PNB KYC Update: पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुम्ही सतर्क राहा, अन्यथा हे खाते लवकरच बंद करण्यात येणार आहे. सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांना त्यांचे KYC (Know Your Customer) तपशील लवकरात लवकर अपडेट करण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांचे खाते बंद केले जाऊ शकते. यासाठी बँकेने ३१ ऑगस्ट २०२३ ही अंतिम तारीख दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँकेने ग्राहकांना अपडेट पाठवले

PNB ने २ ऑगस्ट रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून सांगितले आहे की, त्यांनी KYC केलेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यांद्वारे आणि एसएमएसद्वारे सूचना पाठवून त्यांचे तपशील अद्ययावत करण्यास सांगितले आहे. PNB ने दुसर्‍या अधिसूचनेत म्हटले आहे की, “RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार KYC अपडेट करणे सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य आहे. जर तुमचे खाते ३१ मार्च २०२३ पासून KYC केलेले नसेल, तर तुम्हाला ३१ ऑगस्ट २०२३ पूर्वी PNB ONE/IBS करावे लागेल. नोंदणीकृत ई-मेल/पोस्टद्वारे किंवा तुमचे तपशील अपडेट करण्यासाठी बँकेला प्रत्यक्ष भेट द्या. तुमचे खाते अपडेट न केल्यास तुमच्या खात्याचे कार्य थांबवले जाऊ शकते.”

हेही वाचाः सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार लाल चिन्हात बंद, गुंतवणूकदारांचे १ लाख कोटी बुडाले

केवायसीसाठी कोणते तपशील द्यावे लागतील?

केवायसीसाठी ग्राहकांना आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ, नुकताच काढलेला फोटो, पॅन, उत्पन्नाचा पुरावा, मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल, असे पीएनबीने म्हटले आहे. तुमच्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये कोणताही बदल न झाल्यास तुम्ही बँकेला ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्व-घोषणापत्र देऊ शकता.

हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढणार का? पंतप्रधान कार्यालयानं दिलं उत्तर…

PNB KYC कसे तपासायचे? (केवायसी स्थिती कशी तपासावी)

तुमचे केवायसी झाले आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही हे देखील तपासू शकता.
यासाठी तुमचे बँक खाते आणि क्रेडेन्शियलसह PNB वेबसाइटवर लॉग इन करा.
पर्सनल सेटिंगमध्ये जाऊन केवायसी स्टेटस तपासा.
हे तुमचे केवायसी तपशील उपलब्ध आहेत की नाही हे दर्शवेल, जर नसेल तर तुम्हाला तुमचे तपशील अपडेट करावे लागतील.

PNB KYC अपडेट कसे करता येणार?

तुम्ही मोबाईलद्वारे ई-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला आयबीएस किंवा पीएनबी वन मॉड्यूलवर जावे लागेल, येथे तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता, वार्षिक उत्पन्न, ओटीपी इत्यादी स्व-घोषणापत्र सोबत द्याव्या लागतील. बँकेला भेट देऊन तुमचा तपशील देऊन केवायसी देखील करू शकता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are a customer of punjab national bank then read this news vrd
Show comments