अनेक जण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी निवासी मालमत्ता म्हणजेच घर हा एक चांगला पर्याय असतो. बऱ्याचदा लोक आधी लहान घर विकत घेतात. कालांतराने ते विकून आधीच्या घरापेक्षा मोठे घर विकत घेतात. जर तुम्ही काही कारणास्तव तुमचे जुने घर विकण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. घर विकून मिळणारा पैसा कराच्या कक्षेबाहेर नाही. याचा अर्थ असा की, त्या पैशावर तुमचे करदायित्व देखील असू शकते. हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊ यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घर विकून मिळणारा नफा हा भांडवली नफा समजला जातो आणि त्यावर दोन प्रकारे कर आकारला जातो. जर घर २ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ मालकीचे राहिल्यानंतर विकले गेले तर तो दीर्घकालीन भांडवली नफा समजला जाणार आहे. इंडेक्सेशन बेनिफिटनंतर कॅपिटल गेन रकमेवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच २४ महिन्यांपूर्वी घर विकून झालेला नफा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून गणला जातो. हा नफा व्यक्तीच्या नियमित उत्पन्नात जोडला जातो आणि कर स्लॅबनुसार कर भरावा लागतो.

हेही वाचाः शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचला

तुम्ही कर कधी आणि कसा वाचवू शकता?

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४ मध्ये जुने घर विकून मिळालेल्या उत्पन्नातून दुसरे घर खरेदी करण्यावर करातून सवलत मिळते. हा लाभ केवळ दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या बाबतीत उपलब्ध आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये विक्रेत्याचे उद्दिष्ट घर विकून पैसे मिळवणे नसून स्वतःसाठी योग्य घर शोधणे आहे.

तुम्हाला कोणत्या प्रकारची मालमत्ता खरेदी केल्यावर कर सूट मिळेल?

प्राप्तिकर कायद्याचे कलम ५४ हे स्पष्ट करते की, भांडवली नफा फक्त निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वापरला जातो. याचा अर्थ व्यावसायिक मालमत्ता खरेदीवर कर सूट मिळणार नाही. जमिनीच्या बाबतीत भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी भांडवली नफा कराच्या समान रकमेवर सूट मिळू शकते. केवळ जमीन खरेदी केल्यावर कर सूट मिळणार नाही.

हेही वाचाः चंदा कोचर यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

निवासी मालमत्ता खरेदी करण्यासाठी किती वेळ लागेल?

कलम ५४ नुसार, कर सूट मिळविण्यासाठी जुन्या मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या तारखेपासून २ वर्षांच्या आत नवीन घर खरेदी करणे आवश्यक आहे. तर बांधकामाच्या बाबतीत तीन वर्षांच्या आत घर बांधले पाहिजे. जुनी मालमत्ता विकून एक वर्ष आधी तुम्ही नवीन घर विकत घेतल्यास तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकता. निवासी मालमत्तेच्या विक्रीवर दीर्घकालीन भांडवली नफा दुसर्‍या निवासी मालमत्तेत गुंतवल्यास कलम ५४ अंतर्गत कर सूट मिळते. जर एका मालमत्तेच्या नफ्यातून दोन निवासी मालमत्ता खरेदी किंवा बांधल्या गेल्या असतील तर फक्त एकाच मालमत्तेवर सूट मिळू शकते. याला अपवाद म्हणजे दोन मालमत्ता आयुष्यातून फक्त एकदाच मालमत्तेच्या भांडवली नफ्यासह खरेदी केल्या जाऊ शकतात, तोसुद्धा भांडवली नफा २ कोटी रुपयांपेक्षा जास्त नसावा.

CGAS खात्यात भांडवली नफा का जमा करावा?

जर तुम्हाला घर घ्यायचे असेल आणि आयटीआर दाखल करण्याच्या तारखेपर्यंत भांडवली नफ्याचे पैसे वापरता येत नसतील, तर तुम्हाला ते पैसे कॅपिटल गेन अकाऊंट स्कीम (CGAS) अंतर्गत बँकेत जमा करावे लागतील. तसे न केल्यास तुम्हाला कर भरावा लागेल. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे भांडवली नफा खात्यात पैसे असूनही तुम्हाला दोन वर्षांच्या आत निवासी मालमत्ता खरेदी करावी लागेल किंवा ती ३ वर्षांच्या आत बांधावी लागेल, अन्यथा विहित कालावधीत तुम्हाला दीर्घकालीन भांडवली कर भरावा लागेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you are planning to sell your old house then know the income tax rules now vrd
Show comments