या नवीन वर्षातील गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा पहिला आयपीओ बाजारात येत आहे तो म्हणजे ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड या कंपनीचा. या लेखातून आयपीओ विषयी सर्वकाही जाणून घेऊया. भारतातील व जागतिक स्तरावर धातू निर्मिती प्रक्रियेतील ‘कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल’ या यंत्रांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून बाजारात पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे.

एखादी कंपनी बाजारात पहिल्यांदा पदार्पण करत असते त्यावेळी ते शेअर्स बाजारात आणण्याच्या प्रक्रियेला पब्लिक इश्यू असे म्हणतात. या पब्लिक इश्यूमधून ज्यांना बोली लावायची आहे त्यांना नियमानुसार दिलेल्या लॉटमध्ये ऑनलाइन स्वरूपात बोली लावावी लागते. पब्लिक इश्यूमध्ये शेअर्स कोण विकते ? ज्यांनी आधीच कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती असे गुंतवणूकदार किंवा कंपनीचे प्रवर्तक आपले शेअर्स विकून पैसे पदरात पाडून घेतात किंवा नवीन भांडवलाची उभारणी करण्यासाठी शेअर्स नव्याने दिले जातात. ज्योती सीएनसी या कंपनीच्या बाबतीत प्रवर्तक किंवा गुंतवणूकदार आपले शेअर्स विकत नसून नवे शेअर्स बाजारात आणले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीने एक हजार रुपये कोटी एवढ्या रकमेच्या पब्लिक इशू साठी सेबीकडे अर्ज दाखल केला होता.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Loksatta kutuhal Artificial Intelligence ISRO and DRDO
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : इस्राो आणि डीआरडीओ
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

कंपनीचा व्यवसाय कोणता ?

मेटल कटिंग कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल (CNC) या यंत्रांच्या निर्मितीमध्ये आघाडीची कंपनी असलेल्या ज्योती सीएनसीने देशात आणि परदेशातही आपले यशस्वी ग्राहक निर्माण केले आहेत. सीएनसी मशीन, सीएनसी टर्निंग सेंटर, सीएनसी टर्मिनल सेंटर, सीएनसी व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, सीएनसी हॉरीझॉण्टल मशिनिंग सेंटर अशा यंत्रांची निर्मिती कंपनीद्वारे केली जाते.

या कंपनीने तयार केलेली यंत्रे अवकाश क्षेत्र, संरक्षण, वाहन निर्मिती, इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री निर्मितीसाठी वापरण्यात येतात. भारताच्या अवकाश संशोधनाची धुरा यशस्वीरित्या वाहणाऱ्या इस्रोच्या प्रकल्पांमध्ये ही कंपनी आपली मशीन पुरवत असते.

हेही वाचा… Money Mantra : स्टार्टअप्सची ‘हॉकी स्टिक’ ग्रोथ

भारत आणि रशिया यांच्या सहकाऱ्यांनी विकसित झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीच्या कंपनीलाही ज्योती सीएनसीचे सुटे भाग पुरवते. युनिपार्ट इंडिया, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, भारत फोर्ज, शक्ती पंप, रोलेक्स, बॉश, टर्किश एरोस्पेस असे नामांकित ग्राहक असलेल्या कंपनीची उत्पादने गुजरात मधील राजकोट आणि फ्रान्समधील स्ट्रेसबोर्ग येथून निर्माण केली जातात.

जून २०२३ अखेरीस कंपनीकडे एकूण तीन हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर्स असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आयपीओ विषयी माहिती

  • आयपीओ खुला होण्याची तारीख — ९ जानेवारी २०२४
  • आयपीओ बंद होण्याची तारीख — ११ जानेवारी २०२४
  • दर्शनी मूल्य — दोन रुपये प्रति शेअर
  • आयपीओ मधील बोली लावण्यासाठीची किंमत– ३१५ ते ३३१ रुपये प्रति शेअर
  • कमीत कमी ऑर्डर — ४५ शेअर्स.

पब्लिक इश्यू नेमका कोणता उद्देशाने?

या कंपनीचा येणारा पब्लिक इश्यू संपूर्णपणे नवीन शेअर्सचा असणार आहे व मिळालेल्या पैशाचा विनियोग

  • कंपनीवरील कर्जाची परतफेड करणे.
  • दीर्घकालीन व्यवसायातील गुंतवणूक करण्यासाठी.

सध्या कंपनीच्या प्रवर्तकांकडे (Promotor) ५५.३६% एवढे शेअर्स आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती

२०२३ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार कंपनीचा विक्रीचा आकडा ५१० कोटी रुपये एवढा नोंदवला गेला व निव्वळ नफा तीन कोटी रुपये झाला आहे. मागील तीन वर्षात तोट्यामधून नफ्यात येण्याचा कंपनीचा प्रयत्न स्पष्टपणे दिसतो आहे.

पब्लिक इश्यूशी संबंधित जोखीम घटक

  • कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी २० टक्के व्यवसाय आघाडीच्या ग्राहकांकडून येतो.
  • कंपनीची उपकंपनी असलेली ज्योती एस ए एस गेल्या सहा महिन्यापासून तोट्यात व्यवसाय करत आहे.
  • कंपनीवर असलेल्या कर्जाचे प्रमाण खूपच आहे.
  • डेट टू इक्विटी म्हणजेच कर्ज आणि मालमत्ता यांचे गुणोत्तर विषम आहे.
  • साधारणपणे त्याच व्यवसायात कार्यरत असलेल्या अन्य कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड कमी आहे.

कंपनीचे BSE आणि NSE वर पदार्पण (Listing) होणार आहे. गुंतवणूकदारांनी जोखीम विषय माहिती वाचून, समजून घेऊन आपल्या जबाबदारीवर या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.