Gold Buying Strategy in Festive Season/Dhanteras and Diwali : धनत्रयोदशी असो किंवा दिवाळी भारतात सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेक लोक सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानत असताना आता अनेक लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्यात पैसे गुंतवतात. सोने हा दीर्घ मुदतीत स्थिर परतावा देणारा पर्याय आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता सोने-चांदीकडे वळत आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धस्थितीमुळे बाजारात अनिश्चितता आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळेल अशी अपेक्षा आहे. खरं तर सोन्याला आधार देणारे काही घटक महत्त्वाचे आहेत. सोन्यात कधीही गुंतवणुकीची एक रणनीती असावी, त्यात किती परतावा मिळू शकतो याचाही अंदाज बांधून घ्यावा. या सर्व मुद्द्यांवर एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन प्रमुख अनुज गुप्ता यांच्याशी फायनान्शिअल एक्सप्रेसने बातचीत केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा