकप्रिय होऊ लागलं आहे. २०१९ पासून आज पर्यंतच्या चार वर्षात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या १०२ टक्के, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फायनान्स इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल (FIDC) च्या अहवालात या विषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

लोकप्रियतेमागची कारणे

सुवर्ण कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि सहज असते; त्याचबरोबर या कर्जाचे व्याजदर सुद्धा अल्प असतात ही सुद्धा सुवर्णकर्ज लोकप्रिय होण्यामागची प्रमुख कारणं आहेत. सुवर्ण कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे कर्जाची मागणी करणारा एक औपचारिक अर्ज द्यावा लागतो. अर्जदाराचं वय कमीतकमी १८ व जास्तीतजास्त ६५ वर्षे असावं अशी अपेक्षा असते. योग्य वाटल्यास एखाद्या अर्जदारासाठी बँका वयाची मर्यादा थोडी फार शिथिल करू शकतात. अर्जदाराकडे उत्पन्नाचा नियमित स्रोत असावा अशी अपेक्षा असते. कर्जाची मागणी करणाऱ्या अर्जासोबत अर्जदाराचे दोन फोटो , त्याची ओळख निश्चित करण्यासाठी आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणि मागील बारा महिन्यांचं बँक स्टेटमेंट इतकी कमी कागदपत्र जोडावी लागतात. मात्र या अर्जाबरोबरच ज्या सोन्यावर कर्ज घ्यायचं आहे ते सोनं सुद्धा बँकेकडे द्यावं लागतं. बँकेकडे सोनं सुपूर्द केल्यानंतर बँक आपल्या व्यावसायिक तज्ज्ञांच्या मदतीने त्या सोन्याचं बाजारमूल्य निश्चित करते. त्या मूल्याच्या जास्तीतजास्त ७५ टक्के इतकी रक्कम अर्जदाराला कर्जाच्या स्वरूपात मिळू शकते .

हेही वाचा : Money Mantra : ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी अशी करा आखणी

ऑनलाइन सोय

बहुतेक सर्वच बँका आणि वित्तीय संस्था ‘ऑनलाईन’ गोल्डलोन मिळवण्याची सुविधा सुद्धा देतात . त्यासाठी बँकेच्या वेबसाईटवर जाऊन कर्जाची विनंती करणारा अर्ज द्यावा लागतो . त्याबरोबर आवश्यक ती कागदपत्र अपलोड करावी लागतात. त्यानंतर बँकेचे कर्मचारी अर्जदाराच्या घरी येऊन तारण ठेवायचं सोनं घेऊन जातात. त्यामुळे स्वतः बँकेत सोनं घेऊन जाण्याचा त्रास वाचतो. तसंच बँकेचे कर्मचारी सोनं घेऊन गेल्यामुळे रस्त्यात चोरी होणं किंवा तशा प्रकारच्या संभाव्य अन्य बाबीं पासून कर्जदार सुरक्षित राहतो.

विविध व्याजदर

गोल्ड लोन वर आकारले जाणारे व्याजदर हे कर्जापोटी घेतलेल्या रकमेवर अवलंबून असतात. गोल्ड लोन पोटी घेतलेली रक्कम जितकी अधिक तितका त्यावर आकारला जाणारा व्याजदर जास्त असं सामान्य सूत्र असतं. प्रत्येक बँक स्वतःचे वेगळे व्याजदर आकारते. आज म्हणजे फेब्रुवारी २०२४ मध्ये सुवर्णकर्जावर स्टेटबँक ऑफ इंडिया सर्वात कमी म्हणजे प्रतिवर्षी ८.७५ टक्क्यांपासून व्याज आकारते. ICICI बँकेचे व्याजदर ११ टक्क्यांपासून सुरु होतात . IIFL फायनान्स ११ टक्क्यांपासून ते २७ टक्क्याने पर्यंत व्याजदर आकारते तर फिन्सर्व्ह प्रतिवर्षी ९.५ टक्क्याने पासून ते २८ टक्क्याने पर्यंत व्याज घेते .

हेही वाचा : Money Mantra : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे-थे, बाजाराचा निराशेचा सूर !

परतफेडीच्या पर्यायाचं स्वातंत्र्य

गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी बँक कर्जदाराला अनेक पर्याय देते . त्यापैकी त्याला सोयीचा ठरेल असा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य कर्जदाराला असतं. गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी खालील प्रमुख पर्याय उपलध आहेत :

१. बुलेट परतफेड : यामध्ये बँक कर्जदाराबरोबर कर्जाच्या परतफेडीची तारीख ठरवते. त्या कर्जफेडीच्या दिवशी कर्जाचं मुद्दल आणि त्यावरील व्याज सर्वच एकत्र भरण्याची मुभा कर्जदाराला दिली जाते. त्यापूर्वी त्याला मुद्दल किंवा व्याज मुळीच न भरण्याची अनुमती असते. मुद्दल आणि व्याजाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर बँक तारण ठेवलेले सोने परत करते.

२. व्याज मासिक हप्त्याने भरणं पण मुद्दल शेवटी भरण्याची सुविधा : या मध्ये बँक आणि कर्जदार परस्पर संमतीने कर्जाच्या परतफेडीची तारीख ठरवतात . कर्ज घेतलेल्या रकमेवरचं एकूण व्याज विचारात घेऊन त्या व्याजाचा मासिक हप्ता ठरवला जातो . कर्जदाराला तो हप्ता भरणं बन्धनकारक असतं. मात्र मुद्दलाची संपूर्ण रक्कम तो एकत्रितपणे कर्जफेडीच्या ठरलेल्या तारखेला देऊ शकतो.

३. नियमित मासिक हप्ता : यामध्ये कर्जफेडीची मुदत निश्चित केली जाते. कर्जाचं मुद्दल आणि कर्जफेडीच्या मुदतीत त्यावर होणारं एकूण व्याज यांच्या आधारे परतफेडीचा मासिक हप्ता ठरवला जातो. तो हप्ता इतर सर्वसामान्य कर्जांच्या हप्त्यां प्रमाणेच, नियमितपणे भरत कर्जाची परतफेड केली जाते .

४ अंशिक पैसे भरण्याची सुविधा : यामध्ये कर्जाचे मुद्दल व्याज आणि कर्जाची मुदत यांचा विचार करून कर्जफेडीची एकूण रक्कम ठरवली जाते. त्याच बरोबर कर्जाच्या संपूर्ण परतफेडीची तारीख निश्चित केली जाते. कर्जदार त्या तारखेपूर्वी सुद्धा, त्याच्या सोयी आणि सुविधेप्रमाणे, कर्ज परतफेडीचे पैसे भरू शकतो. कर्जफेडीच्या तारखेपर्यंत त्याने एकदाही पैसे भरले नाहीत तरीही बँक हरकत घेत नाही. मात्र ठरलेल्या तारखेला संपूर्ण रक्कम चुकती करणं अनिवार्य असतं.

हेही वाचा : Money Mantra : भांडवली संपत्तीत कशाचा समावेश होतो? त्यानुसार करनियोजन कसे करावे?

काही तासांतच कर्ज मिळतं

गोल्ड लोन अतिशय सहजतेने मिळू शकते. त्यासाठी कोणतीही विशेष कागदपत्र लागत नाहीत किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडायची गरज नसते. इतकंच नव्हे तर कर्ज मंजूर करताना कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची आर्थिक पत सुद्धा तपासली जात नाही. यामुळे अर्ज केल्यानंतर अगदी काही तासात सुद्धा कर्जाची रक्कम अर्जदाराच्या हातात मिळू शकते. कर्जाच्या परत फेडीसाठी अनेक पर्याय दिले जातात . गोल्ड लोन मुदतीपूर्वी फेडल्यास त्या मुदतपूर्व फेडी साठी बँक कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारत नाही . गोल्ड लोनचे व्याजदर सुद्धा इतर म्हणजे वैयक्तिक कर्ज किंवा तत्सम अन्य कर्जाच्या तुलनेत अल्प असतात. हे सर्व गोल्ड लोनचे सकारात्मक पैलू आहेत.