पैसे कुणाला नको असतात, मिळतील तितके कमीच! वैरागी सोडले तर सगळीच माणसे पैसा मिळावा आणि तो आयुष्यभर पुरावा यासाठी एक तर हात-पाय (स्वतःचे आणि दुसऱ्यांचेसुद्धा) नाहीतर डोके चालवत असतात. अपेक्षित पैसे मिळाले की, आपण खूश असतो, पण अचानक धनलाभ होतो तेव्हा मात्र प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. आता एखादी लॉटरी लागली आणि त्यावर ३० टक्के कर भरावा लागला तरीसुद्धा लॉटरी मिळाल्याचा आनंद हा जास्त असतो. तितकाच पगार मिळाला तरी तेवढा आनंद काही होत नाही. कारण पगार तर मिळणारच होता, पण लॉटरी अनपेक्षित असते. कधी-कधी कंपनीकडून ‘स्पेशल बोनस’ मिळाला किंवा अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीला मिळालेले वारसाहक्कातील पैसे किंवा संपत्ती, एखाद्याला अचानकपणे मिळालेले प्रायोजकत्व – हे सर्व भारावून टाकणारे असते. त्याच ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या अकाली निधनानंतर मिळणारी विम्याची रक्कम जरी आनंद देत नसली तरीसुद्धा आर्थिक आधार देणारी असल्याने त्यासंबंधीच्या भावना थोड्या वेगळ्या असतात. निवृत्तीच्या वेळी सुद्धा भरपूर पैसे हातात येतात, परंतु त्याबरोबर कधी सुटकेची भावना असते, तर कधी चिंता! पैसे तेच असतात मात्र ते कुठून, कसे, कधी आणि किती येतात त्यानुसार त्याला भावना जोडल्या जातात. याला विभागीकरण म्हटले जाते आणि हा वर्तणूक वित्त म्हणजेच बिव्हेरियल फायनान्सचा विषय आहे. मुळात पैसे हे पैसे असतात आणि त्यांचा उपयोग हा आर्थिक आणि भावनिक ध्येयपूर्तीसाठी करायचा असतो हे भान ठेवणे आवश्यक आहे. तर आजच्या लेखातून आपण अशा प्रकारे मिळालेल्या धनलाभाचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Money Mantra : न्यूरोइकॉनॉमिक्स काय असतं?

धनलाभ किती रकमेचा आहे? आणि तो नियमित मिळकतीपेक्षा किती जास्त आहे? यावर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा हे निश्चित करावे लागते. लाखोंच्या मिळकतीमध्ये हजाराचा नफा काहीच फरक पाडत नाही. पण तरीसुद्धा तो उगीच खर्च करून वाया घालवण्यापेक्षा आर्थिक ध्येयासाठी चांगल्या ठिकाणी गुंतवला तर चांगलेच. मात्र अचानक पैसे मिळाले की एकतर उगीच खर्च करत सुटतात किंवा जास्त जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतणवूक करतात, असे बऱ्याचदा निदर्शनास येते. फुकट मिळालेले पैसे वाया गेले तरी चालतात, कारण नाहीतरी ते मेहनतीने थोडेच कमावले असतात अशी काही भावना यामागे असते.

सर्वात पहिले काम जे आपण करायचे आहे ते म्हणजे आर्थिक नियोजन आणि ध्येय व्यवस्थापन. लॉटरीतून मिळालेले पैसे कोणत्या ध्येयासाठी वापरता येतील आणि त्यासाठी कोणता गुंतवणूक पर्याय निवडावा हे प्रत्येकाला माहीत असेलच असे नाही. शिवाय असे पैसे मिळाले की, त्याला लवकर पाय फुटतात किंवा आधी कधी न दिसणारे मित्र/मैत्रिणी, नातेवाईक, सल्लागार जास्त प्रमाणात भेटतात. तेव्हा जरा जपूनच वागलेले अधिक चांगले. मनोरंजन किंवा इतर आवश्यक नसलेल्या कार्यासाठी आपण पगारातून करू शकत नाही. कारण अशी कामे फुकटच्या पैशातून करावी, असे बहुतांश लोक विचार करतात. पण इथेच खरी मेख आहे. गुंतवणुकीला जितका जास्त वेळ मिळतो, तेवढी ती फुलते आणि परतावे देते. तेव्हा आताच खर्च करण्यापेक्षा पुढच्या कुठल्यातरी आर्थिक ध्येयपूर्तीसाठी पैसे वापरले तर तो आनंद क्षणिक न राहता चिरकाल राहू शकेल. पुढे अशा पैशांमधून केलेल्या गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घेणेदेखील गरजेचे आहे. शिवाय आवश्यकतेनुसार त्यात बदल केल्याने नुकसान कमी होऊन परतावादेखील चांगला मिळेल.

हेही वाचा : Money Mantra : कर्ज का, केव्हा आणि कसे घ्यावे?

वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीमुळे लोक धनाढ्य तर झाली, परंतु ते पैसे कसे हाताळायचे हे माहीत नसल्याने आधीचे कोट्यधीशनंतर लखपती होऊन पुढे गरीबदेखील झालेले आहेत. याचप्रमाणे नवउद्यमींमध्ये (स्टार्टअप) पगाराबरोबर कंपनीचे समभागदेखील देण्यात येतात. पुढे जाऊन ती कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली की, तिच्या समभागांची किंमत वाढते. तेव्हा अचानक भरपूर पैसे त्यातून मिळतात. शिवाय एखादी बहुराष्ट्रीय कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना बाहेरच्या बाजारात व्यवहार होणाऱ्या कंपन्यांचे समभाग देते. काळानुसार कंपनीची वाढ झाली तर या समभागांना चांगला भाव येतो. तेव्हासुद्धा ते विकून पैसे आपल्या देशात आणता येतात. मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत मंडळींना याचा भरपूर फायदा होतो, परंतु हे समभाग कधी विकायचे यासाठी मुळात भांडवली बाजाराचे आणि कंपनीच्या पुढील कामगिरीबाबत ज्ञान आवश्यक आहे. कारण असे समभाग एकदा विकले की, साधारणपणे परत घेता येत नसतात. एकदा पैसे मिळाले की, त्यातून एकतर कर्ज फेडता येऊ शकते किंवा गुंतवणूक करून ते वाढवता येतात.

हेही वाचा : Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

आजकाल लवकर निवृत्त होण्याची इच्छा अनेक चाळिशीतल्या लोकांमध्ये दिसते. एखाद्या उद्योगातून भरपूर पैसे कमावून झालेले असतात किंवा कामाच्या ठिकाणी भरपूर पैसे एकरकमी मिळणार असतात. याआधी लोक ३५-४० वर्षे नोकरी करायची आणि २०-२५ वर्षे निवृत्ती जीवन जगायचे, परंतु आता हे चित्र बदलले आहे. सध्या २०-२५ वर्षे काम करतात आणि पुढे ३५-४० वर्षे निवृत्तीचे आयुष्य जगतात. या मोठ्या निवृत्तीचा काळात अनेक आर्थिक ध्येय साध्य करायची असतात. सतत वाढणारी महागाई लक्षात घेऊन त्यापेक्षा अशी परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. परिणामी, त्यानुसार गुंतवणूक व्यवस्थापन महत्त्वाचे असते. हे सर्व करत असताना आपली जीवनशैलीसुद्धा तीच कायम राखायची असते. एवढ्या मोठ्या काळासाठी नियोजन करणे अवघड असते. पुन्हा मिळकत सुरू करता आली नाही तर, मग पुढील १०-१५ वर्षांसाठी त्या निधीमध्ये जीवन जगणे कठीण असते. नायक-नायिका किंवा खेळाडू यांची ठरावीक कार्यकाळात कारकीर्द असल्यामुळे त्यांना छोट्या कालावधीत भरपूर पैसे मिळतात. ते योग्य प्रकारे गुंतवले तर आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ असतात.

असे पैसे हातात यायच्या आधी खालीलप्रमाणे गोष्टी कराव्यात:

१. किती पैसे मिळणार?

२. त्यावर किती कर लागणार?
३. उद्गम कर किती कापला जाणार?

४. कर कमी करण्यासाठी कोणते पर्याय आहेत?
५. कर विवरण भरावे लागणार का?

६. इतर कुणाला पैसे द्यावे लागतील का?
७. कोणत्या आर्थिक ध्येयासाठी पैसे वापरले जाऊ शकतील?

८. जर स्थावर मालमत्ता मिळाली तर ती विकायची, भाड्याने द्यायची, उद्योगासाठी वापरायची की स्वतः त्यात राहायचे?
९. कुठल्या सरकारी कार्यालयात जाऊन काही नमूद करावे लागणार आहे का? त्याचा खर्च किती असेल?

१०. मिळालेल्या पैशांमधून कोणाची देणी फेडायची आहेत का?
११. आपली जोखीम क्षमता काय आहे?

१२. कोणते गुंतवणूक पर्याय आपल्या ध्येयपूर्तीसाठी योग्य आहेत? त्यांचे खर्च, त्यांची जोखीम, रोकड सुलभता आणि कर कार्यक्षमता समजून घ्यावी.
१३. आपल्याला गुंतवणुकीतील खाच-खळगे समजतात का?
१४. कोणत्या वकील, करतज्ज्ञ आणि गुंतवणूक सल्लागाराकडे जाणे योग्य राहील?

हेही वाचा : Money Mantra : दिवाळीपूर्वीच EPFO ​​खातेदारांना गिफ्ट, व्याजाचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात, ‘अशा’ पद्धतीनं बॅलन्स तपासा

हे पैसे मिळाल्यानंतर खालीलप्रमाणे त्याचे व्यवस्थापन करता येईल:

१. आर्थिक नियोजनानुसार गुंतवणूक करावी.
२. करदायित्व असल्यास त्याची रक्कम एकतर अग्रिम कर म्हणून भरावी किंवा कर विवरण भरण्यासाठी बाजूला ठेवावी.
३. जर कर्ज जास्त आवश्यक असेल तर गुंतवणूक न करता पहिले दायित्व कमी करावे. मग उरलेल्या पैशांमधून गुंतवणूक करावी.
४. कधी चुकीची गुंतवणूक झालीच तर त्यातून लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसान घेऊन कसे बाहेर पडता येईल याचे मार्ग शोधा.
५. नियमितपणे आपल्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीचा आढावा घ्या.

हेही वाचा : Money Mantra : निफ्टी स्थिरावला.. पुन्हा एकदा तेजीची अपेक्षा !

अतिआनंद आणि अतिदुःखामध्ये माणसे आपली निर्णय घ्यायची क्षमता गमावतात. म्हणून आर्थिक निर्णय हे भावनिक न होता घ्यायचे असतात. भरपूर पैसे मिळाले की, आपल्या सगळ्या समस्या सुटतात असे नसते. मुळात मिळेलेले पैसे आपण कसे वापरतो यावर आपले आर्थिक यश ठरते. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर, तज्ज्ञांचा सल्ला, भावनांवर संयम आणि नाही म्हटले तरी नशीब हे सर्व आपल्या आर्थिक आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. म्हणून कशाला, कोणत्या वेळी आणि किती महत्त्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. आपल्याकडे “दैव देते आणि कर्म नेते” अशी म्हण प्रसिद्ध आहेच.

आता सर्वत्र सणोत्सवाचे वातावरण आहे. आता दिवाळी, भाऊबीज आणि पाडव्यानिमित्त जी रक्कम मिळेल, ती लगेच खर्च न करता ती कुठे गुंतवता येईल याबाबत नक्की विचार करा. याचबरोबर घरातील लहान मुलांना गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करावे. सरस्वतीकडून मिळालेल्या ज्ञानातून, गणपतीकडून मिळालेली बुद्धी वापरून, आपल्याकडील लक्ष्मी वाढण्यासाठी या दिवाळीमध्ये आपल्या समृद्धीची पायाभरणी करून घ्या.

तृप्ती राणे
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.