आजकाल बहुतेक सुशिक्षित तरुण आयुर्विमा घेताना पारंपारिक विमा पॉलिसी (मनी बॅक, इंडोव्हमेंट, व्होल लाईफ , युलिप ) अशा पॉलिसी न घेता टर्म इन्शुरन्स घेत असल्याचे मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे दिसून येते, ही निश्चितच चांगली बाब आहे. सर्वसाधारणपणे टर्म पॉलिसी घेताना रु.१ ते १.५ कोटीचे कव्हर घेतले जात असल्याचे प्रमुख्याने दिसून येते , सुरवातीस कव्हरची ही रक्कम पुरेशी आहे असे वाटते व पुढे हे कव्हर आहे तेवढेच राहते. पॉलिसी कव्हरची रक्कम पॉलिसी घेताना जरी पुरेशी वाटत असली तरी पॉलिसी धारकाच्या मृत्यू नंतर प्रत्यक्ष क्लेमपोटी मिळणारी रक्कम वारसदारांसाठी पुरेशी असेलच असे नाही. कारण वाढत्या महागाईमुळे रुपयाचे मूल्य पुढील काळात कमी कमी होत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यावेळी पॉलिसी क्लेमची रक्कम मिळते त्यावेळी वारसांच्या त्या वेळच्या गरजा या मिळणाऱ्या क्लेमच्या रकमेतून पुऱ्या होतीलच असे नाही. उदा: एखाद्याने आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास दरमहाच्या रू.५०००० खर्चासाठी रु.१ कोटी कव्हर असणारी टर्म अपेक्षेने घेतली आणि दुर्दैवाने त्याचा ५ वर्षानंतर मृत्यू झाला तर वारसाला रु. १ कोटी क्लेम पोटी मिळतील व त्यातून रु.५०००० अंदाजे दरमहा मिळतीलही अगदी सुरवातीस ही रक्कम कदाचित पुरी पडू शकेल मात्र पुढील काही वर्षात वाढत्या महागाई मुळे कुटुंबीयांनी आपल्या गरजा जरी सीमित ठेवल्या तरी महागाईमुळे घर खर्चाची गरज दिवसेंदिवस वाढतच जाईल मात्र क्लेम रकमेच्या व्याजातून मिळणारी रक्कम वाढण्याची शक्यता नसते उलटपक्षी आजकाल वेळोवेळी ठेवीवरील व्याज दर कमी होत असल्याचे दिसून येते आणि जरी वाढले तरी अगदी किरकोळ वाढ असते. थोडक्यात मिळणारी दरमहाची रक्कम घर खर्चासाठी पुरेशी होत नाही व त्यामुळे कुटुंबाला आर्थिक प्रश्न भेडसावतो. या समस्येवर मात करण्यासाठी आता आपण दर वर्षी पॉलिसी कव्हर वाढत जाणारी विमा पॉलिसी घेऊ शकतो.ही पॉलिसी खालील प्रमाणे असते.

हेही वाचा… Money Mantra: शेअरबाजारातील व्यवहार: गुंतवणूक की व्यवसाय?

या पॉलिसीचे कव्हर दर वर्षी मूळ कव्हरच्या ५% वाढत असते. उदा: १कोटी सुरवातीचे कव्हर असणाऱ्या पॉलिसीचे कव्हर एक वर्षानंतर रु.१०५ लाख तर दोन वर्षानंतर रु.११० लाख , तीन वर्षानंतर रु.११५ लाख होते मात्र दुप्पट झाल्यानंतर त्यात वाढ होत नाही जरी पॉलिसी कालावधी शिल्लक असला तरी.(पॉलिसी कालावधी ३० वर्षांचा असेल तर २० वर्षापर्यंतच म्हणजे रु. २०० लाख होई पर्यंतच वाढत राहील.)

बहुतांश कंपन्या सुरवातीस जो पॉलिसी प्रीमियम आकारतात तोच पुढे कायम राहतो दर वर्षी वाढत जाणाऱ्या कव्हर नुसार प्रीमियम वाढत नाही.
सुरवातीचा प्रीमियम अर्जदाराचे वय, कव्हरची रक्कम व अर्जदाराची आरोग्य स्थिती यावर अवलंबून असते तसेच यात वाढत्या कव्हरचाही विचार केलेला असतो.यामुळे हा प्रीमियम नेहमीच्या पॉलिसीच्या तुलनेने जास्त असला तरी परवडणारा असतो.

पॉलिसी कव्हरमध्ये प्रतिवर्षी ५% इतकी वाढ होत असते व साधारण महागाई सुद्धा याच दराने वाढत असल्याने क्लेम पोटी मिळणारी रक्कम त्यावेळच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यास पुरी पडू शकते.

हेही वाचा… Money Mantra: प्रोडक्ट-मार्केट फिट म्हणजे काय?

याउलट आपण जर ठराविक कालावधी नंतर (उदा: दर ५ वर्षांनी )आणखी एक पॉलिसी घेण्याचे ठरविले तर दर वेळी वाढत्या वयानुसार वाढता प्रीमियम द्यावा लागेल तसेच दर वेळी नवीन अर्ज , वैद्यकीय तपासणी यात जर काही आजार उद्भवल्यास न्नवीन पॉलिसी नाकारली जाऊ शकते किंवा आजाराच्या स्वरूपानुसार वाढीव प्रीमियम द्यावा लागेल व व हा प्रीमियम परवडणारा असेलच असे नाही. प्रसंगी पॉलिसी घेतलीही जाणार नाही.
थोडक्यात असे म्हणता येईल कि वाढत्या कव्हरची विमा पॉलिसी घेणे हे निश्चितच हिताचे असून यामुळे भविष्यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन होऊ शकते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance policy with increased cover is beneficial mmdc dvr