National Pension System Nominee Update: सेवानिवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने नॅशनल पेन्शन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही एक मजबूत रिटायरमेंट फंड तयार करू शकता. याबरोबरच या योजनेद्वारे तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळू शकतो. जर एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत खात्यात जमा केलेले पैसे नॉमिनीकडे जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

NPS खात्यात नॉमिनीचे नाव टाकणे आवश्यक

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PEDRA) च्या नियमांनुसार, एक NPS खातेधारक एका वेळी त्याच्या खात्यात किमान तीन नामांकित व्यक्ती जोडू शकतो. तसेच निधीच्या संपूर्ण १०० टक्के वाट्यापैकी खातेदार त्याच्या गरजेनुसार तीन नामांकित व्यक्तींमध्ये निधी वितरित करू शकतो. खातेदाराचा मृत्यू झाल्यास हे पैसे नॉमिनीला दिले जातात. नॉमिनी जोडताना प्रत्येकाचे नाव बरोबर टाका, अन्यथा तुम्हाला नंतर पैशांवर दावा करण्यात अडचण येऊ शकते.

हेही वाचाः मोझांबिकमधून तूर डाळीची अखंड निर्यात सुनिश्चित करण्यासाठी केंद्राची मोझांबिकच्या उच्चायुक्तांशी चर्चा

या लोकांना NPS खात्यात नॉमिनी केले जाऊ शकते

PEDRA च्या नियमांनुसार, पुरुष NPS खातेधारक आपली पत्नी, मुले, भागीदार, पालक किंवा त्याच्या मृत मुलाच्या पत्नीचे नाव नॉमिनी म्हणून देऊ शकतो. तर एखादी महिला तिचा पती, मुले, आई-वडील, सासरे आणि तिच्या मुलाची विधवा आणि मुले यांना खात्यात नामनिर्देशित करू शकते. NPS खातेधारक त्याला हवे तेव्हा नामनिर्देशित व्यक्तीचे नाव अपडेट करू शकतो. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. नवीन नॉमिनीचे नाव अपडेट झाल्यानंतर जुने नाव आपोआप रद्द होणार आहे.

हेही वाचाः Mango Export : एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत आंब्याच्या निर्यातीत १९ टक्क्यांची वाढ, भारताने अमेरिकेला केली सर्वाधिक निर्यात

NPS खात्यात नॉमिनी कसे अपडेट करायचे?

  1. NPS खात्यात नॉमिनी अपडेट करण्यासाठी प्रथम त्याची अधिकृत वेबसाइट https://cra-nsdl.com/CRA/ ला भेट द्या.
  2. पुढे येथे तुम्हाला Demographic Changes चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. यानंतर तुम्ही वैयक्तिक तपशील बदलण्याचा पर्याय निवडा.
  4. येथे जोडा/अपडेट नामांकन पर्यायावर जा आणि कन्फर्म पर्याय निवडा.
  5. नंतर येथे तुमचा NPS टियर पर्याय निवडा आणि तुमची नामांकन प्रक्रिया पूर्ण करा.
  6. यानंतर तुम्हाला नॉमिनीचे नाव, नातेसंबंध, जन्मतारीख आणि इतर उर्वरित माहिती अपडेट करावी लागेल.
  7. पुढे तुम्हाला नोंदणीकृत नॉमिनीला निधीचा किती हिस्सा मिळेल हे देखील टाकावे लागेल.
  8. नंतर तुमच्या NPS खात्याशी लिंक केलेल्या नंबरवर OTP येईल, तो एंटर करा.
  9. त्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी करावी लागेल आणि मग तुमच्याकडे आधारशी लिंक केलेल्या नंबरवर OTP येईल, तो पुन्हा एकदा एंटर करा.
  10. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुमचे NPS नामांकन पूर्ण होईल.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to update nominee in nps account instantly learn very simple process vrd