Deadline for linking Aadhaar to Small Saving Scheme : ३० सप्टेंबर २०२३ ही तारीख अल्पबचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना इत्यादीसारख्या छोट्या बचत योजनांच्या गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या खात्याशी संबंधित एक महत्त्वाचे काम निकाली काढणे खूप महत्त्वाचे आहे. असे न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सरकारने छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत ज्या खात्यांमध्ये आधारची माहिती अपडेट केलेली नाही, त्यांची माहिती लवकरच अपडेट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्यथा १ ऑक्टोबर रोजी खाते गोठवले जाणार

यासाठी सरकारने ३० सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत दिली आहे. जर तुमच्या PPF, SSY, NSC यांसारख्या छोट्या बचत खात्यात आधार तपशील अपडेट केला नसेल तर अशा परिस्थितीत तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. यानंतर तुम्ही आधार माहिती अपडेट करेपर्यंत ही खाती गोठवली जातील.

हेही वाचाः १ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

छोट्या बचत योजनांसाठी आधार आवश्यक

अर्थ मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी एक अधिसूचना जारी केली आहे की, आधार आणि पॅन आता PPF, SSY, NSC इत्यादीसारख्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत १ एप्रिल २०२३ नंतर उघडलेल्या सर्व खात्यांमध्ये ही माहिती अपडेट करणे बंधनकारक होते. १ एप्रिलपूर्वी उघडलेल्या खात्यांमध्ये ही माहिती अपडेट न केल्यास ती अपडेट करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यानंतर १ ऑक्टोबरपासून अशी खाती गोठवली जातील आणि आधार पॅन तपशील दिल्यानंतरच ते पुन्हा सक्रिय केले जातील.

हेही वाचाः १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर २८ टक्के GST लावला जाणार : CBIC चेअरमन

खाते गोठवल्यास हे नुकसान होणार

जर तुम्ही खात्यात आधारची माहिती टाकली नाही तर पोस्ट ऑफिस अशी खाती फ्रीज करेल. अशा स्थितीत ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते. खाते गोठवल्यानंतर तुम्ही SSY किंवा PPF खात्यात पैसे जमा करू शकणार नाही. याबरोबरच सरकार तुम्हाला या प्रकारच्या खात्यावरील व्याजाचा लाभही देणार नाही. अशा स्थितीत मुदत संपण्यापूर्वी हे काम आजच पूर्ण करा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you have an account in sukanya samriddhi yojana or ppf 2 days period to update link aadhar otherwise the account will be frozen vrd
Show comments