आयुर्विमा हा वित्तीय नियोजनातील पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. सर्वात कमी विमा हप्त्यात सर्वात जास्त विमा छत्र देणारा हा प्रकार असला तरी सुमार अर्धशिक्षित विमा खरेदी इच्छुक शुद्धविमा (टर्म प्लान) खरेदी करणे टाळतात. भारतात, बहुसंख्यांकडे कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. भारतात आयुर्विम्याबाबत अनेक गैरसमज आहेत. ज्यांना विम्याची फारशी गरज नाही ते अर्धशिक्षित असल्याने मोठ्या रकमेचा शुद्ध विमा खरेदी करतात. ज्यांना पुरेशा विमा छत्राची आवश्यकता आहे, असे विमा खरेदी इच्छुकांना विमा कवच किती महत्त्वाचे आहे हे कळत नाही. लोक शुद्ध विमा का खरेदी करत नाहीत हे समजून घेण्यासाठी, विमा खरेदी इच्छुकांचे आर्थिक वर्तन समजून घेतले पाहिजे. भारतात, क्वचितच कोणी आर्थिक साधने समजावून सांगण्यासाठी वेळ घालवतात. दुर्दैवाने, यामुळे लोक मोठी आर्थिक जोखीम घेऊन जगत असतात. भारतात जीवन विमा खरेदी इच्छुक शुद्ध विम्याची खरेदी का टाळतात याची काही मुख्य कारणे अशी सांगता येतील.

पहिले कारण विमाधारक व्यक्तीचे अकाली निधन झाल्यावर शुद्ध विमा त्या दुर्दैवी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देते. मृत्यू ही अशी घटना आहे, लोक त्याबद्दल विचारसुद्धा करणे टाळतात. साहजिकच त्याच्या परिणामाचा विचारसुद्धा केलेला नसतो. शुद्ध विमा हा पैशाचा अपव्यय आहे, असे मानणाऱ्यांची संख्या कमी नाही.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेही वाचा – गुंतवणुकीतील जोखीम कमी कशी करावी?

भारतात वेगवेगळ्या मान्यताप्राप्त विमा कंपन्यांच्या शुद्ध विमा योजना उपलब्ध आहेत. सर्वच योजना केवळ आयुर्विमा देत नाहीत. काही योजना टर्म प्लॅन्सप्रमाणेच जीवन कवच देतात. परंतु काही मुदतपूर्तीनंतर लाभदेखील देतात. आज अनेक युनिट-लिंक्ड विमा योजना उपलब्ध आहेत. या योजना गुंतवणुकीच्या संधी आणि जीवन विमा संरक्षण दोन्ही देतात, परंतु युलिपकडे अनेकदा नकारात्मकतेने पाहिले जाते. बरेच पर्याय उपलब्ध असल्याने, कोणते उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे याबद्दल लोक गोंधळून जातात. जेव्हा ते समजू शकत नाहीत किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. विमा विक्रेत्यांचा कलदेखील शुद्ध विमा विकण्याकडे नसतो.

बहुतेक लोक वैयक्तिक विमा पॉलिसी घेण्यास नकार देतात. कारण ते जिथे नोकरी करतात, त्या ठिकाणी घेतलेल्या समूह विमा योजनेचे सभासद असतात. अनेकांना असे वाटते की, समूह विम्याचे (ग्रुप पॉलिसी) मिळणारे विमा छत्र त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे आहे. बऱ्याचदा, समूह विमा योजनांद्वारे प्रदान केलेले विमा छत्र खूपच कमी असते. तसेच या योजनेचे सभासद असलेल्या व्यक्तीने विद्यमान नोकरी सोडून दुसरी नोकरी सोडली तर त्यांचे विमा छत्र रद्द होते. वय वाढल्याने नवीन टर्म प्लान घ्यायचा तर विमा हप्ता महाग झालेला असतो. त्यामुळे विमा खरेदी करीत नाहीत. कमावत्या व्यक्ती आयुर्विमा न घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ते निरोगी आहेत हा त्यांचा गैरसमज असतो. त्यांच्या मते, त्यांना विम्याची आवश्यकता नाही. ते आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेतात. ते आजारी पडण्याची किंवा मरण्याची शक्यता नाही. निरोगी व्यक्तींना भारतात आयुर्विमा खरेदी करणे किती स्वस्त आहे, हे त्यांना कळत नाही. ज्या तरुण व्यक्तींचे आरोग्य उत्तम आहे, अशा व्यक्तींना किफायतशीर विमा हप्त्यात विमा संरक्षण मिळू शकते. भारतात, विमा छत्र अनिवार्य असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या अभावामुळे अनेकजण विमा खरेदी करीत नाहीत. आयुर्विमा पॉलिसी घेण्याचे योग्य वय कोणते याबद्दल लोकांच्या मनात कायम संभ्रम असतो. बहुतेक तरुण विमा खरेदी इच्छुकांना स्वस्त हप्त्यात मोठे विमा छत्र मिळू शकते. कारण नजीकच्या काळात कंपनीकडे दावा मंजूर करण्याची वेळ येणार नसते. जसजसे लोकांचे वय वाढत जाते, तसतसे त्यांची जोखीम क्षमता वाढते, म्हणून विमाहप्ता वाढत जातो.

योजना विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इच्छुकांना भेडसावणारा पहिला प्रश्न म्हणजे – विमा छत्र किती असावे आणि त्यासाठी किती विमाहप्ता द्यावा हा असतो. बहुतेक लोक याचा फारसा विचार करत नाहीत आणि त्यांच्या विमा एजंटने सुचविलेल्या विमा छ्त्राची (साधारणपणे १ कोटी रुपये असते.) आवश्यकता आहे का? उदा. २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ४० वर्षीय महिलेसाठी, एका विमा कंपनीच्या एका संकेतस्थळावर १ कोटी रुपयांचे विमा छत्र घेण्याचे सुचविलेले असते. तर दुसऱ्याने ३ कोटी रुपयांच्या विमा छत्राची आवश्यकता दर्शविलेले असते. एका सर्व साधारण नियमानुसार तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १०, १५ किंवा २० पट विमा छत्राची आवश्यकता आहे, परंतु तुमच्या शुद्ध विम्याची गरज तुमच्या कौटुंबिक गरजांनुसार आणि तुमच्यावर असलेल्या कर्जानुसार असते. तीन पद्धतीने विमा छत्र निश्चित करता येते.

पहिली पद्धत ‘इन्कम रिप्लेसमेंट मेथड’

टर्म लाइफ कव्हरचा प्राथमिक उद्देश तुमच्या कौटुंबिक खर्चात तुमचा वाटा किती आहे? तुमच्या अकाली निधनानंतर अनुपस्थितीत तुमच्या खर्चाचा वाटा उचलून तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्यांना तुमची आर्थिक उणीव भासणार नाही याची तजवीज करणे हा होय. यासाठी विमा कंपनीने दिलेली एकरकमी भरपाई पुरेशी असणे आवश्यक आहे. आता माझे स्वत:चे उदाहरण घेऊ, मी ४० वर्षांचा असताना पहिला टर्म प्लान खरेदी केला तेव्हा माझी मुलगी ४ वर्षांची होती. तिच्या वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत तिला आर्थिक मदतीची आवश्यकता लागेल असे वाटल्याने विम्याची मुदत २० वर्षे निश्चित केली. त्यावेळी आमचा घराचा खर्च ३० हजार रुपये होता, आणि या खर्चाचा मोठा वाटा मी उचलत असे. महागाईमुळे हा खर्च वाढत जाणार असे गृहीत धरून जे गणित मांडले त्यानुसार १.६८ कोटी विमा छत्राची आवश्यकता होती. यासाठी ७५ हजार विमाहप्ता द्यावा लागणार होता.

दुसरी पद्धत: वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक रकमेइतके विमा छत्र

विम्याची आवश्यक गरज किती हे तुमच्या कुटुंबाच्या राहणीमानावर अवलंबून असते, परंतु प्रत्येक कुटुंबाची काही आर्थिक उद्दिष्टे असतात. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तुमच्या भविष्यातील उत्पन्नातून काही बचत होणार असते. तुमच्या शुद्ध विमा छत्रातून यासाठी निधी मिळणे आवश्यक असते. आमची मुलगी श्रीयाच्या २१ व्या वर्षी तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी जर ५० लाख रुपयांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधीची आवश्यकता गृहीत धरली तर आणखी ५० लाखांचा विमा आवश्यक आहे.

हेही वाचा – Money Mantra: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याचे संकेत!

तिसरी पद्धत : न फेडलेली कर्जे

तुमच्या कुटुंबाची जीवनशैली आणि उद्दिष्टे यांची काळजी घेण्यासाठी अत्यंत सावधगिरीने नियोजन केल्यामुळे, तुमच्या निधनानंतर तुमच्या कुटुंबाला तुमच्या वतीने न फेडलेली कर्जे फेडावी लागतील. गृहकर्ज, वाहन, वैयक्तिक आणि न दिलेली क्रेडिट कार्डांची बिले यांचासुद्धा विमा छत्राच्या आवश्यकतेमध्ये अंतर्भाव करणे गरजेचे असते. तुमच्या कर्जांचा अंदाज लावताना गृहकर्ज, वाहनकर्ज यासारख्या मोठ्या न फेडलेल्या कर्जाचा अचूक अंदाज लावता येतो. आपण कळत न कळत अनेक समूह विमा अपघाती समूह विम्याचे लाभार्थी असतो जसे की, प्रत्येक क्रेडिट कार्डाला २ लाखांच्या अपघाती विम्याचे संरक्षण असते. वेगवेगळ्या समूह विमा लाभांची यादी आपल्या वारसांना ठाऊक असायला हवी. जेणेकरून आपल्या पश्चात या लाभांसाठी दावा करता येईल. त्यामुळे, तुमच्या आयुष्यात एकदाच मुदत विमा योजना खरेदी करणे आणि विमा हप्ता भरणे पुरेसे नाही. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे विमा छत्र आहे याची खात्री करण्यासाठी तुम्हाला एकदा वित्तीय नियोजनाचे पुनरावलोकन करावे लागेल.

(shreeyachebaba@gmail.com)