भारत सरकारच्या कॅबिनेटने गुरुवारी सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक अपेक्षित असलेल्या तीन चिप निर्मिती प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. भारताला सेमीकंडक्टर उद्योगाच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. भारतातील टाटा उद्योग समूहाच्या आणि तैवानच्या कंपनीच्या संयुक्त माध्यमातून हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. तैवानमधील पॉवरचिप सेमीकंडक्टर आणि टाटा ग्रुप समूह यांच्या भागीदारीतून गुजरात मधील ढोलेरा येथे अंदाजे ९१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला फाउंड्रीचा प्रकल्प उभा राहणार आहे. दरवर्षी ३०० कोटी चिप निर्मिती करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प संगणक, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण विषयक उपकरण, ग्राहकांसाठी आवश्यक असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घरगुती वापरासाठीची उपकरणे याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा