सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फिनान्शिअल प्लानर

डिजिटल व्यवहार कसे करावेत? या लेखाच्या पहिल्या दोन भागांमध्ये आपण नेटबँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड, त्याप्रमाणे यूपीआय सारखी डिजिटल पेमेंटची सोय देणारे विविध प्लॅटफॉर्म्स यांची माहिती घेतली. आता आपण त्यापुढे जावून अलीकडेच भारत सरकारने रिझर्व्ह बँकेमार्फत सुरू केलेल्या डिजिटल रुपयाची माहिती समजून घेणार आहोत.

Why did the stock market fall before Diwali
Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
unified pension scheme
Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?
Gold will cross the mark of 85 thousand in Diwali
दिवाळीत सोने ८५ हजारांचा टप्पा ओलांडणार! आजचे दर बघून ग्राहकांमध्ये…
Gold Price Today
४५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सोन्याने दिला भरघोस परतावा; २०२४ मध्ये तब्बल ३२.५ टक्क्यांचा नफा
fraud with businessman in Buldhana by investing in stock market
सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा

डिजिटल रुपी व डिजिटल पेमेंट

१ नोव्हेंबर २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयाची सुरुवात केली. प्रारंभी डिजिटल रुपयाचा वापर केवळ घाऊक व्यवहारांसाठीच होता. मात्र १ डिसेंबर २०२२ पासून किरकोळ व्यवहारातसुद्धा डिजिटल रुपया वापरता येऊ लागला आहे. ज्याप्रमाणे गूगलपे/ फोनपे/ भीम या यूपीआय आधारित पेमेंट पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात अगदी सहज प्रमाणात होऊ लागला आहे व त्यांचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालला आहे तसा डिजिटल रुपीचा सध्या नगण्य असलेला वापर भविष्यात वाढत जाईल, अशी अपेक्षा आहे. अजूनही लोकांच्या मनात डिजिटल रुपीबाबत काहीसा संभ्रम आहे.

नेमका फरक काय?

डिजिटल रुपी व गूगलपे/ फोनपे/ भीम/ एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस यांसारख्या डिजिटल पेमेंटमध्ये नेमका काय फरक आहे याची लोकांना पुरेशी माहिती नाही. त्या दृष्टीने यातील नेमका फरक काय आहे, हे आपण पाहू.

१) डिजिटल रुपी हे रिझर्व्ह बँकने आणलेले चलन असून ते रिझर्व्ह बँकेने वितरक म्हणून नेमलेल्या नऊ बँकांमार्फत डिजिटल टोकनच्या स्वरूपात वितरित केले जाते. त्याला आपल्या नेहमीच्या चलनासारखी सरकारची हमी आहे, याउलट यूपीआय (डिजिटल पेमेंट) हे चलन नसून ती केवळ पेमेंट करण्याची सुविधा आहे.

२) मात्र डिजिटल रूपी हे डिजिटल टोकन आपल्या स्मार्टफोनवर डिजिटल वॉलेटमध्ये डाउनलोड करून त्यात ठेवता येते. डिजिटल रुपीची देवाणघेवाण आपल्या प्रचलित चलनासारखी आपापसात होत असते. यामध्ये यूपीआय पेमेंटसारखी देणाऱ्या व घेणाऱ्याच्या बँकची मध्यस्थी नसते. ज्याप्रमाणे एकाच्या पाकिटातून रक्कम दुसऱ्याच्या पाकिटात जाते त्याप्रमाणे डिजिटल रुपी एकाच्या टोकनमधून दुसऱ्याच्या टोकनमध्ये डिजिटल स्वरूपात हस्तांतरित होत असते.

३) उभयतांमधील व्यवहार रोखीच्या व्यवहाराप्रमाणे गुप्त राहतात.

४) यूपीआय ही केवळ पेमेंट सुविधा आहे व याचा वापर केवळ पेमेंट पुरताच मर्यादित आहे. त्याला स्वत:चे असे मूल्य नाही. याउलट डिजिटल रुपी हे एक चलन असून त्याला स्वत:चे मूल्य आहे या चलनाचा उपयोग/ वापर विविध कारणांसाठी करता येईल.

५) डिजिटल रुपीत पेमेंट करताना प्रचलित रोखीच्या व्यवहारासाठीचे जे ‘पॅन’संबंधी नियम आहेत, ते सर्व लागू असतील. ६) डिजिटल वॉलेटमध्ये आपल्याला डिजिटल रुपी टाकावे (लोड) लागतात. यासाठी डिजिटल वॉलेट आपल्या बँक खात्याशी सलग्न (लिंक) करता येते. मात्र लोड केलेले डिजिटल चलन बँकेच्या मध्यस्थी शिवाय वापरता येते. याउलट यूपीआय माध्यमातून होणारे पेमेंट बँकेमार्फतच होते व यात देणाऱ्याची व घेणाऱ्याची बँक सहभागी असते.

६) डिजिटल रुपीचे व्यवहार परस्परात होत असल्याने पेमेंट सेटलमेंटचा प्रश्नच उद्भवत नाही व या अर्थी हे व्यवहार जलदगतीने होतात. तसे अन्य डिजिटल पेमेंटमध्ये होत नाही, यात सेटलमेंट व्हावी लागते व यास काही कालावधी लागतो. थोडक्यात डिजिटल रुपी हे एक अधिकृत चलन असून याचा वापर जसा प्रचलित चलनाचा रोखीचे व्यवहार करताना होतो अगदी तसेच करता येणार आहे.

क्रिप्टो करन्सी

क्रिप्टो करन्सी याला आभासी चलन असे म्हणतात. आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी याचा वापरू शकता. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी चलन निर्माण केले जाते. सध्या बिटकॉइन, इथेरियम, लिटक्वाइन, रिपल एक्सआरपी, कार्डनो या काही प्रमुख क्रिप्टो करन्सी वापरत असल्याचे (याव्यतिरिक्तही आणखी क्रिप्टो करन्सी आहेत) दिसून येतात.अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात.

हेही वाचा… Money Mantra: UPI, ई- वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्ड आणि बरेच काही… कसे कराल डिजिटल व्यवहार? (भाग दुसरा)

या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही आणि नियमकायदे कानून यांचे बंधनही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

हेही वाचा… Money Mantra: डिजिटल व्यवहार कसे करावेत? (भाग पहिला)

आता तर या आभासी चलनांचे विनिमय बाजारमंचही उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. असे असले तरी क्रिप्टो करन्सीच्या किमती आपल्या नेहमीच्या करन्सीप्रमाणे स्थिर नसतात व त्यात वेळोवेळी चढउतार होत असल्याने यात जास्त जोखीम असते. म्हणूनच सामान्य माणसाने यापासून दूर राहिलेलेच बरे. भारतातही सरकारने आणि रिझर्व्ह बँकेने स्वत:चे आभासी चलन वापरात आणले असले तरी क्रिप्टोसारख्या खासगी आभासी चलनाला मान्यता दिली गेली असा त्याचा अर्थ होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.