वसंत माधव कुळकर्णी

डॉ. अंबादास कर्डिले यांनी आर्थिक नियोजन सुचवावे अशी विनंती खालील ई-मेलद्वारे केली. डॉ. कर्डिले नांदेडच्या जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ सोशल वर्क ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये प्राध्यापक आहेत.

नमस्कार सर …!

मी ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मधील आपल्या सदराचा नियमित वाचक असून, त्या माध्यमातूनच एक ‘एसआयपी’ सुरू केलेली आहे. तरी आपण मला यथायोग्य असा आर्थिक नियोजन सल्ला आपल्या आर्थिक सदरातून (जाहल्या काही चुका) द्यावा, ही विनंती.

हेही वाचा >>> मध्यममार्गी…  

कुटुंबातील सदस्य :

अंबादास कर्डीले (३७) व्यवसाय ; नोकरी (प्राध्यापक )

सुषमा कर्डीले, पत्नी (३२) व्यवसाय : घरकाम

(विवांश, (७ वर्षे ) आणि आरव, (२ वर्षे ) ही दोन मुले)

मासिक उत्पन्न: रु. ११०,०००/-

मासिक खर्च :             रु. ७५,०००

खर्चाचा तपशील:

घरखर्च:             रु. ३०,०००

कर्जाचा हप्ता: रु. ३३,०००*

विमा हप्ता: रु. २,०००

एसआयपी: रु. १०,०००**

शिल्लक: रु. ३५,०००

* न फेडलेले कर्ज : प्लॉट खरेदीसाठी घेतलेले, तीन वर्षांसाठी , मासिक हप्ता ३३००००/-

**सुरू असलेल्या एसआयपी आणि बचतीचा तपशील:

१. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटी फंड ५,००० रुपये

२. पीजीआयएम इंडिया मिडकॅप                                       २,५०० रुपये

३. क्वांट टॅक्स सेव्हिंग्ज                                                  २,५०० रुपये

एनपीएसः १०,००० रुपये

विमा हप्ता : ११,००० (१ कोटींचे टर्म इन्शुरन्स)

आरोग्य विमा : ११,००० (३ लाखांचे आरोग्य विमा छत्र)

आर्थिक उद्दिष्टे:

१. येत्या दोन वर्षांमध्ये घर बांधकाम करणे. (कर्ज घेऊन)

२. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यकालीन तरतूद करणे .

तरी, आपण आर्थिक नियोजन सुचवावे, ही विनंती.

धन्यवाद …!

कृती योजनाः

० पुरेसे विमा छत्र न घेणे हा आर्थिक नियोजनातील धोका आहे. ‘अंडर इन्शुअर्ड’ म्हणजे काय, तर कुटुंबप्रमुख-पॉलिसीधारकाच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पुरेसे आर्थिक संरक्षण नसणे. तुमच्यापश्चात तुमच्या पॉलिसीद्वारे कुटुंबाला मिळू शकणारी रक्कम अपुरी आहे. तुम्हाला अजून १.५० कोटी विमा छत्राची आवश्यकता आहे. तेव्हा प्रत्येकी ७५ लाखांचे संरक्षण देणाऱ्या दोन विमा पॉलिसी खरेदी करणे.

हेही वाचा >>> आर्थिक प्रगतीसाठीचे सोप्पे सूत्र

० तुमच्या आर्थिक नियोजनातील दुसरा दोष म्हणजे पुरेसा आरोग्य विमा नसणे. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमा हा एक चांगला पर्याय आहे. या सरक्षणाअंतर्गत हॉस्पिटलायझेशनचा खर्च ज्यामध्ये खोलीचे शुल्क, ऑक्सिजन सिलेंडर, चाचण्या इत्यादिसाठी केलेला खर्च मिळतो. डे केअर उपचार खर्च, जेव्हा तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची आणि २४ तासांपेक्षा कमी वेळेसाठी दाखल केले जाते त्याचा खर्च तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला शुल्क इत्यादीचा खर्च या पॉलिसीअंतर्गत मिळतो. तुम्ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या लाभास तुम्ही पात्र ठरता. चार जणांचे कुटुंब आहे, वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेता दुप्पट आरोग्य विमा छत्राची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या मुळच्या पॉलिसीवर ‘टॉप-अप’ करू शकता. वैद्यकीय विम्याचे संरक्षण वाढविण्याचा ‘टॉप-अप’ हा कमी खर्चाचा उपाय आहे. जेव्हा विमाधारकाला उपचार खर्च जो मूळ आश्वासित मर्यादेपेक्षा अधिक असतो. तेव्हा तुमच्या मूळ पॉलिसीत संरक्षित केलेला वैद्यकीय खर्चाइतका खर्च मूळ विमा कंपनी देते आणि या मर्यादेपेक्षा अधिकचा खर्च ज्या विमा कंपनीकडून ‘टॉप अप’ घेतलेली ती कंपनी देते. तेव्हा ३ लाखांच्या विमा छत्रावर अतिरिक्त ३ लाखाचे ‘टॉप-अप’ घ्यावे. ० सध्या जमीन खरेदी करण्यसाठी घेतलेले कर्ज १३.५० टक्के दराने घेतलेले आहे. हा व्याजाचा दर खूपच जास्त आहे. तेव्हा उपलब्ध बचतीतून ५० टक्के अतिरिक्त कर्ज फेड करावी. उरलेल्या बचतीतून ५ हजारांची एक ‘एसआयपी’ सुरू करावी.