आपल्या भारतात सोने खरेदीला अनन्य साधारण महत्व आहे, प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार सोने खरेदी करीत असतो. गेले काही दिवस सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस या गुंतवणुकीकडे आणखी आकर्षित होऊ लागला आहे, यातील बहुतांश सोने खरेदी ओळखीच्या अथवा नामांकित सराफाकडे दागिने, वळ, सोन्याचे बिस्कीट या स्वरुपात होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अशा पारंपारिक पद्धतीने सराफाकडून सोने खरेदी करण्यापेक्षा अन्य सुरक्षित पर्याय आज उपलब्ध आहेत, याबाबतची माहिती बहुतेकांना असत नाही. सोने गुंतवणूक करताना हे गोल्ड ईटीएफ, गोल्ड म्युचुअल फंड व आरबीआय गोल्ड बॉण्ड हे ही पर्याय आता उपलब्ध आहेत व हे पर्याय पारंपारिक पर्यायापेक्षा जास्त सुरक्षित आहेत. या अन्य पर्यायांची सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे. यातील आरबीआय गोल्ड बॉण्ड हा एक उत्तम पर्याय असून आज आपण याची तपशीलात माहिती घेऊया.

रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०१५ मध्ये ही योजना कार्यान्वित केली याला सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (एसजीबी) असेही म्हणतात. नोव्हेंबर २०१५ पासून आत्तापर्यंत आरबीआयने वेळोवेळी सोव्हेरीअन गोल्ड बॉंड बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. नुकतेच म्हणजे ११ सप्टेबर ते १५ सप्टेबर २०२३ मध्ये असी विक्री केली आहे.

gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gold prices decreased but consumers tension grew due to significant rise in silver prices
सोन्याच्या दरात घट, चांदीने वाढवली चिंता… हे आहेत आजचे दर…
Gold price Today
Gold Silver Rate : सोने चांदीचे दर वाढले! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
sarees and jewellery combination jewellery to wear with saree jewellery set for saree
अलंकृत!

गोल्ड बॉण्ड ही केंद्र सरकारने आरबीआयद्वारा इश्यू केलेली सिक्युरिटी असून एक युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने या डीनॉमिनेशन मध्ये दिली जाते. उदाहरणार्थ सध्या सोन्याचा भाव प्रती ग्रॅम रु.६००० इतका आहे जर आपण रु.६०००० गुंतविले तर आपल्याला सोन्याचे १० युनिट दिले जातील म्हणजेच आपली रु.६००००ची गुंतवणूक १० ग्रॅम सोन्यात केली असे होईल. ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या गोल्ड बॉण्डची प्रतीग्रॅम किंमत रु.५९२३ असी होती.

हेही वाचा… Money Mantra : आपली आर्थिक पत कोण ठरवतं?

या बॉण्डचा कालावधी ८ वर्षे इतका असून मुदती नंतर आपण बॉण्ड घेताना जेवढे गोल्ड युनिट घेतले आहेत तेवढ्या युनिटची त्यावेळच्या सोन्याच्या बाजारात असलेल्या किमतीनुसार येणारी रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाते. याशिवाय आपण सुरवातीला जी रक्कम गुंतविली असेल त्यावर २.५% दराने (वार्षिक) व्याज दिले जाते व हे व्याज सहामाही पद्धतीने दिले जाते. मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेत शेवटच्या सहामाहीचे व्याज जमा केले जाते. ५ वर्षानंतर गरज असल्यास मुदत पूर्व बॉण्ड मोडता येतात. हे बॉण्ड हस्तांतरणीय असून आपण गिफ्ट देऊ शकता किंवा ट्रान्स्फर करू शकता.

यामध्ये निवासी भारतीय, एचयुएफ, ट्रस्ट गुंतवणूक करू शकतात. अनिवासी भारतीयांना गुंतवणूक करता येत नाही. मात्र गुंतवणूक करताना जर संबंधित व्यक्ती निवासी भारतीय असेल आणि त्या नंतर अनिवासी झाला असेल तर मुदती पर्यंत गुंतवणूक ठेवता येते. यात वैयक्तिक तसेच एचयुएफ गुंतवणूकदारांना किमान एक ग्रॅम व त्या पटीत व कमाल ४ किलो एवढी गुंतवणूक करता येते तर ट्रस्ट किंवा तत्सम किमान एक ग्रॅम व कमाल २० किलो एवढी गुंतवणूक करता येते. तसेच संयुक्त नावाने किंवा लहान मुलांच्या नावानेसुद्धा गुंतवणूक करता येते. सरकारी बँका, काही खाजगी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, एनएससी व बीएससी हे दोन्हीही स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी ही गुंतवणूक करता येते. या बहुतेक सर्व ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गुंतवणूक करता येते , ऑन लाईन पद्धतीने गुंतवणूक केल्यास प्रती ग्रॅम रु.५० इतकी सूट दिली जाते. फक्त रु.२०००० पर्यंतची रक्कम रोखीने भरता येती त्या पुढील रक्कम चेक/,एनईएफटी/आरटीजीएस/युपीआय पद्धतीने भरता येते. गुंतवणूकदारास सर्टिफिकेट ऑफ होल्डिंग दिले जाते ज्यात युनिट नंबरचा उल्लेख असतो. याशिवाय आपण डी-मॅट पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. डी-मॅट पद्धतीने घेतल्यास ट्रेडिंग करता येते. बॉंडला नॉमिनेशनची सुविधा आहे.

गोल्ड बॉण्डची नवीन सीरिज सुरु होण्या आधी दोन दिवस प्रती ग्रॅम सोन्याचा दर आरबीआयकडून जाहीर केला जातो व याचदराने सीरिजच्या सुरवातीच्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत युनिट दिले जातात. हा दर सीरिज सुरु होण्याच्या आधीच्या तीन दिवसांच्या सोन्याच्या बंद होणाऱ्या सरासरी भावा इतका असतो. ( इंडिया बुलियन व ज्वेलर्स असोसिएश्न्स यांनी ठरविलेला ९९९ शुद्धतेचा सोन्याचा भाव यासाठी विचारात घेतला जातो.)

हेही वाचा… Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

हे बॉण्ड हस्तांतारणीय असल्याने तारण म्हणून स्वीकारले जातात त्यामुळे गरज पडल्यास कर्ज घेता येते किंवा पूरक तारण (कोलॅटरल) म्हणून स्वीकारले जातात. या बॉण्डच्या तारणावर कर्ज देताना सोने तारण कर्जासाठी प्रती ग्रॅम जो दर असेल तोच दर लावला जातो. या बॉण्डवर सहामाही मिळणारे व्याज कर पात्र असते मात्र टीडीएस कापला जात नाही यावरील लागू असणारा कर भरण्याची जबाबदारी गुंतवणूक दाराची असते. तसेच मुदतीनंतर मिळणाऱ्या रकमेस कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही मात्र एका वर्षानंतर व मुदतीच्या आत बॉण्ड मोडल्यास व कॅपिटल गेन असल्यास इंडेक्स शेषन कर भरावा लागतो. जर ट्रेडिंग करत असाल तर एक वर्षाच्या आतील कॅपिटल गेन सबंधित आर्थिक वर्षाच्या उत्पन्नात जमा धरला जातो.

थोडक्यात असे म्हणता येईल कि जर आपल्याला सोन्यात गुंतवणूक करावयाची असेल तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये गोल्ड बॉण्डमधील गुंतवणूक निश्चितच फायदेशीर आहे कारण एक तर गुंतवणुकीवर व्याज मिळते जे अन्य कोणत्याही पर्यायात मिळत नाही, चोरीची भीती नाही, लॉकर घेऊन त्याचे भाडे भरायची गरज नाही. सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी नाही, घडणावळ , विकतानाची घट यासारखे नुकसान नाही. शिवाय सोन्याचा वाढत्या दराचा मुदत संपेपर्यंत लाभ, प्रसंगी कर्ज मिळण्याची सोय आणि जर डी-मॅट स्वरुपात असेल तर कधी विकत येण्याची सुविधा. या सर्व बाबी विचारात घेता जर आपल्याला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर हा पर्याय जरूर विचारात घ्यावा व त्यादृष्टीने नवीन गोल्ड बॉंड सीरिज केव्हा बाजारात येणार आहेत याची माहिती घेऊन त्या कालावधीत गुंतवणूक करावी.

Story img Loader