– कल्पना वटकर

लेखाचे शीर्षक वाचल्यावर वाचकांना कदाचित धक्का बसला असेल, कारण बचत खाते ही काही भाड्याने देण्याची वस्तू नव्हे. परंतु अलीकडे असे दिसून आले आहे की, डिजिटल घोटाळे आणि फसवणूक करणारे दुसऱ्याचे बँक खाते वापरून फसवणूक करतात. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात. आपण डिजिटल युगाशी जुळवून घेत असताना फसवणूक करणारेदेखील डिजिटल माध्यमातून विश्वास संपादन करण्यात हुशार झाले आहेत. फसवणुकीच्या अनेक घटना आपण वाचल्या आहेत, ज्यात एखादी बाधित व्यक्ती ‘डिजिटल अरेस्ट’ची बळी ठरते.

farmer beaten up due to dog
कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Parents make children read a book before going to bed at night know the benefits of reading a book
पालकांनो, रात्री झोपण्यापूर्वी मुलांना लावा पुस्तक वाचण्याची सवय, जाणून घ्या पुस्तक वाचण्याचे फायदे!
person cheated of Rs 8 lakh 32 thousand 648 in koparkhairane
घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…

अनेक प्रकरणांमध्ये आपण वाचले आहे की, फसवणूक झालेल्या व्यक्तीला अज्ञात क्रमांकावरून फोन येतो आणि फोन करणारी व्यक्ती माहिती देते ती व्यक्ती नामांकित कुरिअर कंपनी, दूरसंचार प्राधिकरण (ट्राय), सीमा शुल्क (कस्टम) खात्यातून बोलत असून त्यांच्या नावावर एखादी वस्तू अथवा पार्सल परदेशात पाठवण्यात आले असून त्यासाठी त्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरण्यात आले आहे. त्या पार्सलमध्ये अवैध आणि बंदी असलेल्या वस्तू असल्याने ते पार्सल अडविण्यात आले आहे. असे पार्सल तुम्ही पाठविले नसेल आणि बनावट आधार कार्ड वापरले गेले आहे असे तुमच्या लक्षात आल्यास, लगेच मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यानंतर, फसवणुकीच्या उद्देशाने फोन आलेल्या व्यक्तीला ‘व्हॉट्सॲप कॉल’द्वारे दुसऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर जोडले जाते आणि तिसरी व्यक्ती पोलीस ठाणे, न्यायालय किंवा सामान्य माणसाला भीती वाटेल अशी आभासी पार्श्वभूमी निर्माण करतो. घटनेचे गांभीर्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्याचे पत्रही दाखवते. पुढे तुम्हाला धमकी दिली जाते की, तुमची अटक अनिवार्य असून तुरुंगात जाणे टाळायचे असेल तर तुम्ही कोणत्याही कुटुंबातील सदस्यांना माहिती देऊ नका आणि आमच्या सूचनेनुसारच वागा. एकदा मासा गळाला लागला आणि तुम्ही सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे अशी खात्री झाल्यावर, ते स्वतःला कस्टम/ट्राय/सीबीआय, अमली पदार्थ, सीमा शुल्क, सीबीआय, मुंबई पोलिसातील अधिकारी असल्याचा आभास निर्माण करून तुम्हाला काही वैयक्तिक तपशील (बँक खाते/ खात्यात प्रवेश करण्यासाठी लॉगिन आयडी पासवर्ड पिन, ओटीपी इत्यादी) त्यांना देण्यास भाग पाडतात. एखाद्या अनधिकृत ‘ॲप’च्या माध्यमातून तुमच्या खात्यातून व्यवहार करण्यास भाग पाडतात. तुमच्याकडे रोकड उपलब्ध नसेल तर अनेकदा दुव्याचा (लिंक) वापर करून फसवणूक करणारे तुम्हाला ऑनलाइन कर्ज घेण्यास भाग पाडतात. तुम्हाला वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्याची सूचना देतात. तुम्ही या सूचनांना बळी पडता आणि तासन् तास संभाषण सुरू ठेवता. याला ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणून ओळखले जाते. या फसवणुकीत तुम्ही केवळ तुमच्या आयुष्याची बचतच गमावत नाही तर मोठ्या कर्जाच्या विळख्यात अडकतात.फसवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला शेअर बाजारातून उच्च परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारे तुम्हाला बळी पाडतात. ते तुम्हाला ‘व्हॉटस ॲप ग्रुप’मध्ये सामील होण्यासाठी लिंकसह ‘एसएमएस’ पाठवतात, ‘फेसबुक’वर तुमच्याशी जोडले जातात. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी फायदेशीर ‘टिप्स’ देण्याचे आश्वासन देतात. असे फसवणूक करणारे ‘ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग ॲप्स’द्वारे अविश्वसनीय नफ्याचे आमिष दाखवतात आणि तुमच्या खात्यांमध्ये नफा हस्तांतरित करतात. ते सुरुवातीच्या काळात नफा झालेला नसतानादेखील तुमच्या खात्यात नफा देतात. तुम्हाला ‘व्हीआयपी ॲप्स’शी जोडतात. एकदा तुम्ही ‘व्हीआयपी ग्रुप‘चे सदस्य झालात की, ते तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी मोठी रक्कम जमा करण्यास सांगतात आणि तुमच्या खात्यात भरीव नफा दाखवतात. जेव्हा तुम्ही तुमच्या खात्यातून नफा जमा करण्याचा/पैसे काढण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला समजते की, तुमची फसवणूक झाली आहे आणि तुमची आयुष्यभराची बचत गमावली आहे.

हेही वाचा – संपत्ती निर्मितीची दशकपूर्ती :  मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड

फसवणुकीच्या सर्व प्रकरणांमध्ये एकतर पैसे फसवणूक करणाऱ्यांनी स्वतः हस्तांतरित केले आहेत किंवा ते तुम्हाला विविध खात्यांमध्ये (बचत किंवा चालू) निधी हस्तांतरित करण्याची सूचना देतात. ज्या खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला आहे अशा खात्यांच्या पुढील छाननीत असे आढळून आले की, अनेक खातेदार संपर्कात आहेत. त्यांच्या खात्यांमधून होणाऱ्या अशा आर्थिक व्यवहारांची त्यांना माहिती नसते. कारण ही खाती विश्वास संपादन करून उघडली गेली होती आणि ती अज्ञात व्यक्तींनी वापरली होती. खातेधारकांचा आणखी एक प्रकार आहे, त्यात ज्यांची खाती वापरली गेली त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेली मोठी रक्कम फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या बदल्यात त्या खातेधारकांना त्याचे खाते वापरल्याबद्दल भाडे दिले जाते. अशाच एका प्रकरणात अलीकडे, अधिवक्ता प्रेमकुमार पांडे यांनी उच्च न्यायालात एका पीडित व्यक्तीला जामीन मिळविण्यात मदत केली. ज्याचे खाते फसवणुकीसाठी वापरले गेले होते. तो पिझ्झा पोहोचवणारा असून तो आपली उपजीविका पिझ्झा वितरित करून करतो. अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी त्यांचे बँक खाते फसवणूक करणाऱ्यांनी वापरून त्यांच्या खात्यातून व्यवहार करण्याची परवानगी दिली. ज्याच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली त्याला तपासादरम्यान अटक झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत बँक खाते वापरल्याबद्दल काही हजार रुपये मिळाले, असे पोलीस अधिकाऱ्याने आरोपपत्र दाखल केले. हा पिझ्झा वितरित करणाऱ्याचा पहिलाच अजाणतेपणी घडलेला गुन्हा होता आणि फसवणूक करणाऱ्यांकडून पैसे मिळवण्यासाठी त्याने त्याचे खाते भाड्याने दिले होते. या व्यक्तीचा बचाव करताना पांडे यांनी या खटल्यातील काही तथ्ये न्यायालयात सादर केली आणि त्यात व्यक्तीला निर्दोष ठरवले. हा पिझ्झा वितरित करणारा आता जामिनावर सुटला असला तरी, त्याला नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागते. या खटल्याची पुढील सुनावणी दीर्घकाळ चालेल. या गोष्टीतून एक धडा आपल्याला शिकता येईल.

लोक अल्प मोबदल्यापोटी त्यांची बँक खाती भाड्याने देतात. खातेदारांना त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशाचे स्रोत आणि ज्या खात्यात पैसे हस्तांतरित केले त्याचा लाभार्थी माहीत नसतो. अनेक बेरोजगार युवक अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी त्यांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना भाड्याने देत आहेत.फसवणूक करणारे बेरोजगार तरुणांशी संपर्क साधतात आणि बँक खाती भाड्याने देण्यास इच्छुक असल्यास पैसे देऊ करतात. कधी कधी फसवणूक करणारे खातेदारांना त्याच्या बँक खात्यात जमा केलेली रक्कम काढण्यास सांगतात. एकदा रक्कम काढली की, बँक खातेदार त्याचे कमिशन घेतो आणि उर्वरित रक्कम फसवणूक करणाऱ्यांना देतो. काही वेळा, फसवणूक करणारे खातेदारांकडून स्वाक्षरी केलेले धनादेश आधीच ताब्यात घेतात.

हेही वाचा – बाजार रंग: पडझड आहे, भूकंप नाही…

सध्या सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांवरून असे आढळून आले आहे की, फसवणूक करणारे हुशार आहेत आणि त्यांची गुन्ह्यात न अडकण्याची योजना तयार असते. उलट, तुमची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अज्ञात असल्याने, तुम्ही एकतर अशा फसव्या दूरध्वनीकडे दुर्लक्ष करावे किंवा तो दूरध्वनी खंडित करावा. आचरण करण्याचा मोह होत असेल तर शांतपणे ऐकून घ्या आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक वागा. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतीही तक्रार न केल्यास तुम्हाला कठोर कारवाईला तोंड द्यावे लागू शकेल. बाजारात अशी कोणतीही जादूची छडी नाही, जी तुम्हाला तुमची संपत्ती कमी कालावधीत अनेक पटींनी वाढवण्यास मदत करेल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, तरुण, चांगल्या नोकऱ्या असलेले सुशिक्षित लोक आणि व्यावसायिक अशा भानगडींना बळी पडत आहेत. रिझर्व्ह बँकेने अशी फसवणूक करणाऱ्यांबद्दल लोकांना जागरूक करणारे अनेक उपक्रम सुरू केले आहेत. तरीही, तुम्ही फसवले गेले असाल तर, तुम्ही या घटनेची अधिकाऱ्यांकडे त्वरित तक्रार करावी.