बदलती जीवनशैली , वाढती व्यवसायिक स्पर्धा, असंतुलित आहार, धावपळीची दिनचर्या , अपुरी विश्रांती व कामाचा ताण यांच्या एकत्रित परिणामामुळे अगदी उमेदीच्या काळात गंभीर आजार (उदा: हृदयविकार, पक्षाघात(पॅरालीसीस), किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्युमर,कर्करोग ) होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या गंभीर आजारास दीर्घकाळ सामोरे जावे लागते व त्या अनुषंगाने खर्चही होत असतो. यातील हॉस्पिटलायझेशनचा जो प्रत्यक्ष खर्च होतो त्याची मेडिक्लेम पॉलिसीमुळे काही प्रमाणात भरपाई मिळते मात्र आजारामुळे होणारे व्यवसायिक नुकसान मात्र भरून निघत नाही.
आणखी वाचा: Money Mantra: विवाहितांचे विमा नियोजन कसे असावे? (पूर्वार्ध)
मागील दोन लेखात आपण अनुक्रमे मेडिक्लेम पॉलिसी व टॉप मेडिक्लेम पॉलिसी बाबत माहिती घेतली. आज आपण आजारपण सबंधित आणखी एका इंश्युरन्स पॉलिसीची माहिती घेऊ. सर्वसाधारणपणे मेडिक्लेम पॉलिसी मुळे पॉलिसी धारकास तसेच पॉलिसित समाविष्ट असणाऱ्या व्यक्तीस आजारपणामुळे जो हॉस्पिटलायझेशनचा प्रत्यक्ष खर्च होतो किंवा जेवढे पॉलिसी कव्हर आहे. या दोन्हीतील कमी असणाऱ्या रकमेइतकी भरपाई रीएंबर्समेंट मिळते मात्र आजारपणामुळे झालेले व्यवसायिक नुकसान किंवा पगाराचे नुकसान याची भरपाई मिळत नाही.
आणखी वाचा: Money Mantra: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते
बऱ्याचदा ही रक्कम सुद्धा जास्त असते यामुळे जरी रुग्ण बारा झाला तरी आर्थिक अडचणीत येऊ शकतो आणि अशी परिस्थिती गंभीर आजारामुळे होण्याची शक्यता जास्त असते. यावर उपाय म्हणजे आवश्यक त्या कव्हरची क्रिटिकल केअर इंश्युरन्स पॉलिसी घेणे. मात्र अजून ही लोकांना याबाबत फारसी माहिती नसल्याचे दिसून येते.
क्रिटीकल केअर इंश्युरन्स पॉलीसी दोन पद्धतीने घेता येते.
१.लाईफ इंश्युरन्स पॉलिसी घेतानाच क्रिटीकल केअर रायडर
घेता येतो
२.जनरल इंश्युरन्स कंपनीची स्वतंत्र क्रिटिकल केअर इंश्युरन्स
पॉलिसी घेता येते.
क्रिटीकल केअर इंश्युरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये
-मेडिक्लेम पॉलीसीतून मिळणाऱ्या रीएंबर्समेंट व्यतिरिक्त रक्कम पॉलिसी धारकास या पॉलिसीतून मिळते.
-मिळणाऱ्या क्लेम रकमेचा उपचारावर झालेल्या /होणाऱ्या खर्चाशी काही संबध नसतो.
-पॉलिसित प्रमुख गंभीर आजार(उदा: हृदयविकार, पक्षाघात(पॅरालीसीस), किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्युमर,कर्क रोग तसेच अन्य सुमारे ३० ते ३५ आजार समाविष्ट असतात.
-समाविष्ट आजारांसाठीच क्लेम मिळतो. अन्य आजारासाठी क्लेम मिळत नाही.
-मिळणाऱ्या क्लेमची रक्कम ही पेमेंट स्वरुपाची असते ती रीएंबर्समेंट असत नाही.( रीएंबर्समेंटची रक्कम झालेला खर्च व पॉलिसी कव्हर या दोन्हीतील कमी असणारी रक्कम असते तर क्रिटिकल केअर पॉलिसीचा क्लेम पूर्ण पॉलिसी क्लेम इतका असतो)
-एखाद्या आजाराचे निदान झाल्यावर ३० दिवसानंतर क्लेम घेतला असेल व पुन्हा काही दिवसांनी तो आजार किंवा अन्य आजार उद्भवला तर क्लेम मिळत नाही पॉलिसी संपुष्टात येते.
-या पॉलिसीचा प्रीमियम परवडणारा असतो, मात्र वाढत्या वयानुसार प्रीमियम वाढत जातो. क्लेम मिळण्यासाठी पॉलिसीधारक रोगाचे निदान झाल्यापासून
पुढे किमान ३० दिवस हयात असावा लागतो.
जनरल इंश्युरन्स कंपनीकडून जास्तीत जास्त ३ वर्षे व कमीतकमी १ वर्ष कालावधी साठी पॉलीसी घेता येते व कालावधी संपल्यावर पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते.
थोडक्यात असे म्हणता येईल कि गंभीर आजाराच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी नेहमीच्या मेडिक्लेम पॉलीसी सोबत स्वतंत्र क्रिटीकल केअर इंश्युरन्स पॉलीसी घेणे किंवा लाईफ इंस्युरन्स पॉलीसी घेताना क्रिटीकल केअर रायडर घेणे निश्चितच हितावह आहे. मात्र क्रिटीकल केअर इंश्युरन्स रायडर अथवा पॉलीसी घेताना समाविष्ट असणारे आजार व पॉलिसीच्या अन्य अटी समजून घ्याव्यात .