अखिल आल्मेडा
विद्यमान वर्षाच्या सुरुवातीला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डाने सर्व आयुर्विमा बचत उत्पादनांसाठी पॉलिसी कर्जाचा पर्याय समाविष्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. या कृतीमुळे विमाधारकांना त्यांच्या पॉलिसींचे मूल्य वापरता येते आणि त्यांचे संरक्षण न गमावता त्यांना आर्थिक सवलत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
परवडणारी विमा कर्ज
काही काळापर्यंत, आयुर्विमा योजनांवरील कर्ज हे ऐच्छिक होते आणि केवळ निवडक उत्पादनांमध्ये उपलब्ध होते. विमा नियामक इर्डाच्या नवीन निर्देशासह, हा पर्याय आता प्रवेशयोग्यतेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणाऱ्या सर्व असंलग्न बचत उत्पादनांसाठी अनिवार्य आहे. पॉलिसीधारकांसाठी सामान्यत: अतिरिक्त कोलॅटरल किंवा विस्तृत दस्तऐवजाची आवश्यकता न असता ते सरेंडर मूल्याच्या ८५ टक्के ते ९० टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
ही कर्ज त्यांच्या आकर्षक अटींमुळे इतरांपेक्षा वेगळी आहेत. या कर्जाचा व्याजदर हा वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत बऱ्याचदा लक्षणीयरीत्या कमी असतो, ज्यामुळे हा ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय आहे.
रोख रक्कम कमी असलेल्या परिस्थितीत, तुमची पॉलिसी सरेंडर करण्याऐवजी किंवा उच्च-व्याजदर असलेल्या कर्जाची निवड करण्याऐवजी, आयुर्विमा पॉलिसी ही कोलॅटरल म्हणून वापरू शकता. यामध्ये पॉलिसी तात्काळ आर्थिक गरजा पूर्ण करत संरक्षण देखील मिळेल हे सुनिश्चित केले जाते.
दुसरा मोठा फायदा म्हणजे परतफेडीची फ्लेक्झिबिलिटी असते. कर्जदार केवळ व्याज भरण्याचा पर्याय निवडू शकतात किंवा विम्याचा दावा निकाली निघेपर्यंत परतफेड करणे पूर्णपणे पुढे ढकलू शकतात. त्यामुळे कर्ज तात्काळ परतफेडीच्या दायित्वांच्या ताणाशिवाय आर्थिक गरजा पूर्ण करू शकतात.
कर्ज कसे उपलब्ध होते?
पॉलिसीवर कर्ज मिळविणे सोपे झाले आहे. पॉलिसीधारकांना फक्त त्यांच्या विमा कंपनीशी संपर्क साधावा लागतो आणि ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने तयार केली जाते. कर्जाच्या पलीकडे, इर्डाच्या निवृत्तीनिधी उत्पादनांतर्गत अंशतः पैसे काढण्यास देखील परवानगी असते. या कर्जाचा उपयोग आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पे, जसे की उच्च शिक्षण, विवाह, घर खरेदी करणे किंवा वैद्यकीय खर्च यासाठी केला जाऊ शकतो.
हे बदल करून, इर्डाने भारतातील आयुर्विम्याची भूमिका पुन्हा परिभाषित केलेली आहे. ही धोरणे केवळ भविष्यच सुरक्षित करीत नाहीत तर वर्तमानात एक विश्वसनीय आर्थिक संसाधन म्हणून पुढे आले आहे. यामुळे आर्थिक नियोजन देखील करता येणे शक्य आहे.
पॉलिसीधारकांसाठी लाभकारक
अशा काळात जिथे फ्लेक्झिबिलिटी अर्थात आर्थिक लवचिकता आवश्यक आहे, तिथे पॉलिसीधारकांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी तडजोड न करता अल्प-मुदतीच्या आव्हानांना सामना करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आयुर्विमा बचत उत्पादनांची क्षमता खुली करून पॉलिसी आवश्यकतेनुसार तुम्हाला संरक्षण आणि तात्काळ कर्ज असे दोन्हीचे लाभ देते. हा नवीन उपक्रम आयुर्विम्याचा हा पर्याय खरोखरच संकटाच्या काळात खरोखरच मित्र म्हणून पुढे येतो. आर्थिक सुरक्षा आणि लवचिकता यांच्यातील अंतर कमी करून पॉलिसीधारकांना या अनिश्चिततेचा सामना आत्मविश्वासाने करण्यास सक्षम करतो.
आता कृतीची वेळ!
या नवीन फायद्यांसह, आयुर्विमा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. पॉलिसी कर्जाचा पर्याय हा इतर अतिरिक्त फायद्यांसह, कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक आहे.
– लेखक बंधन लाइफ इन्शुरन्समध्ये विपणन प्रमुख आहेत