करदाता भविष्यातील तरतुदींसाठी गुंतवणूक करत असतो. आपल्या उत्पन्नातून दररोजचा घरखर्च केल्यानंतर दीर्घमुदतीच्या आर्थिक गरजांसाठी म्हणजेच घर, शिक्षण, लग्न, परदेश प्रवास, वैद्यकीय खर्च किंवा काही आकस्मित गरजांसाठी पैसे साठविणे अनिवार्य ठरते. हे पैसे साठविणे सुद्धा एक कला आहे. यात सुरक्षितता, परतावा, रोकडसरलता या बाबींकडे आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार लक्ष देणे गरजेचे आहे. आता गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक पर्याय असल्यामुळे गुंतवणूक करतांना संभ्रम निर्माण होतो. सुरक्षिततेकडे लक्ष दिल्यास परतावा कमी मिळतो, परताव्याकडे लक्ष दिल्यास सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. याचा सुवर्णमध्य साधणे एक कला आहे. यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे चांगले.

आणखी वाचा: Money Mantra: म्युच्युअल फंड निवडताना काय पाहावे?

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांबरोबर (म्हणजेच जमीन, घर, सोने, मुदत ठेव, वगैरे) आधुनिक पर्याय सुद्धा लोकप्रिय होत आहेत. आजच्या तरुण पिढीला ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करणे सोपे वाटत आहे. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग, म्युचुअल फंड, ई-सोने, आभासी चलन, वगैरे माध्यमांद्वारे गुंतवणूक करून आपली संपत्ती वाढविण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे. महागाई वाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याच्या हेतूने गुंतवणूक केली जाते. प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रकारात जोखीम वेगवेगळी आहे, त्यावर मिळणारा परतावा वेगवेगळा आहे.
करदाता आपल्या नियमित उत्पन्नावर कर भरतो. तसेच अशा गुंतवणुकीच्या उत्पन्नावर करदात्याला कर भरावा लागतो. या गुंतवणुकीच्या उत्पन्नावर करदात्याला उत्पन्न मिळते. यामध्ये व्याज, लाभांश सारखे नियमित उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हे प्रामुख्याने उत्पन्न आहे. या उत्पन्नावर करदात्याला किती कर भरावा लागतो, त्यातून काय वजावटी मिळतात हे करदात्याने जाणून घेणे गरजेचे आहे.

आणखी वाचा: Money Mantra: पीटूपी गुंतवणुकीचे फायदे- तोटे (उत्तरार्ध)

गुंतवणुकीवरील नियमित उत्पन्न
गुंतवणुकीवर करदात्याला नियमित उत्पन्न मिळते. शेअर्स, म्युचुअल फंडातील युनिट्स, वगैरेंवर लाभांश मिळतो. काही वर्षांपूर्वी शेअर्स आणि म्युचुअल फंडावरील व्याजावर करदात्याला कर भरावा लागत नव्हता. करदात्याच्या हातातील हे उत्पन्न करमुक्त होते. यावरील कर पूर्वी कंपनीला किंवा फंडाला भरावा लागत होता. मागील काही वर्षांपासून हे उत्पन्न करदात्याला करपात्र आहे आणि त्यावर त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागतो.
करदात्याने गुंतवणूक करताना याकडे लक्ष दिले पाहिजे. उदा. इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना “लाभांश” हा पर्याय न निवडता “ग्रोथ” हा पर्याय निवडल्यास करबचत होऊ शकते. “ग्रोथ” पर्यायामध्ये करदात्याला लाभांशाचे नियमित उत्पन्न मिळत नाही त्यावरचा कर वाचतो आणि फंडाने लाभांश न दिल्याने त्यांच्या भांडवली गुंतवणुकीत वाढ होते, हे असे युनिट्स एक वर्षानंतर विकल्यास प्रथम १ लाख रुपयांच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही आणि त्यापेक्षा जास्त रकमेवर १०% इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो. करदात्याने “लाभांश” हा पर्याय निवडला असता त्याला मिळालेल्या लाभांशावर त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो.

करदात्याने घर, जमीन, वगैरे मध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर करदात्याला नियमित भाडे मिळू शकते. हे भाडे करपात्र आहे. घर, दुकान, वगैरे इमारतींवरील भाडे हे “घरभाडे” उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागतो. करपात्र घरभाडे उत्पन्न गणताना त्यातून स्थानिक संस्थेला दिलेला मालमत्ता कर आणि त्यानंतर बाकी रकमेवर ३०% प्रमाणित वजावट मिळते. करदात्याने घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजाची वजावट सुद्धा करदाता घेऊ शकतो. जमिनीचे भाडे “इतर उत्पन्न” या उत्पन्नाच्या स्त्रोतात दाखवता येते. करदात्याने मुदत ठेव, बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिसच्या विविध योजना वगैरेंसारख्या गुंतवणुका केल्या असतील तर त्यावर व्याज मिळते. हे मिळणारे व्याज करपात्र असते. काही ठराविक योजनांवर (जसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर, अनिवासी भारतीयांना मिळणाऱ्या एन.आर.ई. खात्यावर, करमुक्त बॉन्ड्स, वगैरे) मिळणारे व्याज हे करमुक्त असते.

भांडवली नफा
कोणत्याही गुंतवणुकीची विक्री केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. भांडवली नफा हा दोन प्रकारात विभागला जातो. एक दीर्घमुदतीचा आणि दुसरा अल्पमुदतीचा. या दोन्ही प्रकारच्या भांडवली नफ्यावर आणि त्याच्या कर आकारणीवर सवलती आणि कराचा दर वेगवेगळा आहे. संपत्ती दीर्घमुदतीची कधी होते हे संपत्तीच्या प्रकारावर अवलंबून आहे. साधारणतः संपत्ती खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यानंतर विकल्यास ती दीर्घमुदतीची होते अन्यथा ती अल्पमुदतीची असते. याला काही अपवाद आहेत. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्स यांच्यासाठी हा कालावधी १२ महिन्यांचा आहे. स्थावर मालमत्ता, खाजगी कंपन्यांचे समभाग यांच्यासाठी हा कालावधी २४ महिन्यांचा आहे.

दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी साधारणतः २०% इतका कर आहे तर अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. याला काही अपवाद आहेत. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या आणि इक्विटी फंडातील युनिट्स मधील दोन्ही प्रकारच्या भांडवली नफ्यासाठी सवलतीच्या दरात कर भरण्याची तरतूद आहे. शेअरबाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्सच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील प्रथम १ लाख रुपयांवर कर भरावा लागत नाही आणि त्यापुढील रकमेवर १०% इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. हेच समभाग किंवा युनिट्स अल्पमुदतीत विकले तर त्यावर १५% दराने कर भरावा लागतो. या तरतुदींचा फायदा घेऊन आर्थिक नियोजन केल्यास कर वाचू शकतो.

गुंतवणुकीच्या विक्रीसाठी करनियोजन
दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर सवलतीच्या दराने कर भरावा लागतो आणि शिवाय घर, बॉन्डमध्ये गुंतवणूक केल्यास करदायित्व कमी करता येते किंवा संपूर्ण वाचविता येऊ शकते आणि अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो आणि शिवाय घर किंवा बॉन्डमधील गुंतवणूक करून कर वाचविण्याचे पर्याय देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोणत्याही संपत्तीची विक्री करतांना ती दीर्घमुदतीची झाल्यावर विकणे हे फायदेशीर आहे. उदा. शेअरबाजारात सूचीबद्ध कंपनी किंवा इक्विटी फंडातील युनिट्सची विक्री करताना ती खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यानंतर केल्यास कर कमी दराने भरता येतो.
करदात्याने आर्थिक नियोजन करतांना प्राप्तिकर कायद्यातील करसवलती आणि वजावटींचा फायदा घेऊन वैध रीतीने आपला कर वाचवावा. यासाठी अशा तरतुदींची माहिती असणे गरजेचे असते. मागील काही वर्षात शेअर्स आणि म्युचुअल फंडातील युनिट्सच्या विक्रीवरील भांडवली नफ्याच्या तरतुदींमध्ये अनेक बदल झाले. पुढील लेखात शेअर्स आणि म्युचुअल फंडावरील युनिट्सच्या विक्रीवर भांडवली नफा कसा गणावा आणि त्यावर किती कर भरावा हे बघू.

Story img Loader