ICICI Bank Festive Offer: ICICI बँकेने फेस्टिव्ह बोनांझाच्या माध्यमातून आजपासून आपल्या ग्राहकांसाठी प्रचंड सवलती आणि कॅशबॅक योजना सुरू केली आहे. ICICI बँकेने ‘Festive Bonanza’ लाँच केले आहे. फेस्टिव्ह बोनान्झा सूट अंतर्गत २६ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहक ICICI बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, रुपे क्रेडिट कार्ड, UPI आणि कार्डलेस EMI वापरून खरेदी करू शकतात. या ऑफर ग्राहकांना बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून नो-कॉस्ट ईएमआय म्हणून देखील वापरता येणार आहे. ICICI बँक iPhone १५ वर विनाखर्च EMI ची विशेष ऑफरदेखील दिली आहे.

…तर तुम्हालाही सूट मिळणार

बँक सणासुदीत ग्राहकांना ऑफर, सवलत आणि कॅशबॅक देत असते. बँकेने ब्रँड आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह भागीदारी केली आहे. आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राकेश झा म्हणाले की, बँक ग्राहकांना विशेष ऑफर देत आहे. बँक आपल्या गृह कर्ज, वाहन कर्ज आणि दुचाकी कर्जावर विशेष सणासुदीच्या ऑफर देत आहे. बँकेने सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन, ज्वेलरी, फर्निचर, प्रवास, खाद्यपदार्थ यांवर अनेक आघाडीच्या ब्रँडसह ऑफर तयार केल्या आहेत. iPhone, MakeMyTrip, Tata New, OnePlus, HP, Microsoft, Croma, Reliance Digital, LG, Sony, Samsung, Tanishq, Taj, Zomato आणि Swiggy वर ऑफर दिल्या जात आहेत.

public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
banking amendment bill 2024 benefits banking rules
RBI Rules: तुम्ही आता बँक अकाउंटमध्ये जोडू शकता चार नॉमिनी; केंद्र सरकारचा नवीन नियम काय सांगतो? वाचा…
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024
‘बिटकॉइन’ तेजीचे १ लाख डॉलरचे शिखर
sbi demands relaxation of rules related to inoperative bank accounts
‘निष्क्रिय बँक खात्यां’सदर्भात नियम शिथिलतेचे स्टेट बँकेची मागणी
up to 22 percent returns from sip in midcap funds
मिडकॅप फंडातील ‘एसआयपी’तून परतावा २२ टक्क्यांपर्यंत

हेही वाचाः ‘बुलेट’ परतफेड योजना म्हणजे काय? ज्यावर RBI ने केली मोठी घोषणा; सोन्याचा कर्जाशी काय संबंध?

बँक ऑफ बडोदाची फेस्टिव्ह ऑफर

बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या ग्राहकांसाठी ‘BoB के संग फेस्टिवल की उमंग’ मोहीम सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाची ही विशेष मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत बँकेने गृहकर्ज, पर्सनल लोन, कार लोन आणि एज्युकेशन लोनवर अतिशय आकर्षक व्याजदरावर सणासुदीच्या ऑफर्स सुरू केल्या आहेत.

हेही वाचाः सणासुदीच्या आधी आरबीआयचं गिफ्ट; कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो दर ६.५० टक्क्यांवर स्थिर

इंडियन बँक होम लोन दर

इंडियन बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. हे गृहकर्जावर ८.५० ते ९.९० टक्के दराने व्याज देत आहे. यावरील प्रक्रिया शुल्क रकमेच्या ०.२३ टक्के आहे.

Story img Loader