मिलिंद देवगांवकर

काय, कसा काय झाला गणपती उत्सव?

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…

आपला हा भाद्रपद महिना एकदम भरगच्च असतो ना? असतो फक्त गणपती बाप्पाचा उत्सव, पण १० दिवस फुल जल्लोष.

मंडळी, नाक्यावर आमच्या मित्रांच्या गप्पा चालल्या होत्या. बोलता बोलता एका मित्राच्या साडूभाऊंचा विषय निघाला.

डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यांनी सेकंड ओपिनियन घेतले आणि मग ठरवून रीतसर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

आता दिल का मामला म्हणजे जरा नाजूकच की! पण, हा साडूभाऊ एकदम बिनधास्त. ऑपरेशन थेटरमध्ये नेईपर्यंत ‘OTT’ वर मस्त सिनेमा बघत होते. झालं काही नाही, डॉक्टरांना ग्राफीमध्ये दोन ठिकाणच्या रक्तवाहिन्या (Blood Vessels) जरा जास्तच अरुंद दिसल्या. ग्राफिच्या ऐवजी ‘बायपास’ करणेच योग्य ठरणार होते. मग केली की राव! काय करता? परत परत कोण हा उद्योग करेल? दोन सोडून तीन ठिकाणी केली.

हेही वाचा… Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

आता खर्च विचारू नका. जसे ‘नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ’ विचारू नये म्हणतात, तसे एकदा का हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले की डॉक्टरांचे बिल विचारू नये. भरून मोकळे होणे हा एकमेव पर्याय असतो. आता तुम्ही म्हणाल की, “मेडीक्लेमची पॉलिसी असणारच की राव!” मंडळी, अगदी योग्य विचार केलात. पॉलिसी तर होतीच पण त्याच बरोबर या साडूभाऊंनी त्यात एक वेगळा पर्याय घेतला होता.

कोणता होता तो पर्याय?

सांगतो… पण त्या अगोदर पुढचं ऐका.

पुढे काय झालं, डिस्चार्ज दिल्यानंतर काही दिवसातच हे साडूभाऊ घरात धडपडले, खरोखरच धडपडले ‘पडले नाहीत’ आणि झालं की हो फॅक्चर. आता, बोला! नुकताच ‘दिल की धडकन’ बरोबर करण्यात साडेचार लाखाचा क्लेम केला होता. आता या पन्नास हजारात काय होतंय? तर! साडूभाऊंनी त्यांच्या मेडीक्लेम पॉलिसीत ‘Restored and Recharge’ (R&R) चा पर्याय घेतला होता.

काय आहे हा ‘Restored and Recharge’ (R & R) पर्याय?

हेही वाचा… Money Mantra: IFSC कोड काय असतो आणि तो इतका महत्त्वाचा का?

साडूभाऊंनी ‘R & R चा’ पर्याय घेतल्याने पहिल्या क्लेमनंतर ती पॉलिसी त्वरीत पाचलाखांसाठी रीस्टोअर्ड झाली. त्यामुळे ह्या ‘धडपडल्याचा’ही पूर्ण क्लेम त्यांना मिळाला आणि झालेल्या खर्चाने इतरांची ‘दिल की धडकन’ वाढली नाही.

थोडक्यात काय तर अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच मेडिक्लेम असणे आवश्यक आहे आणि ‘RESTORED AND RECHARGE’ चा पर्याय ही अत्यावश्यक आहे.तर मंडळी, असा प्रसंग आपल्यावर न येवो ही देवीपुढे प्रार्थना आणि आलाच तर ‘निश्चिंत ‘ आहेच!