कौस्तुभ जोशी

· फंड घराणे – आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड

Devadoot Nidhi activity helps friends financially by encouraging mutual participation and support in times of need
सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
Executive Trustee of Bharatiya Unit Trust and apex body of mutual funds A P Kurian
बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· फंड कधी लॉन्च झाला ? – १४ फेब्रुवारी २००६

· एन. ए. व्ही. (१४ डिसेंबर २०२३ रोजी) ग्रोथ पर्याय – ८६ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता ( ३० नोव्हेंबर २०२३ रोजी)– ४२८३० कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – अनिश ताकवले, वैभव दुसद.

फंडाची स्थिरता

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ०.२५

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १३.४ %

· बीटा रेशो ०.९१%

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा : Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी 12% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हेही वाचा : Money Mantra : इक्विटी म्युच्युअल फंडांचे किती प्रकार असतात?

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे २००८मध्ये आलेल्या जागतिक वित्तीय संकटाच्या अगदी सुरुवातीच्या काळात हा फंड गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. योगायोगाने वर्षा दीड वर्षाच्या काळात बाजार स्थिरावले त्यामुळे सुरुवातीच्या एक-दोन वर्षात फंडाचा रिटर्न चमकदार नसला तरी त्यानंतर फंडाने सतत दमदार कामगिरी नोंदवली आहे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१४ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – १७.१३ %

· दोन वर्षे – ११.०४ %

· तीन वर्षे – १६.७९ %

· पाच वर्षे – १४.७१ %

· दहा वर्षे – १४.३७ %

· फंड सुरु झाल्यापासून – १५.०२ %

हेही वाचा : Money Mantra : नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 1

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार फंडाची गुंतवणूक एकूण ७२ कंपन्यांमध्ये आहे. ब्लूचिप म्हणजेच आकाराने मोठ्या व ज्यांचे बिझनेस मॉडेल सिद्ध झालेले आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक असावी अशी अपेक्षा असते. या फंडाने निफ्टी १०० कंपन्यांमधील आकर्षक असणाऱ्या कंपन्या निवडण्याचा आपला दृष्टिकोन कायम ठेवला आहे. असे असले तरी निवडक ३० ते ४० कंपन्या पोर्टफोलिओमध्ये असण्यापेक्षा अधिक कंपन्यांचा पोर्टफोलिओ असावा असे फंड मॅनेजरना वाटते हे स्पष्ट दिसते आहे. फंडाने गुंतवलेल्या ७२ शेअर्स पैकी जवळपास ८० टक्के शेअर्स लार्ज कॅप तर सहा टक्के शेअर मिड आणि स्मॉल कॅप प्रकारचे आहेत.

आय.सी.आय.सी.आय बँक ८.५३ % लार्सन टूब्रो ७.४०% रिलायन्स इंडस्ट्रीज ६.३८% इन्फोसिस ५.४९% ॲक्सिस बँक ४.८२% हे आघाडीचे पाच शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत. या शेअर्समध्ये फंडाची एकूण ३० टक्के गुंतवणूक आहे.

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे?

वित्तीय क्षेत्र आणि बँका २६ % ऊर्जा तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र १०.६३ % वाहन आणि वाहन उद्योगाशी संबंधित कंपन्या १०.१५ % माहिती तंत्रज्ञान ९.६६ % बांधकाम ७.४० %

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३६.२७ %

· दोन वर्षे २४.२४ %

· तीन वर्षे २०.२१ %

· पाच वर्षे २०.५२ %

· सलग दहा वर्ष १५.६२ %

हेही वाचा : Money Mantra : ‘अर्थ’पूर्ण लग्न

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader