२९ सप्टेंबर २०२३ रोजी टाटा पॉवरचा फ्युचर बंद भाव रु २६४.१५ होता. आता समजा ३ /१० / २०२३ रोजी टाटा पॉवरमध्ये बुल पुट स्प्रेड स्ट्रॅटेजी करावयाची असल्यास ती पुढीलप्रमाणे करता येईल.
दिशा- भावानुसार तसेच ओपन इंटरेस्ट व समभागांची संख्या अर्थात व्हॉल्युमच्या अभ्यासानुसार तेजी जवळची आधार पातळी (सपोर्ट) २६२ रुपये आहे.
काय करायचे?
समाप्ती २६/१०/२३ , लॉट साईज: ३३७५ समभाग, अंदाजे गुंतवणूक- रु ४०,०००
जर निफ्टी सकाळी ९.३० वाजेपर्यंत तेजी दाखवत असल्यास- ५.६५ रुपये प्रीमियम देऊन स्ट्राईक २६० चा पुट खरेदी करा.
६.८५ रुपये प्रीमियम घेऊन स्ट्राईक २६२.५० चा पुट विका
येथे कमाल नफा रु ४,०५० तर कमाल तोटा रु ४,३८८ (करार समाप्तीपर्यंत) होण्याची शक्यता आहे.
३/१०/२०२३ ला भावामध्ये बदल झालेला असेल तरी ही स्ट्रॅटेजी करता येईल. आपल्या जोखीम क्षमतेनुसार हा व्यवहार पूर्ण करू शकता. यात स्ट्रॅटेजी यशस्वी होण्याची शक्यता ५२ टक्के आहे.
वरील बुल पुट स्प्रेड स्ट्रॅटेजीचे उदाहरण संकल्पना समजावून सांगण्यासाठी घेतले आहे. वाचकांनी हा बुल पुट स्प्रेड स्ट्रॅटेजीमध्ये व्यवहार करण्याचा सल्ला समजू नये.