-कौस्तुभ जोशी

आजच्या लेखात भांडवली वस्तू क्षेत्रात गुंतवणुकीसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी माहिती घेऊया. या क्षेत्राचा उल्लेख केल्यानंतर ज्या कंपनीचा अर्थातच पहिला उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे ‘लार्सन अँड टुब्रो’.

प्रत्येक पोर्टफोलिओचा अविभाज्य भाग असावा असा हा शेअर आहे. पन्नासपेक्षा जास्त व्यवसायांमध्ये आघाडीवर असलेल्या ‘लार्सन अँड टुब्रो’ या कंपनीचे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी वेगळे महत्त्व आहे. आगामी काळात एरोस्पेस, संरक्षण या क्षेत्रातील कंपनीची कामगिरी भरीव राहणार आहे. अनेक महिने पुरतील एवढ्या कंपनीच्या सेवांना मागणी (ऑर्डर) आणि कमीत कमी व्यावसायिक जोखीम असलेला हा शेअर मल्टीबॅगर नसला तरीही ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे निश्चित. वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होणे अपरिहार्य आहे. या दृष्टीने औद्योगिक वापराच्या इलेक्ट्रिकल वस्तू आणि यंत्रसामग्री बनवणाऱ्या एबीबी इंडिया, हनीवेल, सीमेन्स, थरमॅक्स या कंपन्यांचा विचार करता येईल. थरमॅक्स ही कंपनी बॉयलर, कूलिंग उपकरणे, वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठीची उपकरणे, सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित उपकरणे, अपारंपरिक ऊर्जास्रोताचे पर्याय, औद्योगिक वापराची रसायने बनवते. मिडकॅप श्रेणीतील हा शेअर असून कंपनीची उत्पादने कृषी क्षेत्र, खाद्यपदार्थ, एफएमसीजी, कागदनिर्मिती, औषधनिर्मिती, रबर आणि संबंधित उत्पादने अशा विविध उद्योगांसाठी वापरली जातात.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

या क्षेत्रातील आघाडीचे आणखी एक नाव म्हणजे ‘सीमेन्स’ मूळ जर्मन कंपनी असलेल्या सीमेन्सने भारतातील पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, वाहतूक, संदेशवहन या सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मागच्या वर्षात कंपनीने भारतीय रेल्वेसाठी १,२०० रेल्वे इंजिनासाठी यंत्रसामग्री पुरवण्याचे अकरा वर्षांचे कंत्राट मिळवले आहे; हे उदाहरण याकरिता घ्यायचे की, या क्षेत्रातील कंपन्यांना एकदा ऑर्डर मिळाल्यावर ती पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधी लागतो व त्याच्या देखभालीचे दीर्घकालीन कंत्राटही मिळते. महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुढील दोन दशकांत बदलणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी कंपन्यांना कामे मिळणार आहेत. सीमेन्सने ‘५जी’ तंत्रज्ञानामध्ये औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेली उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा…समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

बहुराष्ट्रीय प्रकारातील आणि भारतात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या हनीवेल या कंपनीचे कार्यक्षेत्र एरोस्पेस, स्टील, तेल-वायू, इमारत बांधणी, रसायने, सुरक्षायंत्रणा, औद्योगिक जड उपकरणे बनवणे हे आहे. भारतातील उद्योगक्षेत्राचा होऊ घातलेला विस्तार यादृष्टीने आवश्यक असलेली सर्वच उपकरणे या कंपनीचे बलस्थान आहे. ऑटोमेशन तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी विशेष उपकरणांची निर्मिती करते. कारखान्यात वस्तूचे पॅकेजिंग करण्यापासून एखाद्या दुकानात वस्तूचे बिलिंग करण्यापर्यंत सर्वच ऑटोमेशन उपकरणे आणि त्याचे सुटे भाग या कंपनीतर्फे बनवले जातात. संशोधन आणि प्रयोगशाळांसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, रसायने बनवण्याचा उद्योग येत्या काही वर्षांत महत्त्वाचा ठरणार आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा उल्लेख याआधी संरक्षण क्षेत्रातील लेखात आला असला तरीही पुन्हा येथे येणे आवश्यक ठरते. दूरसंचार, अँटिना, जॅमर, गव्हर्नन्स, स्मार्ट सिटी सोल्युशन, रेल्वे, मेट्रो आणि मोनो सेवा, सौरऊर्जा अशा क्षेत्रांत कंपनीचे भविष्यातील अस्तित्व अधिक ठळक होणार आहे. भारत सरकारची नवरत्न कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने संरक्षण आणि त्याचबरोबर अन्य विद्युत उपकरणे निर्यात करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

‘एबीबी इंडिया’ ही भारतात कार्यरत असलेली बहुराष्ट्रीय कंपनी उच्च दर्जाची औद्योगिक विद्युत उपकरणे, औद्योगिक वापराची सॉफ्टवेअर, मोटर्स, जनरेटर, ऑटोमेशन उपकरणे, रोबोटिक तंत्रज्ञान, सुरक्षा तंत्रज्ञान पुरवण्यात आघाडीवर आहे. या कंपनीने तयार केलेली उत्पादने अल्युमिनियम, सिमेंट, रसायने, खाणकाम, बंदर अशा पंधरापेक्षा अधिक उद्योगांमध्ये वापरली जातात.

हेही वाचा…‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

आतापर्यंत उल्लेख केलेल्या कंपन्यांविषयी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या कंपन्या अनेक दशकांपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स वगळता या कंपन्या बहुराष्ट्रीय म्हणूनच गणल्या गेल्या पाहिजे. या सर्व कंपन्यांमध्ये विविध म्युच्युअल फंडांनी कायमच आपली गुंतवणूक ठेवली आहे.
या क्षेत्रातील फिनोलेक्स केबल्स आणि पॉलीकॅब, व्ही गार्ड या कंपन्या विद्युत तारा आणि औद्योगिक वापराची आणि घरगुती वापराची विद्युत उपकरणे बनवण्यात आघाडीवर आहेत.

हेही वाचा…उद्योजकाने कर्ज आणि गुंतागुंत समजून घ्यावी

एसकेएफ इंडिया, सोना बीएलडब्ल्यू, शेफर इंडिया या कंपन्या औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाच्या बेअरिंग बनवण्याच्या उद्योगात कार्यरत आहेत. मिडकॅप प्राबल्य असलेल्या या क्षेत्राचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आश्वासक गुंतवणूक म्हणून समावेश असायलाच हवा; अर्थातच दीर्घकालीन परताव्यासाठी!