Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : जीवनात आणीबाणीची परिस्थिती कधीही उद्भवू शकते. त्यावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता असते हे तुम्हाला एव्हाना कळून चुकलेच असेल. खरं तर कुशाल नावाच्या व्यक्तीचीही अशीच परिस्थिती आली अन् रस्ते अपघातामुळे त्याचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. त्याच्या उपचारासाठी सुमारे २ लाखांची गरज होती, मात्र ही रक्कम त्याच्याकडे नव्हती. अपघाताचा खर्च भरून काढता येईल, असा कोणताही विमा त्यांनी घेतला नव्हता. हे सर्व पाहून त्यांना विम्याचे महत्त्व कळले. या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे महागडा विमा हप्ता भरण्यासाठी उत्पन्न नाही. कमी उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) गेमचेंजर ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये आर्थिक सुरक्षा मिळणार

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेली एक विमा योजना आहे. यामध्ये अपघात झाल्यास २ लाखांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. याचा लाभ घेण्यासाठी १ जून २०२२ पासून २० रुपये वार्षिक प्रीमियम केले आहे. १ जून २०२२ पूर्वी प्रीमियम फक्त १२ रुपये होता. PMSBY चा उद्देश भारतातील मोठ्या लोकसंख्येला सुरक्षा प्रदान करणे आहे, ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे.

हेही वाचाः Money Mantra : एचडीएफसी ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड लाँच, फंडाच्या ऑफर तारखा अन् तपशील जाणून घ्या

PMSBY: फायदे कसे मिळवायचे?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते.
अ) अपघाती मृत्यू झाल्यास: अवलंबितांना किंवा कुटुंबीयांना २ लाख रुपये
ब) कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास: अवलंबितांना २ लाख रुपये
क) आंशिक अपंगत्वावर: अवलंबितांना १ लाख रुपये

हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर रिटर्न वेळेवर भरता आला नाही; किती नुकसान होणार? आता उपाय काय?

PMSBY: लाभ घेण्यासाठी कोण पात्र?

या योजनेसाठी वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असावे. ७० वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
प्रीमियमचे पैसे थेट बँक खात्यातून डेबिट केले जातात.
खात्यात बॅलन्स नसल्यास पॉलिसी रद्द केली जाईल.
बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी लॅप्स होईल.
तुमच्याकडे अनेक बँक खाती असल्यास फक्त एक बँक खाते योजनेशी जोडले जाऊ शकते.

नोंदणी कशी केली जाते?

तुमचे खाते असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन तुम्ही PMSBY साठी अर्ज करू शकता.
प्रीमियमसाठी तुम्हाला बँक फॉर्ममध्ये संमती द्यावी लागेल की तुमच्या खात्यातून प्रीमियमची रक्कम आपोआप कापली जाईल.
बँक मित्रही PMSBY योजनेचे घरोघरी जाऊन फायदे मिळवून देत आहेत. यासाठी विमा एजंटशीही संपर्क साधता येईल.
सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खासगी विमा कंपन्यादेखील ही योजना विकतात.

नूतनीकरण कधी करू शकतो?

या अंतर्गत नावनोंदणीचा ​​कालावधी १ जून ते ३१ मेपर्यंत आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेचे नूतनीकरण मे महिन्यातच करू शकता. योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance cover of 2 lakhs will be available in just 20 rupees how can one take advantage of pmsby government scheme vrd
Show comments