लॉजिस्टिक क्षेत्रावरील मागच्या लेखात आपण या क्षेत्राचा आवाका विचारात घेतला. आजच्या लेखातून या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय संधी आणि गुंतवणूक संधींचा विचार करूया.

जीएसटीची अंमलबजावणी, नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी, डिजिटल इंडिया मोहीम या तीन प्रमुख घटना या क्षेत्राशी संबंधित व्यवसायाला आधार देणाऱ्या ठरल्या आहेत. लॉजिस्टिक्स क्षेत्राला मात्र मुख्यतः चार व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा
boom in the office space market in Pune
उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!

हेही वाचा…Money Mantra: इ-इन्शुरन्स अकाऊंटचे काय फायदे आहेत?

लॉजिस्टिक्स क्षेत्रासमोर चार प्रमुख आव्हाने

पहिले आव्हान म्हणजे धोरणात्मक अडचणी; देशातील या क्षेत्राशी संबंधित असलेले शंभराहून अधिक प्रकल्पांना पर्यावरण परवानगी, भांडवली गुंतवणूक, जमीन अधिग्रहण अशा अडचणींमुळे ‘जैसे थे’ आहेत.
दुसरे आव्हान व्यावसायिक प्रशिक्षण; रस्ते वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेले जुन्या काळापासून व्यावसायिक अजूनही पारंपरिक तंत्राचा वापर करतात. या क्षेत्रात श्रमिकांऐवजी यंत्रांवर आधारित क्षमतांचा विकास करणे आवश्यक आहे. वस्तुमाल साठवलेला असतो त्या ठिकाणाहून ट्रक अथवा टेम्पोमध्ये मालाची चढ-उतार, प्रत्यक्ष वाहतूक यामध्ये अनेक छोट्या व्यावसायिकांचा समावेश होत असल्याने वाहतुकीचा दर वाढतो.
तिसरे आव्हान डिजिटल तंत्रज्ञानाचा कमी वापर; नेमक्या कोणत्या ठिकाणी आपण पाठवलेली वस्तू आहे? हे बसल्या जागेवरून ‘ट्रॅक’ करता आले तर व्यावसायिक कार्यक्षमता तर वाढेलच पण नाशवंत मालाच्या वाहतुकीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे.
चौथे आव्हान भांडवली गुंतवणूक; आधुनिक तंत्रज्ञान आणि ट्रक कंटेनर यांचे नेटवर्क तयार होण्यात प्रमुख अडचण यात करावी लागणारी मोठी भांडवली गुंतवणूक आहे. भविष्यात व्यवसाय वाढणार असेल तरच लघु आणि मध्यम व्यावसायिक त्यात कर्ज काढून गुतंवणूक करतील.

हेही वाचा…Kotak Small Cap Fund Review : कोटकच्या स्मॉलकॅप फंडाची कामगिरी कशी?

मल्टीमॉडल लॉजिस्टिक कॉरिडॉर

रस्ते, रेल्वे, बंदरे आणि वाहतूक आणि विमान वाहतूक हे एकाच व्यवस्थेचे भाग आहेत. म्हणजेच या सगळ्यांचा एकत्रित विचार करून धोरण असल्यास त्याचा संपूर्ण क्षेत्रालाच फायदा होणार आहे. सरकारने सुरू केलेल्या पीएम गतिशक्ती, भारतमाला आणि सागरमाला या प्रकल्पांमुळे भविष्यात या क्षेत्राचे रुपडे पालटणार आहे. बंदरे, वखारी, औद्योगिक शहरे आणि बाजारपेठा यांना जोडणारे मालवाहतुकीचे नवीन व्यवसाय प्रारूप (बिझिनेस मॉडेल) उदयास येणार आहे. या क्षेत्राचा शेती आणि उद्योग व्यवसायाशी तितकाच घनिष्ठ संबंध आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये आजही कृषी मालाची निर्यात हा मोठा घटक आहे. फळ, फुले, धान्य, मसाल्याचे पदार्थ, पॅकबंद वस्तू यांच्या निर्यातीत व्यावसायिकता आणण्यासाठी कौशल्य निर्मितीची गरज आहे. या क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल व अकुशल मनुष्यबळ न मिळणे ही देखील एक समस्याच आहे.

वर्ष २०४७ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आता आहे त्यापेक्षा तिपटीने वाढण्याची खात्रीच देता येऊ शकते. या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने वाहतूक करणे मात्र आव्हानात्मक असणार आहे.

हेही वाचा…‘मालमत्तेच्या वृद्धीपेक्षा सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे’

गुंतवणूक संधी विचारात घेतल्यास वाहन निर्मिती, सेवाक्षेत्र, भांडवली उद्योग, धातू, ऊर्जा आणि स्थावर मालमत्ता या सगळ्याच उद्योगांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग या क्षेत्रामध्ये होतो. या क्षेत्राची बँकिंग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी) किंवा फार्मा या क्षेत्रांशी तुलना केल्यास थेट गुंतवणूक संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत, हे सत्य आहे. हे उदयोन्मुख प्रकारचे क्षेत्र आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे वेळोवेळी जशी सरकारी धोरणे बदलतील आणि त्याचा प्रभाव या क्षेत्रावर पडेल तसे आपले गुंतवणूक धोरण बदलायला लागेल. म्युच्युअल फंड कंपन्यांनी लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्टेशन या संकल्पनेवर आधारित म्युच्युअल फंड योजना बाजारात आणायला सुरुवात केली आहे. म्हणजेच या क्षेत्रामध्ये असलेल्या संधी उपलब्ध आहेत यावर शिक्कामोर्तब झाले असे म्हणूया. एचडीएफसी, आदित्य बिर्ला सन लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि यूटीआय या म्युच्युअल फंड कंपन्यांचे ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक फंड गुंतवणुकीसाठी विचारात घ्यावे. यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड हा फंड वगळता आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड, आदित्य बिर्ला सन लाईफ ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड या फंड योजना बाजारात आलेल्या नवीन योजना आहेत. या फंडातील गुंतवणूक ही अर्थातच दीर्घकाळासाठीच करायची आहे. कारण हे क्षेत्र म्हटले की, तेजी-मंदीचे वारे आलेच त्यामुळे मागच्या एक ते दीड वर्षाचे फंडाचे परतावे पाहून गुंतवणूक करण्याऐवजी हे क्षेत्र पुढील पाच-आठ वर्षात कसे वाढेल याचा अंदाज घेऊन गुंतवणूक निर्णय घ्यायचा आहे.

हेही वाचा…बँकांच्या डिजिटल व्यवहारातील फसवणूक आणि नुकसानभरपाई

या क्षेत्राशी संबंधित टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, आयशर मोटर्स, भारत फोर्ज, अदानी पोर्ट, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, एक्साइड इंडस्ट्रीज, गेटवे, कंटेनर कॉर्पोरेशन अशा काही कंपन्या अभ्यासासाठी विचारात घ्यायला हरकत नाही.

Story img Loader