लेखाचे शीर्षक वाचून एखाद्या व्यक्तीबद्दल हा प्रश्न विचारला आहे की काय? अशी शंका तुम्हाला आली असेल, पण तसे नसून या प्रश्नातील ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची कंपनी आहे. ज्या कंपनीच्या समभागांमध्ये केलेली गुंतवणूक घसघशीत वाढावी म्हणून ठेवली, त्या कंपनीच्या समभागांची किंमत अचानक कमी व्हायला लागली, तर तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडू शकतो. म्हणूनच आज समजून घेऊया कंपनीचे व्यवसायाचे प्रारूप म्हणजेच हे ‘बिझनेस मॉडेल’ कसे अभ्यासायचे?

एखाद्या कंपनीचा व्यवसाय यशस्वी होणे आणि अयशस्वी होणे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो, तो कंपनीच्या मूलभूत बिझनेस मॉडेल म्हणजेच व्यवसायाच्या प्रारूपाचा. कंपनी कोणत्या वस्तूंची निर्मिती करते? कोणत्या सेवा पुरवते? कंपनीचे मुख्य स्पर्धक कोण आहेत? कंपनीच्या उत्पादनांना ती उत्पादने कितीही दर्जेदार असली तरी, बाजारात मागणी आहे का? कंपनी ज्या बाजारपेठेत व्यवसाय वृद्धी करण्यासाठी पैसे गुंतवते आहेत त्या देशाची बाजारपेठ भूतकाळात कशी होती? त्या देशातील राजकीय परिस्थिती नवीन उद्योग विकसित व्हायला फायदेशीर आहे का? अशा एक ना अनेक घटकांचा विचार गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला करावा लागतो.

stock market investment tips for Indians
बाजार रंग : बाजारासाठी अडथळ्यांची शर्यत
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
How to choose a mutual fund, mutual fund,
फंडभान : म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी?
CRR, CRR reduction, CRR latest news,
ससा कासवाची गोष्ट, ‘सीआरआर’ कपात लाभदायी?
volatility , stock market, stock market news,
धन जोडावे : शेअर बाजारात अस्थिरतेची नांदी?
Disruption, entrepreneur, startup ,
 Disruption- मन्वंतर: प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली! 
My Portfolio, Indiamart Intermesh Limited, buying and selling goods,
माझा पोर्टफोलिओ: वस्तू खरेदी-विक्रीचा लाभदायी विश्वासू मंच, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड (बीएसई कोड ५४२७२६)
Image of UPI payment logo
New Rule In 2025 : यूपीआय पेमेंट ते EPFO… एक जानेवारीपासून ‘या’ नियमांत होणार बदल
portfolio 2024
पोर्टफोलिओचे वार्षिक प्रगती पुस्तक : ‘माझा पोर्टफोलियो’ आढावा २०२४

काही फसले, काही यशस्वी

खूप मोठा गाजावाजा करून बाजारात आणलेल्या टाटा मोटर्स या कंपनीच्या नॅनो या गाडीने कंपनीला जेवढा नफा दिला असेल, त्यापेक्षा जास्त मनस्ताप कंपनीला आणि गुंतवणूकदारांना दिला. पश्चिम बंगालमधील सिंगूर येथून सुरू झालेली कारखान्याची गाडी अखेरीस संघर्षानंतर आणि बराच पैसा खर्च करून गुजरातमधील सानंद येथे जाऊन थांबली. तोपर्यंत बाजारपेठ बदलली होती. लोकांच्या मानसिकतेत बदल झाला होता. परिणामी एक सोन्यासारखे विकसित केलेले उत्पादन ‘शहीद झाले’ असेच म्हणावे लागेल.

हेही वाचा – Money Mantra: प्राप्तिकराची E-Appeal योजना आहे तरी काय? (उत्तरार्ध)

टाटा उद्योग समूहाने युरोपातील ‘कोरस स्टील’ ही बलाढ्य कंपनी विकत घेतली. ‘जॅग्वार आणि लँड रोव्हर’ ही आलिशान वाहनांची नाममुद्रादेखील ताब्यात घेतली. वर्ष २००८ मध्ये जागतिक वित्तीय आणि बँकिंग संकटाला सुरुवात झाली. २००८ ते २०१६ या कालावधीत टाटा स्टील आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे समभाग कसे परतावे देत होते, याची आकडेवारी एकदा तपासून पाहा. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात या दोन्ही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. मात्र ते सोनेरी दिवस यायला बराच कालावधी जावा लागला. जर तुम्ही अल्प किंवा मध्यम काळासाठी गुंतवणूक करणार असाल तर अशा चक्रामध्ये तुम्ही अडकला तर तुमचे पैसे दामदुप्पट होणे सोडाच मूळ गुंतवलेली रक्कमही बँकेत मिळते त्या दराने वाढायला अधिक वेळ लागू शकतो. म्हणून कंपनीचे बिझनेस मॉडेल समजणे अत्यावश्यक आहे.

एखाद्या कंपनीने आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल करून काही नव्या व्यवसायांमध्ये उतरणार असल्याचा मानस जाहीर केला, तर ते व्यवसाय प्रत्यक्षात सुरू व्हायला किती वर्षं लागणार आहे? याचा गुंतवणूकदारांनी अभ्यास करायला पाहिजे. विजेवर चालणारी उपकरणे बनवणारी एखादी कंपनी रेफ्रिजरेटर, एसी, स्वयंपाक घरातील विद्युत उपकरणे या क्षेत्रात आपले बस्तान बसवणार असेल तर त्यांचे स्पर्धक कोण आहेत? बाजारपेठेत दमदार प्रवेश करण्यासाठी कंपनीने स्वतःचे पैसे गुंतवले आहेत? की ते पैसे कर्जाऊ उभे करून कंपनी व्यवसाय मोठा करणार आहे? याकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे २०२३ वर्षात कर्जाऊ पैसे उभारून नवीन व्यवसाय घसघशीत नफा देईपर्यंत आणि तो समभागांच्या बदलत्या किमतीमध्ये परावर्तित होईपर्यंत २०२७ साल उजाडणार असेल तर तुम्ही एवढी वर्षं थांबू शकणार असाल तरच या समभागांमध्ये गुंतवणूक हवी. काही कंपन्या मोठ्या गाजावाजा करून बाजारात येतात. त्यांच्या नफ्याचे आकडेही उत्तम असतात पण तरीही गुंतवणूकदारांना समभागातून फारसे हाती लागत नाही. ती कंपनी सध्या काय करते? त्यावर कुणाचे नियंत्रण आहे? त्या क्षेत्राची स्थिती कशी आहे? याचा अभ्यास करायला हवा. कंपनी कुणाच्या आशीर्वादाने चालत नाही ना? म्हणजे एखाद्या सरकारी कंत्राटावर अनेक वर्षे नफा होत होता. सरकार बदलले आणि कंत्राट रद्द झाले मग कंपनीकडे आपला व्यवसाय राखण्यासाठी कोणत्या योजना आहेत आणि जर तसे काहीच नसेल तर अशा बिनभरवशाच्या कंपनीमध्ये आपण किती काळ पैसे गुंतवून ठेवायचे याचा विचार गुंतवणूकदार म्हणून नक्कीच करायला लागेल.

गुंतवणूकदारांचा गृहपाठ

प्रत्येक कंपनीच्या वार्षिक अहवालाचा अभ्यास गुंतवणूकदारांनी करणे अत्यावश्यक आहे. मुले शाळेत जायला लागली की पाढे पाठ करणे जितके महत्त्वाचे समजले जाते तेवढेच महत्त्व या वार्षिक अहवालाला आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये थापेबाजी चालत नाही. एखाद्या नेत्याने जाहीर सभेमध्ये केलेले वक्तव्य आणि त्याच नेत्याने संसदेच्या किंवा विधान मंडळाच्या विधिमंडळाच्या सभागृहात केलेले वक्तव्य यापैकी सभागृहातील वक्तव्य ही जबाबदारी बनते, त्याचप्रमाणे कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी कंपनी भागधारकाला जबाबदार असते. ‘मॅनेजमेंट डिस्कशन अँड ॲनालिसिस’ असा अनुक्रमणिकेतील भाग प्रत्येक गुंतवणूकदारांनी वाचायला हवा. कंपनीची सद्य:स्थिती काय आहे? त्यातील संभाव्य अडथळे कोणते? ते अडथळे दूर करण्यासाठी कंपनी काय करू इच्छिते ? कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये कोणते बदल घडून येत आहेत याची इत्थंभूत माहिती यात दिलेली असते. कंपनीने काही महत्त्वाची व्युहरचना योजना बदलली असेल तर त्याची माहितीसुद्धा भागधारकांना द्यावी लागते. बायजू या कंपनीच्या मूल्यांकनाच्या संदर्भात अनेक बऱ्या वाईट बातम्या बाजारात येत आहेत. टाळेबंदीच्या काळात आता शिक्षण म्हणजे फक्त ऑनलाइनच होणार आणि भविष्यातही ऑनलाइन शिक्षणाची बाजारपेठ तेजीत असणार अशी हवा निर्माण करून या कंपनीने आपले बस्तान बसवले. आता दर आठवड्याला कंपनीचे मूल्यांकन किती आहे? त्यामध्ये कोण किती पैसे गुंतवणार आहे याची वेगवेगळी आकडेवारी समोर येते.

हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा : मुलांसाठी गुंतवणूक करताना

पोर्टफोलिओ आणि बिझनेस मॉडेल

आपल्या एकूण पोर्टफोलिओपैकी सगळेच समभाग एका प्रकारचे असू शकत नाहीत. लाटेवर स्वार होऊन एखाद्या समभागात दणदणीत नफा कमावता येतो, पण ती लाट ओसरण्याच्या आत आपले पैसे काढून घ्यायचे असतात. हे नेमके कधी काढायचे यासाठी तरी गुंतवणूकदारांनी व्यवसाय स्वरूपाचा अभ्यास करायला हवा. बजाज उद्योग समूह दोन गटांत विभागला गेला आणि त्यानंतर वित्त क्षेत्र, वित्त व्यवहार यामध्ये हळूहळू बजाज उद्योग समूहाने कसा व्यवसाय वाढवत नेला याचा अभ्यास गुंतवणूकदारांनी केला तर त्यांना बिझनेस मॉडेल काय असते याचा अंदाज येऊ शकेल.

‘लार्सन अँड टुब्रो’ या कंपनीच्या वीस वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्याचाही गुंतवणूकदारांनी समभाग विकत घेण्यासाठी नव्हे तर गृहपाठ म्हणून अभ्यास करायला निश्चितच हरकत नाही.

Story img Loader