पूर्वाधात प्राप्तिकर विवरणपत्र कोणी भरावे यासंदर्भात माहिती जाणून घेतली. उत्तरार्ध लेखात आपण सरकारने नव्या संरचनेत केलेले बदल जाणून घेऊया.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा

८. भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या मान्यतेचा तपशील

प्राप्तीकर विवरण पत्र-७ चे शेड्यूल एलए हे राजकीय पक्षांना भरावे लागेल. यापूर्वी, राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम २९ए अंतर्गत नोंदणी तपशील प्रदान करणे आवश्यक होता. आता, त्यांनी त्या पक्षाला भारतीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे की नाही आणि दिली असल्यास अशा मान्यतेची तारीख देखील स्पष्ट करणे आवश्यक आहे.

९. आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी नवीन फिल्ड
आभासी डिजिटल मालमत्तेमध्ये क्रिप्टो मालमत्ता, नॉन-फंगीबल टोकन आणि इतर कोणत्याही डिजिटल मालमत्तेचा समावेश होतो. तथापि त्यात भारतीय चलन, सीबीडीसी, विदेशी चलन आणि अधिसूचित डिजिटल मालमत्ता यांचा समावेश असत नाहीत. अर्थसंकल्प २०२२ ने आकारणी वर्ष २०२३-२४ पासून व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट्सच्या हस्तांतरणामुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणीसाठी एक नवीन ‘फ्लॅट रेट’ योजना आणली आहे. १ एप्रिल २०२२ रोजी किंवा नंतर आभासी डिजिटल मालमत्तेचे प्रत्येक हस्तांतरण या योजनेअंतर्गत केले जाईल. कलम १९४एस अंतर्गत व्हीडीएच्या हस्तांतरणावरील मोबदल्याच्या रक्कमेमधून कर कपात करणे आता बंधनकारक झाले आहे. हे सर्व बदल परिणामकारकरीत्या आयटीआर फॉर्ममध्ये दर्शविण्यासाठी व्हीडीए तक्ता जोडण्यात आला आहे. सदर तक्त्यामध्ये आभासी डिजिटल मालमत्ता संपादनाची तारीख, हस्तांतरणाची तारीख, ज्याच्या अंतर्गत उत्पन्नावर कर भरावा लागेल, भेटवस्तू आणि मोबदला प्राप्त झाल्यास संपादनाची किंमत यासारखे तपशील विचारले आहेत. जर भांडवली नफा झाला असेल तर करपात्र उत्पन्नाची नोंद भांडवली नफ्याच्या तक्त्यात तर व्यावसायिक उत्पन्नाच्या शीर्षाखाली उत्पन्न मिळाले असल्यास व्यवसायिक उत्पनाच्या तक्त्यात वर्गीकरणाच्या आधारे करावी लागणार आहे.

१०. नोटीसच्या उत्तरात दाखल केलेल्या रिटर्नसाठी कलम १५३सी चा संदर्भ पुन्हा समाविष्ट करणे

कलम १५३सी अंतर्गत कोणत्याही अन्य व्यक्तीच्या उत्पन्नाच्या मूल्यांकनाची तरतूद करता येते जेथे करनिर्धारक अधिकारी खात्रीपूर्वक समाधानी असेल की जप्त केलेली (किंवा मागणी केलेली) कोणतीही मौल्यवान वस्तू, खात्याची कोणतीही पुस्तके किंवा दस्तऐवज जप्त (किंवा मागितलेली), किंवा त्यात समाविष्ट असलेली कोणतीही माहिती ज्याच्या बाबतीत ‘शोध’ किंवा ‘मागणीची’ कार्यवाही सुरू केली आहे त्याची नाही तर इतरांशी संबंधित आहे अर्थसंकल्प २०२१ अंतर्गत, १ एप्रिल २०२१ पासून सूर्यास्त कलम लागू केले आहे. यामुळेवरील वरील मूल्यांकन प्रक्रिया १ एप्रिल २०२१ रोजी किंवा नंतर जिथे ‘शोध’ किंवा ‘मागणीची’ कार्यवाही सुरू केली जाईल तिथे लागू होणार नाही. १ एप्रिल २०२१ पूर्वी शोध प्रक्रिया सुरू करण्यात आली असेल तर, हे शक्य आहे की कलम १५३सी अंतर्गत इतर व्यक्तीचे मूल्यांकन करणे बाकी राहणे शक्य आहे आणि त्या व्यक्तीला नोटीसला प्रतिसाद म्हणून प्राप्तिकर विवरणपत्र भरणे कलम १५३सी अंतर्गत बंधनकारक असेल. सबब, नवीन आयटीआर फॉर्म नोटीसला प्रतिसाद म्हणून रिटर्न इन्कमची स्थिती दाखल करण्याच्या विभागात ‘१५३सी’ चे चेक-बॉक्स पुनर्स्थापित केले आहे. यापूर्वी, एवाय २०२२-२३ साठी ITR फॉर्ममध्ये हा चेक-बॉक्स काढण्यात आला होता.

११. टीसीएस क्रेडिट दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणे
गोव्यात राहणारे सर्व नागरिक आणि ज्यांना १८६० ची पोर्तुगीज नागरी संहिता लागू आहे ते मालमत्तेच्या समुदायाची प्रणाली (‘कम्युनिटी ऑफ प्रॉपर्टी सिस्टम) द्वारे’ नियंत्रित केले जातात. या प्रणाली अंतर्गत, एखाद्या व्यक्तीला त्याच्या सह्चऱ्याच्या/जोडीदाराच्या मालमत्तेच्या ५०% वारसा मिळण्याचा अधिकार आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न देखील सह्चऱ्याच्या/जोडीदारामध्ये समान रीतीने वाटून घेण्यास पात्र आहे. कलम ५ए अंतर्गत, प्राप्तिकर कायद्याने पगाराव्यतिरिक्त इतर सर्व मिळकतींच्या संदर्भात मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने केलेली ही प्रणाली मान्य केली आहे. या परिस्थितीत, सामान्य पूलमध्ये जोडलेले उत्पन्न टीसीएस च्या अधीन असल्यास, टीसीएस क्रेडिटसाठी त्यांची वजावट मगण्यात करनिर्धारकांना अडचणी येतात. इतर तत्सम परिस्थितींमध्ये, (उदा. म्हणजे वारसा इ) एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर कर कपात केलेल्या क्रेडिटवर वजावट मागण्याचा हक्क आहे. सध्या, प्राप्तिकर विभाग प्राप्तिकर विवरणपत्रात मागणी केलेल्या टीसीएसशी फॉर्म २६एएस मध्ये दर्शविल्यानुसार टीसीएस च्या रकमेशी जुळते कि नाही हे तपासतो आणि जुळत नसल्यास, प्राप्तिकर विभाग करदात्यास जुळवून घेण्यास सांगतो. त्यामुळे, वर नमूद केलेल्या परिस्थितीत, करदात्यांना टीसीएस क्रेडिटची मागणी करण्यात अडचणी येत होत्या. या समस्येवर मात करण्यासाठी, प्राप्तिकर विवरणपत्रात टीसीएस शेड्यूलमध्ये नवीन फिल्ड समाविष्ट केले आहे ज्यामुळे सीपीसीला दोन्ही पक्षांनी त्यांच्या संबंधित उत्पन्नाच्या प्राप्तिकर विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे पॅन, उत्पन्नाची रक्कम आणि त्यावरील टीसीएस यांचा परस्पर संबंध जोडणे शक्य होणार आहे. या बदलामुळे कर कपात केलेल्या कराच्या क्रेडिटवर दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर मागणी करणे करदात्यासाठी अधिक सोयीचे असेल.

१२. बावीसाव्या प्रोव्हिजोच्या तरतुदी लागू होण्यावर कलम १०(२३सी) किंवा कलम १३(१०) मधील होणारी उत्पन्नाची गणना

नवीन आयटीआर ७ मध्ये कलम १०(२३सी) किंवा कलम १३(१०) मधील प्रोव्हिजोच्या तरतुदी लागू आहेत की नाहीयाचा तपशील भरावा लागतो. अर्थसंकल्प २०२२ मध्ये खालील प्रकरणांमध्ये उत्पन्नाच्या गणनेसाठी विशेष तरतुदी समाविष्ट केल्या आहेत:
(a) संस्थेने लेखापरीक्षण अहवाल प्राप्त केलेला नाही;
(b) हिशोबाची पुस्तके आणि इतर कागदपत्रे विहित नमुन्यात/पद्धतीने/जागी ठेवली गेली नाहीत; किंवा
(c) संस्थेने कलम १३९(४ए) अंतर्गत परवानगी दिलेल्या वेळेत प्राप्तीकर विवरणपत्र सादर केलेले नाही.
आयटीआर फॉर्ममधील भाग बी-टीआय मध्ये जेथे उत्पन्नाचे विवरण दाखवले आहे तेथे परिणामात्मक बदल देखील
केले गेले आहेत. कलम १०(२३सी) किंवा कलम १३(१०) मधील बावीसव्या प्रोव्हीजोच्या तरतुदीनुसार एकूण उत्पन्न
कर आकारणी योग्य असल्यास त्याचा तपशील भरण्यासाठी भाग बी३ मध्ये एक वेगळा तक्ता दिलेला आहे. अशा
प्रकरणांमध्ये, सवलत मागे घेतल्यामुळे कर आकारणीयोग्य उत्पन्नाची गणना संस्थेच्या उद्दिष्टांसाठी भारतात
झालेल्या खर्चासाठी (भांडवली खर्चाव्यतिरिक्त) वजावट मान्य केल्यानंतर केली जाईल. खालील अटींच्या
समाधानाच्या अधीन खर्चाची वजावट स्वीकार्य आहे:
(a) हा खर्च संबंधित वित्तीय वर्षाच्या तत्काळ आधीच्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत खात्याच्या पुस्तकांमध्ये जमा
केलेल्या कॉर्पससाठी आलेल्या देणगीच्या रकमेतील नसावा.
(b) हा खर्च कोणत्याही कर्ज किंवा देणे रक्कमेतून केलेला नाही;
(c) ज्या मालमत्तेची संपूर्ण किंमत उत्पन्नाचा विनियोग म्हणून दाखविली गेली आहे अशा मालमत्तेच्या संदर्भात
घसारा मंजूर केला जाणार नाही;
(d) हा खर्च कोणत्याही व्यक्तीसाठी योगदान किंवा देणगी स्वरूपात नसला पाहिजे.
खालील खर्च वजा न करता उत्पन्नाची गणना केली जाईल:
(अ) भांडवली खर्चासाठी कोणतीही कपात करण्याची परवानगी दिली जाणार नाही;
(ब) कलम ४०(ए)(आयए) अन्वये कर कपात करण्यात चूक केल्याबद्दल नामंजूर केला जाईल;
(क) रोखीने केलेल्या खर्चाच्या पेमेंटसाठी कलम ४०ए(३)/ ४०ए(३ए) अंतर्गत खर्च अस्वीकृती केली जाईल;
(ड) भारतात न केलेल्या खर्चासाठी कोणतीही वजावट करण्याची मान्यता दिली जाणार नाही.
हे लक्षात घेतले पाहिजे की वरील खर्च किंवा भत्त्यासाठी केलेल्या अस्वीकृतीला इतर कोणत्याही तरतुदी अंतर्गत
करनिर्धारणाची वजावट म्हणून मान्यता दिली जाणार नाही. शिवाय, अशा खर्चामुळे कोणतेही नुकसान झाल्यास, अशा
तोट्यासाठी कोणताही सेट-ऑफ मंजूर केला जाणार नाही.

१३. पूर्वीच्या वर्षांमध्ये करदायित्व निभावलेल्या संचित उत्पन्नाचे प्रकटीकरण
एक नवीन परिशिष्ट ‘आयए’ समाविष्ट केले गेले आहे ज्यात कलम ११(३) अंतर्गत आधीच्या मूल्यांकन वर्षांमध्ये करदायित्व निभाविलेल्या संचित उत्पन्नाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. काही अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून १५% पेक्षा जास्त रक्कम जमा होऊन संचित झालेल्या उत्पन्नासाठी ट्रस्टला प्राप्तिकरातून सूट दिली जाते. कलम ११(३) अंतर्गत जेव्हा निर्धारित अटींचे पालन ट्रस्ट करदात्याने केले नाही तर संचित उत्पन्नासाठी ट्रस्टला दिलेली सूट मागे घेतली जाऊ शकते. या नवीन परिशिष्ट ‘आयए’ मध्ये, ज्या वर्षात संचित उत्पन्न झालेले असेल त्याचा तपशील आणि अशा संचित झालेल्या उत्पन्न रकमेवर कर आकारणी केलेल्या मूल्यांकन वर्षासाठी तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
आणखी एक नवीन परिशिष्ट डीए समाविष्ट केले गेले आहे ज्यात कलम ११(१बी) अंतर्गत पूर्वीच्या मूल्यांकन वर्षांमध्ये संचित उत्पन्नावर जमा केलेल्या कराचा तपशीलाची हरणे आहे. जेव्हा एखादी धर्मादाय संस्था भारतात धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी तिच्या उत्पन्नातील ८५% वापर करू शकत नाही, तेव्हा फॉर्म ९ए भरल्यावर अशा उद्देशांसाठी विनियोग केला असल्याचे मानले जाईल. जेव्हा असे उत्पन्न भारतातील धर्मादाय किंवा धार्मिक उद्दिष्टांसाठी विनिर्दिष्ट कालावधीत विनियोग केले गेले नाही, तेव्हा ते उत्पन्न ज्या आर्थिक वस्र्हात प्राप्त झाले आहे त्या आर्थिक वर्षाच्या नंतर लगेच येणाऱ्या आर्थिक वर्षाचे उत्पन्न मानले जाईल आणि ते कलम ११५बीबीआय अंतर्गत करपात्र असेल.. या नवीन परिशिष्ट डीए मध्ये,ज्या वर्षात खर्च झालेले उत्पन्न ‘गृहितका आधारे विनियोग केलेले उत्पन्न’ ‘समजले’ जाइल त्याचा तपशील आणि ज्या कर आकारणीच्या वर्षात अशा रकमेवर कर आकारला गेला होता त्या वर्षाचा तपशील द्यावा लागेल.

१४. निर्दिष्ट मोडमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील
यापूर्वी, प्राप्तीकर कायद्याच्या कलम ११(५) अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीचा तपशील परिशिष्ट जे मध्ये प्रदान केला जायचा. आता, फक्त कलम ११(५) अंतर्गत केलेल्या कॉर्पस गुंतवणुकीचा/ठेवींचा तपशीलही द्यावा लागणार आहे.

१५. कलम १०(२३सी) मान्यताप्राप्त संस्थांद्वारे संबंधित संस्थामधील गुंतवणुकीचा तपशील

अर्थसंकल्प २०२२ मध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की कलम १०(२३सी) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या संस्थांनी कलम १३(३) मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेचे उत्पन्न (किंवा आंशिक उत्पन्न किंवा मालमत्तेचा भाग) विनियोगीत केले तर, असे उत्पन्न किंवा मालमत्ता हे त्या आर्थिक वर्षाच्या फंड किंवा संस्थेचे उत्पन्न मानले जाईल. नवीन प्राप्तिकर विवरण पत्रात कलम १३(३), आणि कलम १०(२३सी) च्या २१ व्या प्रोव्हिजो मध्ये उल्लेखित व्यक्तींना भरीव स्वारस्य असलेल्या हितसंबंधामुळे आर्थिक वर्षातिल कोणत्याही वेळी असलेल्या गुंतवणुकीचे तपशील विवरणपत्रात देणे आता
आवश्यक आहे.