गुंतवणूकदारांच्या पदरात ज्या म्युच्युअल फंडांनी दोन दशके भरघोस परताव्याचे माप टाकले, त्या फंडात ‘एचएसबीसी फ्लेक्झीकॅप फंडा’चा समावेश आहे. फंड अस्तित्वात येऊन २० वर्षे आणि ७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. फंडाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी २००४ रोजी गुंतविलेल्या १ लाखाचे ११ जुलै २०२४ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ’मध्ये २१.४१ लाख झाले असून पहिल्या दिवसापासून ५००० रुपयांची ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ला (एसआयपी) सुरुवात केलेल्या एकूण १२.२५ लाख रुपये गुंतवणुकीचे ११ जुलै २०२४ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ७०.८१ लाख रुपये झाले आहेत. ‘एसआयपी’ परताव्याचा वार्षिक दर १५.०६ टक्के, तर एकरकमी गुंतवणुकीचा वार्षिक दर १६.२१ टक्के आहे. फंडाची मालमत्ता जून २०२४ रोजी ४,४३५ कोटी होती. फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा १ एप्रिल २०२४ पासून अभिषेक गुप्ता आणि वेणुगोपाल मंगत हे सांभाळत आहेत. फंडाच्या कामगिरीचा इतिहास थोडा बाजूला ठेवला आणि मागील दहा वर्षांचा विचार केला तर १० वर्षात फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर १४.९७ टक्के, तर १० वर्षात एसआयपी गुंतवणुकीवर १६.९९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. प्रदीर्घ काळापासून हा एक ‘लार्ज-कॅप’ केंद्रित आणि ‘व्हॅल्यू इंव्हेस्टमेंट’वर आधारित गुंतवणूक करणारा फंड आहे. म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्व फंड गटात ‘फ्लेक्झीकॅप’ हा सर्वात मोठा फंड गट आहे. ज्या फंड गटात अनेक नवीन आणि जुने दिग्गज फंड चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करीत असले तरी हा फंड गुंतवणूकदारांसाठी मागील दहा वर्षांत जोखीम समायोजित परतावा कर्मवारीत ‘टॉप क्वारटाइल’मध्ये असणारा फंड आहे. जे गुंतवणूकदार नव्याने ‘एसआयपी’साठी नवीन फंडाच्या शोधात असतील अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श पर्याय होऊ शकतो.

हेही वाचा : वीज खेळते नाचरी!

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

‘एचएसबीसी फ्लेक्झीकॅप फंडा’ने दीर्घ कालावधीत मानदंड सापेक्ष जास्त परतावा दिला आहे. मागील दहा वर्षांचा विचार केल्यास (१ जुलै २०१४ ते ३० जून २०२४) फंडाने ३ वर्षांच्या चलत सरासरीनुसार, फंडाने १० ते १५ टक्के परतावा हा २२.५४ टक्के वेळा, १५ ते २० टक्के परतावा ५६ टक्के वेळा, २० टक्क्यांहून अधिक परतावा केवळ १.३८ टक्के वेळा दिला आहे. तर ८ ते १२ टक्के परतावा हा ८.३२ टक्के वेळा दाखवला आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, तीन वर्षे कालावधीत एकदाही तोटा नोंदविलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून हे सातत्याने फंडाच्या कामगिरीत गुणात्मक सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. फंडाच्या पोर्टफोलिओची रचना अशी आहे की, बाजाराच्या व्यापक तेजीत फंडाचा परतावा वाढतो. परंतु बाजार घसरणीत मुद्दल वाचविण्यात फंड यशस्वी होतो. वर्ष २०१७ मध्ये पुनर्वर्गीकरणानंतर फंडाची कामगिरी स्पर्धक आणि मानदंडाच्या तुलनेत, मागे पडलेला दिसला. परंतु जुलै २०२० नंतर मागील कसर भरून काढत व्यापक तेजीत एक अव्वल कामगिरी असलेला फंड म्हणून उदयास आला. गेल्या १० आणि ५ वर्षांच्या कालावधीत, फंडाने अनुक्रमे १८.०१ आणि १७.९२ टक्के ‘पॉइंट-टू-पॉइंट’ परतावा दिला आहे. या कामगिरीमुळे ते या श्रेणीतील फंड आज ‘टॉप क्वारटाइल’ स्थान राखून आहे.

गेल्या १५ वर्षांचा (१ जुलै २००८ ते ३० जून २०२४) विचार केल्यास या फंडाने एचडीएफसी फ्लेक्झीकॅप, फ्रँकलिन फ्लेक्झीकॅप, आदित्य बिर्ला एसएल फ्लेक्झीकॅप आणि एसबीआय फ्लेक्झीकॅपपेक्षा सरस आहे. याच कालावधीत पाच वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न’ आधारावर, एचएसबीसी फ्लेक्झीकॅपने त्याचा मानदंड असलेल्या ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला जवळपास ८४ टक्के वेळा मागे टाकले आहे. या कालावधीत जवळपास निम्म्या वेळेत १२ ते १७ टक्क्यांदरम्यान परतावा दिला आहे. फंडाचा ‘अपसाइड कॅप्चर रेशो’ ११३.७ आहे, जो तेजीत मानदंड सापेक्ष अधिक कामगिरी करतो. ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो’ ८७.६७ असे सूचित करतो की, तो घसरणीदरम्यान मुदलाला निर्देशांकापेक्षा कमी हानी पोहोचवतो.

हेही वाचा : बाजार रंग : साप, शिडी आणि सरशी

फंडाच्या पोर्टफोलिओची बांधणीत सामान्यतः सुदृढ ताळेबंद असलेल्या लार्ज-कॅप कंपन्यांच समावेश आहे. आघाडीच्या दहा गुंतवणुका लार्जकॅप आहेत. फंडाने सर्वाधिक २४ टक्के गुंतवणूक बँकांत केली असून एचडीएफसी बँक, आयसीआयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, ॲक्सिस बँक, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा त्यात समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असून तिसऱ्या क्रमांकावर औद्योगिक वापराच्या वस्तू क्षेत्रातील कंपन्या आहेत. या व्यतिरिक्त आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एल अँड टी यांचा आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा समावेश आहे. फंडाच्या निधी व्यवस्थापकात अलीकडच्या काळात दोनवेळा मोठे बदल झाले, परंतु फंडाची व्यापक रचना आणि त्याचे मूल्य अबाधित राहिले. अलीकडच्या काळात लार्ज कॅपचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेले दिसते. पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉल कॅपचा वाटा प्रत्येकी ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकंदरीत, भारताचा अर्थसंकल्प आणि अमेरिकेच्या अध्यक्षपादाची निवडणुकीमुळे बाजारात अस्थिरता येण्याचा संभव आहे. त्यामुळे मध्यम जोखमीसह दीर्घकालीन परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य वाटतो.