Mahila Samman Saving Certificate: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही मोदी सरकारने महिलांसाठी सुरू केलेली विशेष योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. ही एक अल्पकालीन बचत योजना आहे, ज्या अंतर्गत कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात(MSSC) किती रक्कम गुंतवता येते?

महिला सन्मान बचत योजने(MSSC)अंतर्गत कोणतीही महिला या योजनेत १ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवू शकते. तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२३ मध्ये खाते उघडल्यास या योजनेची मॅच्युरिटी २०२५ मध्ये असेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला ७.५० टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. जर एखाद्या महिलेचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या देखरेखीखाली पोस्ट ऑफिस खाते उघडू शकते. या खात्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तिकर कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांची सूट मिळेल.

हेही वाचाः मोदी सरकारकडून नेपाळला पुन्हा मदतीचा हात, पतंजली आयुर्वेद भूकंपग्रस्तांना देणार २० मेट्रिक टन तांदूळ दान

खाते कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदासारख्या अधिकृत बँकांमध्ये खाते उघडू शकता. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म १ भरावा लागेल. खाते उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल.

हेही वाचाः Money Mantra : मोदी सरकारने पीपीएफसह ‘या’ योजनांचे नियम बदलले, मोठा दिलासा मिळाला

तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू शकता

नियमांनुसार, खातेधारकाची इच्छा असल्यास तो एक वर्षानंतर महिला बचत योजनेच्या खात्यातून ४० टक्के रक्कम काढू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत जसे की खातेदार आजारी पडल्यास तुम्ही खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनंतर ते बंद करू शकता. असे केल्याने तुम्हाला ५.५ टक्के दराने व्याजदराचा लाभ मिळेल.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investing in mahila samman saving certificate scheme will get these benefits know the complete account opening process vrd
Show comments