‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचवलेले शेअर्स म्हणजे खरेदीची टिप नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना या सदरात सुचवलेल्या शेअरचादेखील विचार करावा; परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचवलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी ‘पोर्टफोलियो म्हणजे काय?’ ‘तो कसा करावा?’ ‘शेअर्स कसे निवडावेत’ किंवा ‘शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत’, ‘गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली?’ असे अनेक प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तसेच गुंतवणुकीचे इतर मापदंड अभ्यासणार आहोत.

परवा मला माझ्या पूर्वीच्या कंपनीतला देशपांडे भेटला. वय ५२ वर्षे. त्याच्याशी बोलताना मला समजले की, त्याने गेल्या वर्षी व्हीआरएस घेतली. मी मग, ‘‘काय करतोस?’’ असं विचारल्यावर तो हसत म्हणाला – ‘‘शेअर मार्केट!’’

unsafe migration methods use by indian to to enter in america
अमृतकाळाचा डंका खरा की अमेरिकी डंकी?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mutual fund investment
Money Mantra Investment माझी गुंतवणूक केल्या केल्या का घसरते?
Long term investment in mutual fund
फंड जिज्ञासा : म्युच्युअल फंडातील दीर्घ काळ गुंतवणूक निश्चितच फायद्याची!
Reserve Bank of India has decided to change interest rate after almost five years
प्रतिशब्द : केल्याने व्याज कर्तन- Interest Rates – व्याज दर
RBI Governor statement on exchange rate policy
रुपयाला सावरण्यासाठी थेट हस्तक्षेप नाही – मल्होत्रा
Take stringent action against those who trouble harass industries Fadnavis directs police
द्योजकांना त्रास देणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड

देशपांडे खरा एचआरचा माणूस, तो शेअर बाजार म्हणजे नक्की काय करतो याचे कुतूहल वाटून मी त्या विचारले, ‘‘म्हणजे नक्की काय?’’

त्यावर तो मला म्हणाला- ‘‘मी ट्रेडिंग करतो’’ आणि आता तो करन्सी ट्रेडिंगदेखील चालू करणार आहे. याचे शिक्षण त्याने कुठल्याशा कोर्सद्वारे काही हजार रुपये फी भरून घेतले होते. देशपांडे यशस्वी गुंतवणूकदार किंवा ट्रेडर आहे की नाही ते येणारा काळच ठरवेल; परंतु गेल्या दोन वर्षांत व्हीआरएस घेऊन किंवा नोकरी गेलेले असंख्य मध्यमवयीन मध्यमवर्गीय, नवतरुण शेअर बाजारात गुंतवणूक अथवा ट्रेडिंग करत आहेत.

हेही वाचा… Money Mantra: फिरायला जाण्याचं बजेटिंग

गेल्या तीन-चार वर्षांत आणि मुख्यत्वे कोविडपश्चात शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मार्च-एप्रिल २०२० पासून शेअर बाजारात उतरलेले हे नवीन गुंतवणूकदार खरे तर भाग्यवान, कारण गेल्या तीन वर्षांत शेअर बाजारातल्या गुंतवणुकीने दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. कुठल्याही इतर गुंतवणुकीने इतका परतावा दिला नसेल. ३० मार्च २०२३ रोजी २६,८८४ वर असलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक आज ६७,००० च्या जवळ आहे.

सुरुवातीला ‘रॉबिनहूड गुंतवणूकदार’ म्हणून ओळखले जाणारे हे तरुण गुंतवणूकदार आता नवखे उरलेले नाहीत; परंतु ते म्हणावे तसे अजून स्थिरावलेलेदेखील नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवातीला एक झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून शेअर बाजार हा पर्याय निवडला होता आणि सुदैवाने शेअर बाजाराने तसा उत्तम परतावा दिलादेखील. मात्र त्यानंतर प्रत्येक वेळी केलेली गुंतवणूक किंवा ‘आयपीओ’ म्हणजे झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग नव्हे हे लक्षात येऊ लागले. कार ट्रेड, पेटीएम, नायका, कृष्णा डायग्नोस्टिक आणि झोमॅटोसारख्या ‘आयपीओ’ची गत पाहता हे साहजिक होते. मात्र शेअर बाजारातील एकंदर चैतन्य पाहता याच काळात अनेक ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्रामदेखील सुरू झाले. टेलीग्राम आणि यूट्यूब चॅनेलद्वारे इन्फ्लुएंसरदेखील अनेक आले आणि अर्थातच मार्केट टिप्सदेखील वाढू लागल्या. कुठलीही माहिती नसताना आणि अभ्यास न करता केवळ टिप्सआधारित केलेली गुंतवणूक ही घातक ठरते. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘गेमस्टॉप’.

दोन वर्षांपूर्वी गेमस्टॉपच्या शेअर्सने अमेरिकेत मोठा धुमाकूळ घातला होता. वर्षाच्या सुरुवातीला ३.२५ डॉलरच्या आसपास असलेला हा शेअर वर्षभरात जवळजवळ ४०० डॉलरपर्यंत आणि इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तो ५०० डॉलरपर्यंत जाऊन आला होता. त्यानंतर केवळ काही दिवसांत गेमस्टॉपचा शेअर तब्बल ८५ टक्क्यांनी घसरून ५२ डॉलरवर आला आणि आज तो १८ डॉलरवर आहे. हेज फंड्स तसेच अनेक गुंतवणूकदारांनी गेमस्टॉपमध्ये गुंतवणूक करून भरपूर फटका खाल्ला आहे. यातील बहुतांशी गुंतवणूकदार नवखे असले तरी अनेक जाणकार गुंतवणूकदारांनीदेखील यात हात पोळून घेतले आहेत. ‘पेनी स्टॉक’चे आकर्षण आणि झटपट पैसा मिळवायचा मोह गुंतवणूकदारांना कसा खाईत लोटू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेकांनी कर्ज काढून या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. व्हॉट्सॲप, एसएमएस आणि इतर सोशल मीडिया वापरून एखाद्या कंपंनीच्या शेअर्समध्ये कशी तेजी आणता येते आणि गुंतवणूकदार ‘योलो’ (यू ओन्ली लिव्ह वन्स) या तत्त्वावर कसे फसतात याचे हल्लीच्या काळातील हे ज्वलंत उदाहरण आहे.

गुंतवणूकदारांची तेजीतील मानसिकता

करोनाने जगातल्या प्रत्येकाला काही तरी शिकविले. या अनिश्चित काळात संयम, बचत, गुंतवणूक आणि पैशाचे महत्त्व, छंदाचे महत्त्व, डिजिटल शिक्षण, कुटुंब-वात्सल्य, सहकार आणि अर्थात आरोग्य या सगळ्याचे महत्त्व लोकांना नेमके कळाले. याच काळात शेअर बाजारातील फोमो, (फियर ऑफ मिसिंग आऊट), फोबी (फियर ऑफ बीइंग इन्व्हेस्टेड), रॉबिनहूड इन्व्हेस्टर, टिना (देअर इज नो अल्टरनेटिव्ह), व्ही-शेप, यू-शेप, के-शेप आणि डब्ल्यू-शेप रिकव्हरी वगैरे संज्ञादेखील सर्वज्ञात झाल्या.

काही तज्ज्ञांच्या मते सध्याच्या तेजीलादेखील रिटेल गुंतवणूकदारांनी मोठा हातभार लावला आहे. झटपट पैसा सगळ्यांनाच आकर्षित करत असतो; परंतु अनेकदा यश मिळूनही मोठा तोटा झाल्याने गुंतवणूकदार निराश होऊन शेअर बाजाराकडे पाठ फिरवतात असे आढळून आले आहे. तेजी अथवा मंदीमध्ये गुंतवणूकदारांची मानसिकता म्हणूनच महत्त्वाची ठरते.

हेही वाचा… Money Mantra : स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या किंमत, सवलत अन् शेवटची तारीख

तेजीचा युफोरिया म्हणजेच केवळ उन्माद असतो हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. बाजारात तेजी सुरू होताच नवीन गुंतवणूकदार धाडस दाखवून शेअर बाजारात प्रवेश करतात. बरेचदा हे नवीन गुंतवणूकदार सुरुवातीला ‘आयपीओ’द्वारे शेअर बाजारात प्रवेश करतात. गेल्या दोन वर्षांत सगळ्याच ‘आयपीओं’ना (नगण्य अपवाद वगळता) गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि ‘लिस्टिंग गेन’मुळे दणदणीत फायदाही झाला. साहजिकच नवीन गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे ओघ वाढला.

मुख्य बाजारमंचावरील ‘आयपीओ’प्रमाणेच ‘एसएमई आयपीओ’लादेखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एसएमई कंपन्यांच्या ‘आयपीओ’मधील गुंतवणूक किमान १.२० लाख रुपयांची असली तरीदेखील चांगल्या ‘आयपीओ’ना भरमसाट प्रतिसाद मिळून त्यांचा किमान १०० पटीने भरणा होत आहे. नुकत्याच आलेल्या बसिलिक फ्लाय स्टुडिओ आणि कहान पॅकेजिंग या दोन एसएमई ‘आयपीओ’ना प्रचंड प्रतिसाद मिळून त्यांचा अनुक्रमे ३५८ आणि ७३० पटीने भरणा झाला. काही अनुभवी गुंतवणूकदारांनी हिंमत दाखवून मार्च/ एप्रिल महिन्यात शेअर बाजारात केलेली गुंतवणूक चांगलीच फायद्याची ठरली. त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढून त्यांनी शेअर बाजारात वाढती गुंतवणूक केली.

आवाक्यात आलेली चलनवाढ, वाढती परदेशी गुंतवणूक, मेक इन इंडिया, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन आणि पायाभूत क्षेत्रासाठी सरकारची कटिबद्धता यामुळे देशांतर्गत चैतन्याचे वातावरण आहे. अनेक गुंतवणूकदारांना अल्प कालावधीतच मोठा फायदा झाल्याने आपला निर्णय योग्यच असल्याचा साक्षात्कार तर झालाच; पण त्याचबरोबर हाच गुंतवणूकदार आपलाच निर्णय योग्य कसा, त्याची कारणेदेखील सांगू लागला.

बाजार कायम तेजीत राहिल्याने अनेकांनी ‘डे ट्रेडिंग’ सुरू केले आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्याच होत्या, तर काहींनी सोडल्या आहेत. हे सर्व जण सध्या तरी सुखीच असले पाहिजेत, कारण जोपर्यंत ही तेजी आहे तोपर्यंत फायदा राहणे साहजिक आहे.

हेही वाचा… Money Mantra: एंडोमेंट इफेक्ट म्हणजे काय?

खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करताना अभ्यास आणि संयम दोन्ही राखणे महत्त्वाचे आहे. तेजीचा फुगा फुटल्यानंतरही अभ्यासू गुंतवणूकदारांनी यशस्वी होऊन दाखवले आहे. भारतीय शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणूक निश्चित फायद्याची ठरेल; परंतु केवळ बाजाराच्या कलेने न जाता, टिप्सवर विश्वास न ठेवता, पूर्ण अभ्यास करून दर्जेदार आणि आश्वासक कंपन्यांत गुंतवणूक केल्यास तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकता. सावध पवित्र घेणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील थेट गुंतवणुकीव्यतिरिक्त म्युच्युअल फंडाच्या मल्टी ॲसेट्स आणि बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड या योजना फायद्याच्या ठरू शकतात.

stocksandwealth@gmail.com

Story img Loader