Dhanteras 2023 Gold Buying Tips: आज १० नोव्हेंबर २०२३ रोजी देशभरात धनत्रयोदशीचा सण (Dhanteras 2023) साजरा केला जात आहे. धनत्रयोदशी (Diwali 2023) ही दिवाळीच्या दोन दिवस आधी येते. या दिवशी सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अनेकदा सोने खरेदी करताना लोक त्याची किंमत तपासतात, पण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही आज सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला पाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट दागिनेही विकले जातात. अशा परिस्थितीत सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
हॉलमार्क तपासणे महत्त्वाचे आहे
बीआयएसच्या नियमांनुसार, आता बाजारातील कोणताही ज्वेलर्स बीआयएस हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही. सरकारने १ जुलै २०२३ पासून सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत आता कोणत्याही प्रकारचे सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असणे आवश्यक आहे. हा HUID क्रमांक ६ अंकांचा आहे. तुम्ही BIS केअर अॅपला भेट देऊन सोन्याची शुद्धता देखील तपासू शकता.
सोन्याचे कॅरेट तपासा
सोन्याची शुद्धता नेहमी कॅरेटमध्ये मोजली जाते हे लक्षात घेण्यासारखे आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट, १६ कॅरेट इत्यादीमध्ये सोने विकले जाते. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करताना तुमच्या सोन्याची शुद्धता अर्थात कॅरेट किती आहे हे तुमच्या ज्वेलर्सला नक्की विचारा.
सोन्याची किंमत तपासण्याआधी खात्री करा
सोन्याच्या खरेदीसाठी बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील नवे सोन्याचे दर निश्चितपणे तपासा. लक्षात ठेवा २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, म्हणून त्याची किंमत सर्वात जास्त आहे.
हेही वाचाः …म्हणून ११.५ कोटी पॅनकार्ड झाली बंद, आता मोठा दंड भरावा लागणार
शुल्क आकारण्याकडेही लक्ष द्या
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने ज्वेलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर विशेष सूट देतात. अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्यापूर्वी तुम्ही मेकिंग चार्जेसबद्दल विचारले पाहिजे. अनेक ज्वेलरी ब्रँड्स धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या विशेष प्रसंगी त्यांच्या ग्राहकांना शुल्कात २५ ते ३० टक्के सूट देत आहेत.
हेही वाचाः …म्हणून निखिल कामत यांनी आपली बहुतांश संपत्ती केली दान; झिरोधा सहसंस्थापक यांनी सांगितले ‘कारण’
रोखीने पैसे देणे टाळा
सोने खरेदी करताना रोखीने पैसे देण्याऐवजी ऑनलाइन पैसे भरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे डिजिटल किंवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करा. याबरोबरच सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्याचे कन्फर्म बिल जरूर घ्या. ऑनलाइन सोने खरेदी करतानाही पक्के बिल घेणे आवश्यक आहे.