Wrong E Challan Complaint : तुम्ही कार किंवा बाईक चालक अन् मालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ट्रॅफिक नियमांतर्गत तुम्हाला कधी कधी या माहितीचा फायदा होऊ शकतो. खरं तर सध्याच्या घडीला नियम तोडणाऱ्यांना थांबवून त्यांच्याशी बोलून चालान देण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी वाहतूक पोलीस मोबाईलवर उपलब्ध असलेल्या ट्रॅफिक अॅपवरून थेट फोटो काढून ई-चलान पाठवतात. या प्रक्रियेत अनेक वेळा कार किंवा दुचाकी चालकांना त्यांचे चलान बजावण्यात आल्याची माहितीही नसते. नंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्यावर त्यांना चलान कापल्याचे कळते. परंतु अनेक लोक तक्रार करतात की, त्यांनी कोणत्याही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नाही आणि त्यांचे चलान चुकीचे जारी केले गेले आहे. तुम्हालाही असे वाटत असेल, तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार करून चलान रद्द करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्हाला ई-चलान जारी केले गेले असेल तर ट्रॅफिक कॅमेरा किंवा पोलीस अधिकाऱ्याने तुम्हाला ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करताना पाहिले असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने दंड आकारला गेला आहे, तर तुम्ही ट्रॅफिक चलानबाबत तक्रार दाखल करू शकता. येथे चुकीचे ई-चलान म्हणजे वाहनचालकाला असे वाटते की, आपण वाहतूक नियम मोडला नाही, तरीही त्याला चलान प्राप्त झाले, असा अर्थ होतो. चुकीच्या ई-चलानवर विवाद करण्यासाठी वाहन मालक तक्रार दाखल करू शकतो आणि दावासुद्धा करू शकतो. त्यात तो चलान चुकीच्या पद्धतीने जारी केले गेल्याचं कारणही देऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याचे वर्णन करावे लागेल आणि काही पुरावे द्यावे लागतील. हे करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

हेही वाचाः रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार

ई-मेल आणि हेल्पलाइन नंबर देखील उपलब्ध

ई-मेल पत्ता : helpdesk-echallan@gov.in
हेल्पलाइन क्रमांक: ०१२०-२४५९१७१ (सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ओपन)

हेही वाचाः TCS मध्ये वर्क फ्रॉम होम संपुष्टात? १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस कार्यालयात जावे लागणार

ऑनलाइन तक्रार प्रक्रिया

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लोकांना चुकीचे ट्रॅफिक चलान जारी केल्याबद्दल तक्रार करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे, जिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
  • सर्वप्रथम तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत ट्रॅफिक साइट echallan.parivahan.gov.in/gsticket/ वर जावे लागेल.
  • अधिकृत ट्रॅफिक साइटची लिंक उघडल्यानंतर तुम्हाला तक्रारीची लिंक दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • या लिंकला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागेल. जिथे तुम्हाला तुमचे नाव, तुमचा नंबर, तुमचा चलान क्रमांक यासह सर्व माहिती योग्यरीत्या भरावी लागेल, जी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झाली असेल.
  • सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर तुम्हाला ई-चलान तक्रारीचा पुरावा अपलोड करावा लागेल, यासाठी अपलोड पर्याय वापरा आणि कॅप्चा कोड अचूक भरा.
  • अपलोडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. आता तुमची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तक्रारीची स्थिती अशा पद्धतीने ट्रॅक करा

तुम्ही केलेल्या तक्रारीनंतर वाहतूक पोलीस विभाग सादर केलेल्या ई-चलान तक्रारीची चौकशी करेल. तक्रार प्रणालीवर ते तपासल्यानंतर विभाग तुम्हाला लवकरच अपडेट देणार आहे. तुम्ही तक्रार प्रणालीवर त्याची स्थिती तपासू शकता.

  • सर्व प्रथम तुम्हाला परिवहन तक्रार तिकीट स्थिती (grievance ticket status) उघडावी लागेल
  • त्यानंतर तुमच्या ब्राऊझरमध्ये https://echallan.parivahan.gov.in/gsticket/ हे वेबपेज उघडा.
  • खाली स्क्रोल करा आणि ‘तिकीट स्थिती’ लिहिलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • तुमचे ई-तिकीट किंवा ई-चलान तक्रार क्रमांक द्या आणि कॅप्चा कोड भरा
  • आता ‘स्टेटस चेक’वर क्लिक करा
  • स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या तक्रारीचे नवे अपडेट तुम्हाला मिळेल
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the traffic police wrongly cut the challan you can cancel the fine sitting at home and save money here is the easy complaint procedure vrd