समीर नेसरीकर

जानेवारी २०२३ मध्ये बांधल्या गेलेल्या वार्षिक अंदाजांना चकवून भारतीय भांडवल बाजाराने एक चांगली खेळी केली. परदेशी आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार २०२४ कडे ‘लोकसभेच्या निवडणुकीचे वर्ष’ या ‘जोखमे’च्या चष्म्यातून पाहत होते. परंतु मागील महिन्यात लागलेल्या काही महत्त्वाच्या राज्य निवडणुकांचा निकाल पाहता, जोखीम थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते. भांडवल बाजार भावना (सेंटिमेंट्स), रोकडसुलभता (लिक्विडिटी) आणि कंपनीचे मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल्स) यावर चालतो. गुंतवणूकदार, अगदी ‘डे ट्रेडर’पासून ते मध्यम/ दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या निर्णय प्रक्रियेवर याच तीन घटकांचा प्रभाव असतो. २०२३ ने बहुसंख्य गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिलाय. ज्या थोड्या लोकांना तोटा झाला असेल त्यांची निर्णयप्रक्रिया तपासावी लागेल. म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूकदार आज खूश आहेत. २०२४ मधील यापुढील वाटचाल कशी असेल, हा खरा प्रश्न आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!
q2 gdp growth estimate may be revised upwards nageswaran
दुसऱ्या तिमाहीतील ‘जीडीपी’त फेरउजळणीनंतर वाढ दिसणे शक्य -नागेश्वरन
Malawi mangos production declines arrivals in APMC market on the decline
यंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर
kal ho na ho re release collection
२१ वर्षांनंतरही ‘कल हो ना हो’ ची जादू कायम, सिनेमा पुन:प्रदर्शित झाल्यावर केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

अमेरिकी मध्यवर्ती बँकेने २०२४ मधील व्याजदर कपातीचे नुकतेच सूतोवाच केले आहे. भारतात दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) चा आकडा १७,००० कोटींच्या पलीकडे गेलाय. परदेशी वित्तसंस्थांनी जेव्हा आधीच्या वर्षी बाजारातून काढता पाय घेतला तेव्हा देशातील सामान्य गुंतवणूकदारांनीच बाजार सावरला होता. ही तर सुुरुवात आहे, जसे नवे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात येतील त्या प्रमाणात हा ‘एसआयपी’चा आकडा कितीतरी पटीत वाढेल. केंद्र सरकारने ‘पायाभूत सुविधा’ क्षेत्रावर खर्च वाढवला आहे, यात रस्ते-रेल्वे वाहतूक, वीजप्रकल्प, जलद दळणवळणाच्या दृष्टीने नवीन विमानतळ, बंदरे, संरक्षण आदी बाबी येतात. पायाभूत क्षेत्रासाठी भांडवल उभारणी झाली की त्याचा इतर अनेक लहान मोठ्या उद्योगांना फायदा होतो. खासगी कंपन्यासुद्धा हळूहळू भांडवली खर्चवाढ करत आहेत.

हेही वाचा >>>Money Mantra: बँक लॉकर- किल्ली हरवली तर? डिपॉझिट भरावे लागते का?

वाढीसाठी अनुकूल आणखी एक क्षेत्र म्हणजे ‘वित्तीय सेवा’ जसे की, बँका, विमा, म्युच्युअल फंड इत्यादी. ‘फिनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्ज’ भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ज्या मालमत्ता वर्गात वाढ होण्याची शक्यता जास्त अशा भांडवल बाजार किंवा समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून भांडवल बाजाराचा हा मार्ग स्वीकारण्याकडे आज भारतीय कुटुंबांचा कल दिसत आहे.भांडवल बाजार हा इतर सर्व मालमत्ता वर्गाच्या तुलनेत संपत्तीनिर्मितीसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणीही आज अत्यंत सहजरीत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो, वेळप्रसंगी त्या त्या दिवशीच्या बाजारभावाने लगेचच पैसे काढूही शकतो. काही जणांचे गुंतवणूक उद्दिष्ट अगदी सहा महिने ते एक वर्षापर्यंत असेल, तर काही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करतील. अशा अनेक कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग चालताना ‘संयम’ ही यशाची गुरुकिल्ली आहे, ज्यांच्याकडे तो जास्त, त्याला यशाची संधी अधिक, हेच इतिहासाने दाखवून दिले आहे. २०२३ या वर्षात ‘निफ्टी ५० टीआरआय’ २१.३० टक्के, ‘निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय’ ४४.६१ टक्के, तर ‘निफ्टी स्मॉलकॅप २५० टीआरआय’ तब्बल ४९.०९ टक्के असा दणदणीत वधारला आहे. मार्केट कॅप टू जीडीपी हे गुणोत्तर मागील सरासरीपेक्षा अधिक आहे. इतिहासातील सरासरी मूल्यांकनापेक्षा मिड आणि स्मॉल कॅप जास्त वधारलेले दिसत आहेत. तरीसुद्धा मिड आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील ‘मार्केट लीडर’ कंपन्यांना नेहमीच मागणी राहील.

भांडवल बाजार हा त्याची चाल चालणार. खूप वेळेस गुंतवणूकदारांचे, अगदी बाजारातील रथी-महारथींचे मूल्यांकनावर बेतलेले अंदाज चुकलेले आहेत. असे असताना, दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडातील समभागसंलग्न योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर बाजाराच्या चढ-उताराकडे दुर्लक्ष करून आपली गुंतवणूक नियमितपणे चालू ठेवावी. ज्या गुंतवणूकदारांचा बहुतांश पोर्टफोलिओ हा पारंपरिक गुंतवणूक साधनांत असेल, त्यांनी काही भाग ‘हायब्रीड’ फंडात जसे की, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज, कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रीड, इक्विटी सेव्हिंग्जमध्ये गुंतवून सुरुवात करावी. आपल्यापैकी काही जण जर १०-१५ वर्षे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आले असाल आणि अपेक्षित वित्तीय ध्येयपूर्तीच्या (मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, स्वतंत्र घर ) अगदी जवळ असाल तर ‘इक्विटी’ मालमत्ता वर्गातून ‘डेट’मालमत्ता वर्गात आपण पैसे वळवून घेऊ शकता. आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली असेल आणि जर सेवानिवृत्तीच्या वयाच्या जवळ असाल तर सेवानिवृत्तीनंतर आपल्या दर महिन्याच्या खर्चासाठी जे पैसे लागतील त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच भारतातील सरासरी आयुर्मान पाहता निवृत्तीनंतर जवळजवळ २०-२५ वर्षांचे आयुष्य आपल्याला जगायचे आहे, तेव्हा ‘इक्विटी’ आणि ‘डेट’ पोर्टफोलिओ कल्पकतेने बांधावा लागेल.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- युटीआय लार्ज कॅप फंड

प्रत्येक व्यक्तीची घरातील परिस्थिती, गरजा, आर्थिक समज आणि बाजारातील अनुभव हा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. हे गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ बनवताना जाणवत राहते. २०२३ हा इतिहास झाला, २०२४ च्या खेळपट्टीवर आपल्याला ‘फ्रेश गार्ड’ घ्यायचा आहे. प्रत्येक मोठ्या झालेल्या खेळाडूमागे एक मार्गदर्शक (कोच) असतो, आपणही अनुभवी आर्थिक समुपदेशक निवडल्यास आपल्याला मोठी खेळी खेळता येईल.

कोविड कालावधीतून सावरत ज्या पद्धतीने देशाने अतुलनीय प्रगती केली आहे, ज्याचा दाखला जगभरात दिला जातो. जगभरात महागाई कमी होताना दिसते आहे, भारतातही व्याजदर कपात अमेरिकेतील व्याजदर कपातीनंतर या वर्षाच्या अखेरीस संभवते, वस्तू आणि सेवा कराचे मासिक आकडे आश्वासक आहेत, भारत ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे जात असताना जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत.
‘धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेक़रार’ असं कितीही मनाला समजावलं तरी…

‘उसके कदमों की आहट फ़ज़ाओं में है’, हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि तितकेच आशादायी आहे.
(लेखक मुंबईस्थित वित्तीय समुपदेशक / sameernesarikar@gmail.com)

Story img Loader