एलआयसी आधार स्तंभ पॉलिसी ही एक नॉन लिंक केलेली वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे, जी संरक्षण आणि बचतीचे दुहेरी फायदे ऑफर करण्यासाठी तयार केलेली आहे. ही योजना कोणत्याही अनपेक्षित संकटाच्या परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करते. तसेच संपूर्ण पॉलिसी टर्मच्या शेवटी परिपक्वता लाभ प्रदान करून भविष्यासाठी पैसा निर्माण करण्यास मदत करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

LIC आधार स्तंभ पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि फायदे

या एलआयसी पॉलिसीमध्ये प्रवेशाचे किमान वय ८ वर्षे आणि कमाल ५५ वर्षे आहे.
हे कर्ज सुविधेसह ऑटो कव्हर सुविधा आणि रोख प्रवाह प्रदान करते.
ही एक एंडॉवमेंट योजना आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते.
मॅच्युरिटी झाल्यावर पॉलिसीधारकाला बेसिक सम अॅश्युअर्ड आणि लॉयल्टी अॅडिशन मिळते.
पॉलिसीच्या ३ वर्षांनंतरच कर्जाची सुविधा मिळते.
ही योजना फक्त पुरुषांसाठी उपलब्ध आहे.
किमान विमा रक्कम: ७५,०००
कमाल विमा रक्कम: ३,००,०००

हेही वाचाः बंपर नफा देणाऱ्या ‘या’ तीन योजना लवकरच बंद होणार, गुंतवणूक करण्याची आताच संधी

अशा पद्धतीने LIC आधार स्तंभ पॉलिसीची गणना करा

उदाहरणार्थ, पॉलिसीधारकाने १५ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक वर्षी १०,००० रुपये गुंतवण्याची योजना आखल्यास पॉलिसीधारकास २,००,००० रुपये आणि लॉयल्टी अॅडिशन्सची विमा रक्कम मिळेल.

हेही वाचाः आता डिफॉल्टरलाही पुन्हा कर्ज मिळणार, RBI ने बदललेल्या निर्णयाचा सर्वसामान्यांना होणार फायदा

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invest rs 10000 in lic aadhaar stambh policy of lic you will get rs 3 lakh on maturity vrd