जन्माला आल्यापासून आयुष्याच्या अखेरपर्यंत ज्या उत्पादनांची माणसाला गरज भासते त्यातील औषधोपचार आणि त्याच्याशी संबंधित सगळी उत्पादने आणि सेवा उद्योग व्यवसायाचे क्षेत्र आहे. भारताची लोकसंख्या आता झपाट्याने वाढत नसली आणि लोकसंख्येचा दर स्थिर असला तरी बदलती जीवनशैली आणि हळूहळू ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे फार्मा कंपन्या आणि औषधोपचार देणारे व्यवसाय यांचे क्षेत्र विस्तारत राहणार आहे. भारतातील या व्यवसायाचा अंदाज घ्यायचा झाल्यास देशांतर्गत औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, परदेशी कंपन्यांकडून त्यातही प्रामुख्याने अमेरिकेतील फार्मा कंपन्यांकडून पेटंट मिळवून रास्त दरात औषधाचे उत्पादन करून निर्यात करणाऱ्या कंपन्या यांचा समावेश होतो. त्याचबरोबर हॉस्पिटल, शुश्रुषा केंद्र, रुग्णांच्या चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या लॅब आणि फार्मसी म्हणजेच औषध विकण्याची सुविधा (यात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष दुकानांची साखळी दोन्ही समाविष्ट आहेत) यांचा वाटा मोठा आहे. भारत हा जगातील विकसनशील आणि विकसित अनेक देशांमध्ये औषधाची निर्यात करतो औषधाची मागणी वाढली की त्याची किंमत सुद्धा वाढते व याचा अप्रत्यक्ष कंपन्यांना फायदाच होत असतो. लोकसंख्या वाढत असणे आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही लोकसंख्येतील मोठ्या घटकाचा आरोग्याकडे बघण्याचा बदलता दृष्टिकोन, त्याचबरोबर जीवनशैलीजन्य होणाऱ्या आजार यामुळे आरोग्यवस्थेवरील खर्च वाढत राहणार आहे. भारतातील आरोग्य सेवेचा विचार करता सरकारी आरोग्यवस्थेवर मोठ्या लोकसंख्येचे भवितव्य आजही अवलंबून आहे असे असले तरीही गेल्या दहा वर्षात खाजगी क्षेत्रातील वाटा वाढत राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा