झोकदार वळणे घेत ती लाल रंगाची ट्रेन बर्फाळ पर्वतराजीतून दुडूदुडू पळत होती. ‘माउंट टिटलीस’ या जगातील सर्वात उंच अशा पर्वत शिखरावरची ती ट्रेन!
गाडी स्टेशनवर थांबली. सर्व मंडळी समोरच्या बर्फाळ पठारावर विखुरली. Wow! तनया – मुग्धा किंचाळल्या. समोर ‘DDLJ’ च्या (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) हिट जोडीचा, ‘शाहरुख-काजोल’ चा १० फुटी कटआऊट!
मंडळी! तनया, मुग्धा दोघी शाळेपासूनच्या मैत्रिणी. अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनला पण एकत्र. दोघींना पण फिरायची आवड. पावसाळ्यात तर हमखास छोटासा ग्रुप तयार करून धमाल करतील. नवनवे स्पॉट शोधतील. तर, डिसेंबर जानेवारीत ट्रेकिंग कॅम्प जॉईन करतील. दोघींना काही वर्षापूर्वीच जॉब लागला होता. त्यांनी ठरवले होते की ह्या बॅचलर लाईफ मध्ये मस्त हिंडून फिरून घ्यायचे. घरातही त्यांच्यावर तशी काही विशेष जबाबदारी नव्हती,त्यामुळे पगारातून बऱ्यापैकी रक्कम बाजूला पडत होती. मागच्या पावसाळ्यात त्यांनी ‘काजवा फेस्टिवल’ अनुभवला. निसर्गाची अशी अद्भुत किमया त्यांना फार आवडली.
तर, जानेवारीत दोघी लडाखला गेल्या. तिथल्या ‘झंस्कार’ नदीवरील ‘चद्दर ट्रेक’ एकदम अफलातून ! उणे ३० तापमान…. (Minus 30 Degree)!
एकदम भन्नाट ट्रेक !
आणखी वाचा: Money Mantra: वाहन विमा- ‘नो क्लेम बोनस’ म्हणजे नेमकं काय?
मंडळी आता म्हणाल या सर्वांचे आज काय?
आपली हौस,आपले छंद हे जाणीवपूर्वक जपायचे असतील, जोपासायचे असतील तर राव, खिसा गरम हवा ना ? म्हणजेच पैसे हवेत ना ?
आपण काय कराल? तनया, मुग्धा सारखी जर आपली हिंडण्याफिरण्याची हौस असेल तर लहान सहलींकरता (Short Trip), ३-४ वर्षांच्या नियोजनासाठी (Planning) आपण म्युच्युअल फंडातील सिप (SIP) चा पर्याय निवडू शकता. त्यासाठी आपण ‘समभाग व रोखे’ (Equity and Debt) यांचा संमिश्र, ‘Hybrid Fund’ निवडलात तर उत्तम! कारण त्यामध्ये १०० टक्के समभागामधील (Equity) असणारी जोखीम तुलनेने कमी असते.
आणि हो! सोबत आपण LIC चा ‘New Money Back’ प्लॅन विचारात घ्यावा.
या योजनेत ५ वर्षांच्या अंतराने मिळणारी दाव्याची रक्कम (Survival Benefit) ही खात्रीपूर्वक (Guaranteed) व पूर्णपणे करमुक्त (Tax-Free) असेल.
मंडळी, ह्याच योजनेच्या बळावर तनया व मुग्धा ने युरोपची मोठी ट्रीप आखली. थोडक्यात लहान-सहान भटकंतीसाठी म्युच्युअल फंडातील युनिट्स विकून नियोजन करता येईल आणि मोठ्या सहलीसाठी ‘New Money Back!’
ह्या योजनेत पुढे मुदती नंतर बोनससहित परिपक्कव दावाही (Maturity Claim) आहेच आणि तोही नियमानुसार करमुक्त (Tax-Free) असेल.
काय म्हणता?
संपर्क: milind_consultant@nishchintconsultant.com