गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. म्हणूनच तुमच्या पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीची सवय लावावी आणि जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाईल, तसतसे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारच्या गुंतवणुकीची भर घालावी, असे तज्ज्ञ नेहमीच सांगतात. जर तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर या नवीन वर्षांपासून गुंतवणूक सुरू करा.
गुंतवणुकीच्या दृष्टीने आता अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असले तरी काही वर्षांत जलद पैसे कमावण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड एसआयपीचा जरूर समावेश करावा. ते बाजाराशी जोडलेले असल्याने हमी परताव्याबद्दल सांगता येत नाही, परंतु ते सरासरी १२ टक्के परतावा देते, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. दीर्घकालीन SIP द्वारे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठा निधी तयार करू शकता. गुंतवणुकीचे ४ मोठे फायदे जाणून घेऊ यात.
हेही वाचाः TCS कर्मचार्यांना Artificial Intelligence चे कौशल्य शिकवणार, ५ लाख अभियंत्यांना मिळणार प्रशिक्षण
१- लवचिकता (flexibility)
SIP चा पहिला फायदा म्हणजे SIP द्वारे गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता असणे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता. याशिवाय जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्या SIP मधून पैसे काढू शकता. तसेच ते थांबवूही शकता आणि तुमचे उत्पन्न वाढले की, तुम्ही परत त्यात गुंतवणूक वाढवू शकता. SIP मध्ये दरवर्षी ५ किंवा १० टक्के दराने थोडे पैसे जोडले गेले तर त्याचा दीर्घकाळापर्यंत मोठा फायदा होतो.
हेही वाचाः चांगली बातमी! मोदी सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल
२- व्याजावरही व्याज
एसआयपीमध्ये चक्रवाढीचा मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर फक्त व्याज मिळत नाही, तर तुम्हाला त्या व्याजावरही व्याज मिळते. त्यामुळे एसआयपी दीर्घकाळासाठी करावी, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढीचा फायदा होणार आहे.
३- रुपये सरासरी खर्च
एसआयपीमध्ये तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच जर बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले, तर तुम्हाला जास्त युनिट्स वाटप केले जातात आणि जर मार्केट वाढत असल्यास वाटप केलेल्या युनिट्सची संख्या कमी असते. त्यामुळे बाजारातील चढउतारांच्या बाबतीतही तुमचा खर्च सरासरी राहतो. म्हणजे बाजार घसरला तरी तुमचे नुकसान होत नाही. म्हणूनच जेव्हा बाजार वाढतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळते.
४- शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय
SIP द्वारे तुम्ही ठराविक कालावधीसाठी बचत करायला शिकता. म्हणजेच तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक जे काही पैसे गुंतवायचे आहेत, ती रक्कम तुम्ही बचत केल्यानंतरच उर्वरित रक्कम खर्च करता. अशा प्रकारे तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याची सवय लागेल.
५- या चुका टाळा अन्यथा मोठे नुकसान
जर तुम्ही एसआयपीचे फायदे जाणून घेतल्यानंतरच एसआयपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्या चुकादेखील समजून घ्या, ज्या लोक नकळत करतात आणि त्यामुळे त्यांना नंतर नुकसान सहन करावे लागते-
- जेव्हा तुम्ही SIP सुरू कराल, तेव्हा आधी योग्य संशोधन करा. संशोधनाशिवाय सुरू केलेली गुंतवणूक नुकसानास कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही आर्थिक बाबींमधील तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.
- जर तुम्ही एसआयपी सुरू केली असेल तर ती मध्यभागी थांबवण्याची चूक करू नका किंवा मध्यभागी थांबवू नका. यामुळे तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही.
- जास्त पैसे कमवण्याच्या नादात मोठी रक्कम गुंतवू नका. अनेक वेळा लोक विविध कारणांमुळे मोठी गुंतवणूक करतात पण ती पुढे चालू ठेवत नाहीत आणि नंतर त्यांना नुकसान सहन करावे लागते.
- बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमुळे SIP मध्ये अचानक बदल करू नका. तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाला चिकटून राहा.
- सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा, यासाठी गुंतवणुकीत पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांचा समावेश करा.