जन्माला आल्यापासून आयुष्याच्या अखेरपर्यंत ज्या उत्पादनांची माणसाला गरज भासते त्यातील औषधोपचार आणि त्याच्याशी संबंधित सगळी उत्पादने आणि सेवा उद्योग व्यवसायाचे क्षेत्र आहे. भारताची लोकसंख्या आता झपाट्याने वाढत नसली आणि लोकसंख्येचा दर स्थिर असला तरी बदलती जीवनशैली आणि हळूहळू ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे फार्मा कंपन्या आणि औषधोपचार देणारे व्यवसाय यांचे क्षेत्र विस्तारत राहणार आहे. भारतातील या व्यवसायाचा अंदाज घ्यायचा झाल्यास देशांतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, परदेशी कंपन्यांकडून त्यातही प्रामुख्याने अमेरिकेतील फार्मा कंपन्यांकडून पेटंट मिळवून रास्त दरात औषधाचे उत्पादन करून निर्यात करणाऱ्या कंपन्या यांचा समावेश होतो. त्याचबरोबर हॉस्पिटल, शुश्रुषा केंद्र, रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या लॅब आणि फार्मसी म्हणजेच औषध विकण्याची सुविधा (यात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष दुकानांची साखळी दोन्ही समाविष्ट आहेत) यांचा वाटा मोठा आहे. भारत हा जगातील विकसनशील आणि विकसित अनेक देशांमध्ये औषधाची निर्यात करतो औषधाची मागणी वाढली की त्याची किंमत सुद्धा वाढते व याचा अप्रत्यक्ष कंपन्यांना फायदाच होत असतो. लोकसंख्या वाढत असणे आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही लोकसंख्येतील मोठ्या घटकाचा आरोग्याकडे बघण्याचा बदलता दृष्टिकोन, त्याचबरोबर जीवनशैलीजन्य होणाऱ्या आजार यामुळे आरोग्यवस्थेवरील खर्च वाढत राहणार आहे. भारतातील आरोग्य सेवेचा विचार करता सरकारी आरोग्यवस्थेवर मोठ्या लोकसंख्येचे भवितव्य आजही अवलंबून आहे असे असले तरीही गेल्या दहा वर्षात खाजगी क्षेत्रातील वाटा वाढत राहिला आहे.

आणखी वाचा: Money Mantra: क्रेडिट कार्डने खरेदी करताय ? हे वाचायलाच पाहिजे..

How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
spending public tax for Kumbh Mela
कुंभमेळ्याकरिता जनतेच्या कराचा व्यय कशासाठी?
Crowd of devotees take bath in Ramkund due to Mauni Amavasya
नाशिक : मौनी अमावास्येमुळे रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
e-insurance account , insurance ,
Money Mantra : ई – इन्शुरन्स अकाऊंट काढणं का महत्त्वाचं आणि त्याचा उपयोग कसा होतो?
ST Corporation increased travel fare from January 24 midnight price of free money has increased
राज्यात घाऊक भाडेवाढ, एसटीचा प्रवास १५ टक्क्यांनी महाग; रिक्षा-टॅक्सीच्या दरांत ३ रुपये वाढ

जीवनशैली आणि बदलते आजार

क्षयरोग, मधुमेह, किडनी, कर्करोग, हृदयरोग या कारणांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, ऑपरेशन आणि अन्य त्याअनुषंगाने ऑपरेशन पश्चातचे उपचार या प्रमुख वैद्यकीय व्यावसायिक संधींची संख्या वाढत आहे. भारतीय लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान हळूहळू वाढत चालले आहे आणि अर्थातच लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान वाढले की आपोआपच त्यासाठी लागणाऱ्या फार्मा आणि संबंधित उद्योगाचे महत्त्व वाढणारच आहे. भारतात खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल उभारली जात आहेत. जसजसे आधुनिकीकरण होत आहे तसतसे या व्यवसायात येणाऱ्या खासगी कंपन्यांचे प्राबल्य वाढणार आहे. अन्य विकसनशील आणि विकसित देशाच्या तुलनेत प्रत्येक दहा हजार व्यक्तींमागे अजूनही खाटांची (हॉस्पिटल बेड्स) संख्या कमीच आहे.

आणखी वाचा: Money Mantra: सणासुदीला खर्चाचे प्लॅनिंग कसे कराल?

जसजसे हे प्रमाण वाढेल तसतसे याच्याशी संबंधित कंपन्यांचे उत्पन्न वाढणार आहे. रशियामध्ये दहा हजार लोकसंख्येमागे ७० बेड उपलब्ध आहेत, ब्राझीलमध्ये हीच संख्या २१, चीन मध्ये ४३, तर भारतामध्ये ही संख्या २० पेक्षा कमी आहे. वय वर्ष ४४ ते ६० या दरम्यानची लोकसंख्या भारतात वाढती असणार आहे. साठ वर्षानंतरच्या अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण येत्या काही वर्षात लोकसंख्येच्या १३ टक्के असेल. यामुळे फार्मा आणि हेल्थकेअर या क्षेत्रांमध्ये असलेल्या कंपन्यांना अधिक चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यकाळात शहरी आणि निमशहरी भागात अनेक हॉस्पिटल खाजगी क्षेत्रात उघडली जाणार आहेत. यात ‘सुपर स्पेशालिटी’ सेवा सुद्धा असते. भारतात या क्षेत्रात असलेल्या कंपन्यांपैकी मोठ्या कंपन्या कमी आणि मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्या जास्त अशी स्थिती आहे. फार्मा कंपन्या, हॉस्पिटल, हॉस्पिटल साठी लागणारे तंत्रज्ञान, हॉस्पिटलमध्ये आणि नर्सिंग होम मध्ये वापरली जाणारी यंत्र आणि त्याचे सुटे भाग, तपासणीसाठी लागणारी यंत्र आणि त्याचे सुटे भाग या क्षेत्रात कंपन्या विस्तारात आहेत.

भारतात मेडिकल टुरिझम हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर जम धरताना दिसतो आहे. परदेशी नागरिक भारतात येतात त्यांना आवश्यक असलेले उपचार घेतात आणि या उपचारालाच व्यावसायिक पर्यटनाची जोड सुद्धा दिली जाते. यामधून थेट परकीय चलन तर मिळतेच पण हेल्थकेअर आणि हॉटेल, त्याचप्रमाणे विमान कंपन्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायांना अप्रत्यक्ष फायदा होतो तो वेगळाच. २०१४ ते २०२० या कालावधीत परदेशातून भारतात येणाऱ्या मेडिकल टुरिस्ट अर्थात वैद्यकीय पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांची संख्या वार्षिक ३० टक्के दराने वाढत होती. या दशकाच्या अखेरीस वर्षभरात भारतात २५ ते ३० लाख परदेशी वैद्यकीय पर्यटक येण्याची शक्यता आहे. भारतातील फार्मा कंपन्यांचा विचार करायला गेल्यास पोर्टफोलिओ मध्ये आवर्जून ठेवाव्या अशा अनेक कंपन्या आहेत. दिवीज लॅबोरेटरीज, अपोलो हॉस्पिटल, सिपला, फोर्टीस, अरविंद फार्मा, टोरेंट फार्मा, सन फार्मा अशा आघाडीच्या कंपन्या गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. USFDA (United States Food and Drug Administration) या अमेरिकन संस्थेने मान्यता दिल्यानंतरच काही औषधांची निर्मिती आणि अमेरिकेत विक्री करण्यात येते. अशा एकूण मान्यताप्राप्त २६ टक्के सुविधा भारतीय फार्मा कंपन्यांना मिळालेल्या आहेत. भारत सरकारने प्रॉडक्शन लिंकेज इन्सेंटिव्ह या योजनेअंतर्गत या क्षेत्राला बळ मिळण्यासाठी विशेष अर्थसहाय्य सुद्धा सुरू केले आहे. एकूण हेल्थकेअर या क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास बीएसई हेल्थकेअर (BSE Healthcare Index) या निर्देशांकाने गेल्या पंधरा वर्षात १४ टक्क्यांच्या आसपास परतावा दिला आहे.

** सदर लेखात नामोल्लेख असलेल्या कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करावी अशी थेट शिफारस करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदारांनी जोखीम समजून घेऊन, गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.

Story img Loader